अहिल्यानगर, ः चार-पाच महिने कष्ट करुन पिकवलेला कांदा बाजारात विक्रीसाठी नेला. प्रती क्विंटल शंभर रुपयांचा म्हणजे एक रुपया किलो दर मिळाला. सहाशे रुपये मिळाले. मात्र कांदा नेण्यासाठीच्या वाहतुकीसह अन्य खर्चही सहाशे रुपये झाले. आलेली रक्कम खर्चात वजा झाल्यानंतर सबंधित शेतकरी शुन्य रुपये शिल्लक राहिलेल्या पट्टीचा कागद घेऊन घरी परतला. संगमनेर (जि. अहिल्यानगर) येथील बाजार समितीमधील एका व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्याला दिलेली कांदापट्टी व्हायरल झाल्याने कांदा दराचे वास्तव समोर आले आहे. After toiling for four to five months to cultivate onions, a farmer took his produce to the market for sale. He received…
Read Moreशेकोटीला शेकत असलेल्या सहा वर्षाच्या मुलीला बिबट्याने सर्वांसमोर उचलून नेले
अहिल्यानगर, ः घरासमोर अंगणात शेकोटी करुन शेकत असलेल्या लोकांतून सहा वर्षाच्या चिमुरडीला बिबट्याने आई व इतर कुटूंबातील लोकांसमोरुन उचलून नेल्याची घटना बुधवारी (ता. १२) सायंकाळी खारेकर्जुने (ता. अहिल्यानगर) येथे घडली. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत चिमुरडीचा शोध घेतला परंतु चिमुरडी सापडू शकली नाही. रियंका सुनील पवार (वय ६) असे त्या चिमुरडीचे नांव आहे. A leopard snatched a six-year-old girl from the courtyard of her house in front of her mother and other family members on Wednesday (12) evening at Kharekarjune (Ahilyanagar). After the incident, the local people searched for the…
Read Moreअहिल्यानगरला ऊसदरासह शेतकरी प्रश्नावर बैठकीत अधिकारी निरुत्तर
अहिल्यानगर ः साखर कारखान्याचा हंगाम सुरू झाला असताना बहुतांश कारखान्यांनी दर जाहीर केले नाहीत. दर जाहीर कधी करणार, ऊसाचा काटा मारण्याचा प्रकार कधी थांबणार? शेतकऱ्यांच्या ऊसाच्या दरातून कर्जवसुली थांबवणार का? कायद्यानुसार ऊस घातल्यानंतर चौदा दिवसात पैसे देणार का? ज्या कारखान्यांनी पैसे थकवले त्यांच्याकडून व्याजासह वसुली करणार का अशा अनेक प्रश्नाचा शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि शेतकऱ्यांनी भीडामार केला. यातील बहुतांश प्रश्नावर प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाचे अधिकारी निरुत्तर झाले. अखेर अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी प्रश्न समजून घेत तोडगा काढणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्याण ऊसदर स्पष्ट न झाल्याने ३५५१ रुपये प्रती टन…
Read Moreसहकारी संस्थांमुळे संगमनेर तालुक्याची अर्थव्यवस्था मजबूत – रणजितसिंह देशमुख
संगमनेर ः संगमनेर दुध उत्पादकांच्या जीवनात दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक स्थिरता निर्माण झाल्यामुळे सहकाराच्या माध्यमातून ग्रामिण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. ग्रामिण भागात दुग्धव्यवसाय हा मुख्य व्यवसाय बनला आहे. संगमनेर तीलुका दूध संघाच्या माध्यमातून दिपावलीनिमित्त दूध दर फरक, दुधाचे पेमेंट, अनामत, कामगारांना बोनस व मेहनताना, व्यापारी देणे, चढ उतार निधी असे एकूण दूध उत्पादकांना ४१ कोटी रूपये त्याचबरोबर दूध संघाशी सलग्न असणाऱ्या सहकारी दूध संस्थांनी सुध्दा ४१ कोटी रूपये असे एकूण ८२ कोटी रूपये दूध उत्पादकांना अदा करण्यात आले असल्याची माहिती दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी दिली. The rural economy…
Read Moreशिवाजीराव कर्डीले…लोकनेता आनंतात विलीन…!
अहिल्यानगर, (प्रतिनिधी) ः सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातून पुढे येऊन राजकारणात आपली वेगळा ठसा उटवत लोकनेतेपद मिळवलेले लोकनेते आमदार शिवाजीराव कर्डीले आज (शुक्रवारी ता. १७) आनंतात विलीन झाले. त्यांच्यावर बुऱ्हानगर येथील त्यांच्यावर शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आपल्या लाडक्या नेत्यांना निरोप देण्यासाठी तालुक्यासह जिल्हाभरातील लोक, राजकीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाडक्या लोकनेत्यांना निरोप देताना अनेकांना अश्रु अनावर झाले.अहिल्यानगर शहरानजीक असलेल्या बुऱ्हानगर येथील दुध उत्पादक शेतकरी कुटूंबातील शिवाजीराव कर्डीले यांचा राजकीय प्रवास प्रेरणादायी आणि संघर्षमय आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव भानुदास कर्डिले (वय ६७)…
Read More“जोगेश्वरी ” चा पुरग्रस्तांना मायेचा ओलावा…!
