मराठवाड्यातील पूरग्रस्त बाधित पीडित कुटुंबीयांच्या मदतीला धावले दै. समर्थ गांवकरी समूह, एन.के टी ट्रस्ट, समाज कल्याण न्यास आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ

मराठवाड्यातील पूरग्रस्त बाधित पीडित कुटुंबीयांच्या मदतीला धावले दै. समर्थ गांवकरी समूह, एन.के टी ट्रस्ट, समाज कल्याण न्यास आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ

  • १००१ कुटुंबियांसाठी प्रत्येकी एक हजार रुपयांच्या मदतीचे किट वाटपास प्रारंभ!
  • पीडितांचे अश्रू विश्वासाने  पुसण्यासाठी समाजसेवक नानजीभाई ठक्कर व सोन्या पाटलांना पाठवले……. डॉ. विश्वासराव आरोटे..!
  • महाराष्ट्रातील मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात.. हा एक कर्माचा भाग…. थोर समाजसेवक नानजीभाई ठक्कर*
  • परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातुर, अहील्यानगर पूरग्रस्त भागात वितरण
  • पत्रकारांनी लिखाणाच्या माध्यमातून जसे प्रश्न सोडवतात तसेच आपल्या कार्यातून समाजसेवा  करावी ः डॉ विश्वासराव आरोटे

बीड, प्रतिनिधी:  यावर्षी मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अनेक गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला. शेकडो कुटुंब बेघर होऊन रस्त्यावर आली. हजारो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऐन दिवाळीच्या तोंडावर शिमगा करण्याची दुर्दैवी वेळ आल्यामुळे या पीडितांचे अश्रू पुसण्यासाठी समाज सेवेसाठी सदैव एक पाऊल पुढे टाकणारे एन.के.टी. ग्रुप ठाणे तसेच समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य, दैनिक समर्थ गांवकरी समूह आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांनी पुढाकार घेत मराठवाड्यातील 1001 कुटुंबियांना 1000 रुपयाच्या विविध साहित्यांचे मदतीचे किट वाटपास सुरुवात केली आहे. संस्थापक अध्यक्ष डॉ. सोन्या पाटील यांनी मोठ्या विश्वासाने पीडितांचे अश्रू पुसण्यासाठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या टीमला मराठवाड्यात मदतीचे किट घेऊन पाठवले आहे. त्यामुळे या पीडित कुटुंबीयांचे दुःख दूर करण्यासाठी त्यांच्या जीवनात पुन्हा एकदा आनंदाची उभारी देण्यासाठी ही मदत निश्चितच ऊर्जा निर्माण करणारी ठरणार आहे. 

नेहरू युवा केंद्र कार्य व क्रीडा मंत्रालय संलग्न भारत सरकार समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सोन्या पाटील यांच्या पुढाकारातून एन.के.टी.ग्रुप अध्यक्ष नानजीभाई ठक्कर ठाणावाला,  महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त बाधितांना मदतीचा हात देण्यात येत आहे. देण्यात येत असलेल्या मदतीच्या किटमध्ये प्रामुख्याने जीवनावश्यक किराणा साहित्य, शालेय दप्तर बॅग,ब्लॅंकेट, विद्यार्थ्यांना वह्या, महिलांकरिता साड्या, विद्यार्थ्यांना पेन, दिवाळी करता लक्ष्मीचे किचन आदी साहित्यांची किट पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे वाटप करण्यासाठी अहील्यानगर दक्षिण व मराठवाड्यामध्ये आले आहेत.त्यांच्या समवेत दैनिक समर्थ गांवकरी महाव्यवस्थापक तथा पत्रकार संघाचे ब्रँड अँबेसिडर संजय फुलसुंदर आणि त्यांची टीम पीडितांना मदतीचे किट मराठवाड्यामध्ये देत निघाली आहे. या टीमने सर्वप्रथम अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत, जामखेड या भागातील बाधित गावातील पिढीताना मदतीची किट वाटप केली. यानंतर बीड जिल्ह्यातील आष्टी, शिरूर कासार तालुक्यातील काही गावांना मदतीची भेट दिल्यानंतर या टीमने बीड येथील शासकीय विश्रामगृह येथे बीड शहरातील प्रिंट मीडियामध्ये मशीनवर छपाई करणारे कर्मचारी, पेपर वाटप करणारी मुले, पेपर विक्रेते एजंट, पत्रकार, संपादक तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया मधील काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये संपादक, पत्रकारांना मदतीची किट महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, समाज कल्याण न्यासाचे बीड जिल्हाध्यक्ष शेख फारूक, पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आली. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून पत्रकार संघाचे माजी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, दिव्य लोकप्रभाचे संपादक संतोष मानूरकर यांच्यासह समाज कल्याण न्यासाचे बीड तालुकाध्यक्ष संदीप आदमाने, उपाध्यक्ष मुशीर इनामदार, शहराध्यक्ष मतीन बागवान,पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस शेख वसीम,पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे बीड जिल्हाध्यक्ष शेख ताहेर, महिला जिल्हाध्यक्ष शेख आयेशा, बीड ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दीपक काळकुटे,बीड जिल्हा उपाध्यक्ष शेख आयुब, नितेश उपाध्ये, प्रवीण वडमारे, संपादक बालाजी जगतकर, लक्ष्मण गायकवाड,ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते सुदाम चव्हाण, सुमूर्ती वाघिरे, डीएस कुलकर्णी, शेख गुड्डू, काशीद मामा, सोमनाथ मुळे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

