शिवाजीराव कर्डीले…लोकनेता आनंतात विलीन…!

शिवाजीराव कर्डीले…लोकनेता आनंतात विलीन…!

अहिल्यानगर, (प्रतिनिधी) ः सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातून पुढे येऊन राजकारणात आपली वेगळा ठसा उटवत लोकनेतेपद मिळवलेले लोकनेते आमदार शिवाजीराव कर्डीले आज (शुक्रवारी ता. १७) आनंतात विलीन झाले. त्यांच्यावर बुऱ्हानगर येथील त्यांच्यावर शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आपल्या लाडक्या नेत्यांना निरोप देण्यासाठी तालुक्यासह जिल्हाभरातील लोक, राजकीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाडक्या लोकनेत्यांना निरोप देताना अनेकांना अश्रु अनावर झाले.
अहिल्यानगर शहरानजीक असलेल्या बुऱ्हानगर येथील दुध उत्पादक शेतकरी कुटूंबातील शिवाजीराव कर्डीले यांचा राजकीय प्रवास प्रेरणादायी आणि संघर्षमय आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव भानुदास कर्डिले (वय ६७) यांचे आज पहाटे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, चार मुली, एक मुलगा असा परिवार आहे. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष (दक्षिण) अक्षय कर्डिले यांचे वडील, तर आमदार संग्राम जगताप व माजी महापौर संदीप कोतकर यांचे ते सासरे होत.

Shivajirao Bhanudas Kardile (67), MLA from Rahuri Assembly constituency and Chairman of District Cooperative Bank, passed away due to heart attack this morning. He is survived by his wife, four daughters and one son. He was the father of Akshay Kardile, the district president (South) of the Bharatiya Janata Party Yuva Morcha, and the father-in-law of MLA Sangram Jagtap and former mayor Sandeep Kotkar.


कर्डिले आज सकाळी साडेसहाच्या सुमारास बुऱ्हाणनगर येथील त्यांच्या घरासमोर फिरत असताना त्यांना घाम येऊन अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तातडीने अहिल्यानगरमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच कर्डिले समर्थकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. दुपारच्या सुमारास पार्थिव बुऱ्हाणनगर येथे त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. त्यावेळेस रस्त्याच्या दुतर्फा लोक उभे राहून त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत होते. सायंकाळच्या सुमारास घरासमोर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार नीलेश लंके, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, आमदार मोनिका राजळे, आमदार अमोल खताळ, आमदार काशिनाथ दाते, आमदार हेमंत ओगले, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार संग्राम जगताप, आमदार शरद सोनवणे, आमदार सुरेश धस, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, बबनराव पाचपुते, प्राजक्त तनपुरे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, दादाभाऊ कळमकर, भानुदास मुरकुटे, चंद्रशेखर घुले पाटील, भाऊसाहेब कांबळे, लहू कानडे आदी उपस्थित होते.
अंत्यदर्शन घेताना अनेक समर्थकांना अश्रू अनावर होत होते. सायंकाळी त्यांच्या गावी बुऱ्हाणनगर येथे कर्डिले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी मानवंदना देत हवेत बंदुकीतून फैरी झाडल्या. ज्ञानेश योग आश्रमाचे महंत पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांच्या पसायदान म्हटले.
सरपंच ते मंत्री असा कर्डिले यांचा जीवनप्रवास राहिला. ते दूध व्यवसाय सांभाळून समाजकारणात उतरले. काही काळ ते गावचे सरपंच होते. त्यानंतर त्यांनी १९९५ साली अपक्ष उमेदवारी करत विधानसभेत पहिल्यांदा प्रवेश केला. तब्बल सहा वेळा आमदारकी करत मंत्री म्हणून दुष्काळात मोठे काम केले होते. २०१९ वगळता सर्वच विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी विजय मिळवला होता. २०१४ च्या निवडणुकीत कर्डिले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीत जाहीर सभा घेतली होती. सुरुवातीला नगर-नेवासे व नंतर नगर तालुक्याच्या विभाजनानंतर नगर-राहुरी-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढत लोकप्रतिनिधित्व केले होते. सहकारातील नेत्यांचा जिल्हा असलेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या राजकारणातही आपल्या नेतृत्व कौशल्याचा ठसा उमटवत बँकेचे अध्यक्षपद मिळवले होते.शेतकरी विकासासाठी त्यांनी अनेक योजना बॅंकेतून आणल्या. पुरक व्यवसाय करणाऱ्या तरुणांना कर्जस्वरुपात आर्थिक बळकटी दिली. बाजार समितीच्या माध्यमातूनही शेतकरी सक्षम कऱण्याचे काम केले. त्यामुळे अहिल्यानगर, पाथर्डी, राहुरी तालुक्यातील दुष्काळी भागात शेतकरी जिवनात खऱ्या अर्थाने क्रांती करणारे नेते म्हणून शिवाजीराव कर्डीले यांचाकडे पाहिले जाते अशी भावना कृषी पत्रकार सूर्यकांत नेटके यांनी व्यक्त केली.