शिरूर कासार (जि. बीड ) ः अतिवृष्टी आणि पुराने दिवाळीच्या तोंडावर प्रचंड नुकसान झाल्याने हातबल झालेल्या शिरूर कासार तालुक्यातील शेतकरी कुटुंबांना पुण्यातील जोगेश्वरी मिसळ उद्योग समूहाने मायेचा ओलावा दिला आहे. “जोगेश्वरी ” चा पुरग्रस्तांना मायेचा ओलावाशिरूर कासार (जि. बीड ) ः अतिवृष्टी आणि पुराने दिवाळीच्या तोंडावर प्रचंड नुकसान झाल्याने हातबल झालेल्या बीड जिल्ह्यातील शिरुर कासार तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी कुटुंबांना पुण्यातील “जोगेश्वरी” मिसळ उद्योग समूहाने मायेचा ओलावा दिला आहे. “जोगेश्वरी” मिसळ उद्योग समूहाचे अध्यक्ष सचिन हरगुडे व नितीन हरगुडे यांच्या पुढाकारातून दिवाळीनिमित्त शिरूर कासार (जि. बीड) तालुक्यातील पुरग्रस्त ४०० शेतकरी कुटुंबांना …
Read Moreदिपावली निमित्त राजहंस दूध संघाकडून 41 कोटी रुपये बँकेत वर्ग ः रणजितसिंह देशमुख
संगमनेर (प्रतिनिधी)–संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघास प्राथमिक दूध उत्पादक संस्थांनी गेल्या वर्षात पुरवलेल्या चांगल्या गुणप्रतीच्या दुधावर मा. महसूल व कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संघाच्या वतीने दीपावली निमित्त दूध दर फरक, दुधाचे पेमेंट ,अनामत ,कामगारांचा बोनस आणि मेहनताना, व्यापारी देणे, चढ-उतार निधी असे एकूण 41 कोटी रुपये बँकेत वर्ग केले असल्याची माहिती दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना चेअरमन रणजीतसिंह देशमुख म्हणाले की, काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा. महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका…
Read Moreमराठवाड्यातील पूरग्रस्त बाधित पीडित कुटुंबीयांच्या मदतीला धावले दै. समर्थ गांवकरी समूह, एन.के टी ट्रस्ट, समाज कल्याण न्यास आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ
बीड, प्रतिनिधी: यावर्षी मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अनेक गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला. शेकडो कुटुंब बेघर होऊन रस्त्यावर आली. हजारो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऐन दिवाळीच्या तोंडावर शिमगा करण्याची दुर्दैवी वेळ आल्यामुळे या पीडितांचे अश्रू पुसण्यासाठी समाज सेवेसाठी सदैव एक पाऊल पुढे टाकणारे एन.के.टी. ग्रुप ठाणे तसेच समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य, दैनिक समर्थ गांवकरी समूह आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांनी पुढाकार घेत मराठवाड्यातील 1001 कुटुंबियांना 1000 रुपयाच्या विविध साहित्यांचे मदतीचे किट वाटपास सुरुवात केली आहे. संस्थापक अध्यक्ष डॉ. सोन्या पाटील यांनी मोठ्या विश्वासाने पीडितांचे अश्रू…
Read Moreआई कृपा कर, सरकारला सदबुद्धी दे !
अहिल्यानगर, : अहिल्यानगरसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आज बाधित गावांची पाहणी केली. शेतकऱ्यांचे दुःख जवळून अनुभवल्यानंतर माजी कृषिमंत्री व माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात (Former Agriculture Minister and Former Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी पाथर्डी तालुक्यातील श्री मोहटादेवीचे चरणी प्रार्थना केली की संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना ताकद दे आणि संकटात शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याची केंद्र आणि राज्य सरकारला सद्बुद्धी दे. शेतकऱ्यांची ह्या वेदना सरकारच्या काळजापर्यंत पोहोचवण्याची आर्त प्रार्थना आई मोहटादेवीच्या चरणी त्यांनी यावेळी केली. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार हेमंत ओगले, जिल्हा परिषदेच्या…
Read Moreअहिल्यानगरला तृणधान्यांची उत्पादन घेण्याची क्षमता उत्तम : सुधाकर बोराळे
अहिल्यानगर ः “पौष्ठिक तृणधान्यांची उत्पादन क्षमता अहिल्यानगर जिल्ह्यात उत्तम आहे. शेतकऱ्यांना याचा अधिकाधिक उपयोग करावा लागेल, जेणेकरून त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि विविध पोषण समस्यांवर मात केली जाऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यात पौष्टीक तृणधान्याचे क्षेत्र वाढीसाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे म्हणाले. Ahilyanagar: “Production potential of nutritious food grains is great in Ahilyanagar district. Farmers have to utilize it more, so that their income can increase and various nutritional problems can be overcome.Therefore, the Agriculture Department is trying to increase the area of nutritious cereals…
Read More