  • चौकट…
  • “पत्रकार समाजाचा आरसा आहे, पण केवळ आरसा दाखवून थांबायचं नाही. समाजाच्या जखमांवर फुंकर घालणं हेही आपलं कर्तव्य आहे ः डॉ. विश्वासराव आरोटे, (प्रदेश सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई)

“पत्रकार हा फक्त बातमी देणारा नसतो, तर तो समाजाचा सच्चा प्रतिनिधी असतो. मराठवाड्यातील पूरस्थिती पाहून मन हेलावलं. घरे उद्ध्वस्त झाली, संसार वाहून गेले, मुलांच्या शाळेच्या वह्या, महिलांची संसाराची साधनसामग्री सर्व काही पाण्यात गेलं. या परिस्थितीत पत्रकार म्हणून आपण फक्त ते दृश्य कॅमेरात कैद करायचं का, की समाजसेवक म्हणून काहीतरी करायचं — हा प्रश्न मी स्वतःलाच विचारला. आणि त्याच क्षणी आम्ही कृती ठरवली! “महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, दैनिक समर्थ गांवकरी समूह, समाज कल्याण न्यास आणि एन.के.टी. ग्रुप ठाणे यांच्या संयुक्त पुढाकारातून आम्ही १००१ कुटुंबांना मदतीचा हात देण्याचा संकल्प केला. नानजीभाई ठक्कर आणि डॉ. सोन्या पाटील यांनी या कार्यात अमूल्य सहकार्य दिलं. त्यांचा विश्वास आणि पाठिंबा आमच्या टीमसाठी प्रेरणादायी ठरला. “या किटमध्ये केवळ वस्तू नाहीत — तर त्यात प्रेम, सहानुभूती आणि दिवाळीपूर्व आनंदाची भावना आहे. एखाद्या आईच्या हातात साडी गेली, एखाद्या मुलाच्या शाळेच्या बॅगेत वही-पेन गेलं, एखाद्या वडिलांना अन्नधान्य मिळालं — तर त्यामागे एक विश्वास आहे की समाज अजून जिवंत आहे, संवेदनशील आहे. “पत्रकार फक्त शासनाचे प्रश्न विचारणारे नव्हे, तर समाजातील दुःखावर उपाय शोधणारे बनले पाहिजेत. लेखणीसोबत कृतीही आवश्यक आहे. म्हणूनच मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना सांगू इच्छितो — समाजसेवा ही केवळ सामाजिक संस्थांची जबाबदारी नाही, ती आपल्या पत्रकारितेचा आत्मा आहे.“आमच्या टीमने मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात फिरून लोकांच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आणण्याचा प्रयत्न केला. हाच माझ्या लेखणीचा, माझ्या पत्रकारितेचा खरा पुरस्कार आहे.”

Related posts

Leave a Comment