  • मान्यवरांची श्रद्धांजली
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्येष्ठ नेते, राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे आकस्मिक निधन हे राहुरीसह, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आघात आहे. ‘आमदार कर्डीले यांच्या निधनामुळे जनसामान्यांशी नाळ जोडलेले, तळागाळातील घटकांच्या विकासासाठी साठी झटणारे नेतृत्व हरपले. ग्रामीण भागाची नाडी माहित असणारे, सहकार चळवळीच्या माध्यमातून सक्रिय अशा आमदार कर्डीले यांनी राहुरी मतदार संघ आणि अहिल्या नगरच्या विकासाचा सदैव ध्यास घेतला. याच जोरावर त्यांनी सलगपणे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.
  • उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, रीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या जाण्याने एक लोकाभिमुख व संवेदनशील नेतृत्व हरपले. कर्डिले यांच्या निधनाने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. आमदार, राज्यमंत्री, तसेच अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन अशा विविध पदांवर काम करताना त्यांनी नेहमीच लोकहिताला प्राधान्य देत समाजसेवेचे व्रत जोपासले. जनतेच्या प्रश्नांसाठी तळमळीने काम करणारे ते खरे लोकसेवक होते. त्यांच्या कार्यामुळे राहुरी तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली. आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे अकाली जाणे हे त्यांच्या कुटुंबासह सर्व कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे.
  • पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, शिवमहापुराण कथाकार पंडित प्रदीपकुमार यांच्या दर्शनासाठी आमदार शिवाजीराव कर्डिले शुक्रवारी माझ्या निवासस्थानी आले. दर्शनाच्या वेळी डाॅ. सुजय विखे पाटील, आमदार अमोल खताळ आणि आमदार विठ्ठलराव लंघे उपस्थित होते. आम्ही सर्वानी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. त्यानंतर एकत्रित भोजन देखील केले. त्यावेळी असे मनातही आले नाही की ही त्यांची शेवटची भेट ठरणार आहे. त्यांचे हे असे अवचित जाणे मनाला वेदना देणारे आहे, अशा शब्दात जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. निधनाचे वृत्त धक्‍कादायक आणि भाजप परिवारासाठी वेदनादायी आहे. त्‍यांच्‍या निधनाने राजकीय, सामाजिक जीवनाच्‍या वाटचालीतील एक दिलखुलास मित्र काळाच्‍या पडद्याआड गेला. जिल्‍ह्याच्‍या राजकारणातील एक प्रभावी नेता म्‍हणून आमदार कर्डिले यांची ओळख होती.
  • माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखदायक आहे. अनेक वर्षे विधानसभेत त्यांनी प्रतिनिधित्व केले होते. जनसामान्यांची भावना जाणणाऱ्या या नेतृत्वाच्या निधनाने ग्रामीण विकासाची दृष्टी असलेले आणि ग्रामीण शहाणपण असलेले लोक नेतृत्व हरपले आहे. याचबरोबर राज्य मंत्रिमंडळातही दुग्धविकास मंत्री म्हणून काम केले. ग्रामीण विकासाची जाण असलेले आणि ग्रामीण शहाणपण असलेले हे नेतृत्व होते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी प्रभावी काम केले, मुत्सदेगिरी असणाऱ्या आणि जनमाणसांची भावना जपणारे लोकनेतृत्व हरपले आहे.
  • आदर्श गाव हिवरेबाजार घडवणारे पद्मश्री पोपटराव पवार यांनी श्रद्धांजली वाहताना आपली भावना व्यक्त केली. ते म्हणाले, मागील ३५ वर्षांपासून शिवाजीराव कर्डिले व हिवरे बाजारचा ऋणानुबंध होता. ते जनसामान्यांचे नेतृत्व होते. त्यांच्या जाण्याने जिल्ह्याची मोठी हानी झाली आहे. दूध उत्पादक व शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ते कायम संघर्ष करत राहिले.
  • संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बीपीन कोल्हे म्हणाले, सरपंच ते विधिमंडळातील राज्यमंत्री अशी ओळख असलेले राहुरी विधानसभेचे भाजपचे आमदार व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने आपण सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर लढा देऊन न्याय मिळविणारे नेतृत्व गमावले. कर्डिले यांनी दुग्ध व्यवसायातून प्रतिकुल परिस्थितीशी संघर्ष करत आपली वेगळी ओळख निर्माण केली. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्याबरोबर त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात काम केले. अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले

Related posts

Leave a Comment