सिंदफणा नदीवर साखळी बंधारे करुनकायम दुष्काळमुक्ती करण्याच संकल्प ः सुरेशअण्णा धस

  • शिरुर कासार जवळील कोळवाडी येथे कोल्हापुरी बंधाऱ्याचे जलपुजन

शिरुर कासार (प्रतिनिधी) ः शिरुर कासार तालुक्याच्या दुष्काळी भागाला कायमस्वरुपी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पुढाकार घेत आहे. शिरुर कासार तालुक्यातील सर्वच भागात सिंदफणा नदीवर तसेच कापरी व अन्य नद्यावर गरजेनुसार साखळी बंधारे उभारण्यात येणार आहेत. अतिवृष्टीमुळे सिंदफणा नदीपात्राला मोठा फटका बसला असून झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक उपाययोजना करण्यात असे आमदार सुरेश धस यांनी सांगितले.

I am taking the initiative to ensure a permanent water supply for the drought-prone areas of Shirur Kasar taluka. Chain dams will be constructed on the Sindphana River and also on the Kapri and other rivers in all parts of Shirur Kasar taluka, as needed. MLA Suresh Dhas stated that the Sindphana riverbed has been severely affected by the heavy rains, and necessary measures will be taken at the government level to compensate for the damage.


कोळवाडी (ता. शिरुर कासार) येथे सिंदफणा नदीवर साडेतीन कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या कोल्हापूरी बंधाऱ्याचे जलपुजन आमदार सुरेश धस यांच्या हस्ते रविवारी (दि. १) झाले. भाजपचे तालुकाध्यक्ष सुरेश उगलमुगले, शिरुर कासारचे नगराध्यक्ष रोहिदास पाटील, पंचायत समितचे माजी सभापती बाबुराव केदार, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पवार व माऊली आप्पा जरांगे, ज्येष्ठ नेते सुरेश थोरात, माजी नगराध्यक्ष दत्ता पाटील गाडेकर, नगरपंचायतीचे गटनेते गणेश भांडेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कृष्णा पानसंबळ, नायब तहसीलदार गणेश दहिफळे, अहिल्यानगर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष व वरिष्ठ पत्रकार सूर्यकांत नेटके, उपसरपंच नारायण मानकर, देविदास नेटके, पत्रकार अंगद पानसंबळ, युवक नेते सुधाकर नेटके, साईनाथ नेटके, ग्रामसेवक अशोक खाकाळ, दहिवंडीचे सरपंच कालिदास आघाव, पाडुरंग अभंग, भारत बनकर, साहित्यिक विठ्ठल जाधव, पोपट कनुजे, कल्याण तांबे, पत्रकार प्रकाश साळवे, सोनाजी मानकर, दत्ता पाटील सावंत, संदीपान नेटके, सरपंच सुदाम काकडे, अप्पा पवने यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

आमदार सुरेश अण्णा धस म्हणाले की, शिरुर कासार तालुक्यातील शेतीला मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. तालुक्यातील वाहणाऱ्या प्रमुख अशा सिंदफणा नदीवर कोळवाडी येथे बंधारा उभारल्याचा पाच ते सहा गावांना फायदा झाला असून सुमारे दिडशे हेक्टरपेक्षा अधिक शेती ओलीताखाली येणार आहे. या नदीवर तसेच कापरी व अन्य नद्यावर गरजेनुसार साखळी बंधारे उभारण्याचा संकल्प आहे. यामुळे बहुतांश गावांना पाणी उपलब्ध होईल असे नियोजन आम्ही करत आहोत. शेतकऱ्यांसाठी उभारलेले बंधारे केवळ सरकारच्या जबाबदारीवर सोडून चालणार नाहीत. सगळं काही सरकार करत नसते. हा बंधारा तुमच्यासाठीच निर्माण केला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी दोन महिन्यांच्या आत बंधारा ताब्यात घ्यावा व त्याच्या दुरुस्ती व देखभालीची काळजी घ्यावी.” सिंदफणा नदीवर आणखी दोन बरेज बंधारे प्रस्तावित असून सध्या त्यासाठी सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, भविष्यात आवश्यक ठिकाणी आणखी बरेज बंधारे उभारण्याचा मानस असून यामुळे परिसरातील शेतीचा पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवृत्ती बेदरे सर यांनी सुत्रसंचालन केले तर पत्रकार सूर्यकांत नेटके आभार मानले.
————

आदर्श दाखवून द्या ः सुरेश अण्णा धस
कोळवाडी येथील गावकऱ्यांची चाळीस वर्षाची मागणी यंदा पुर्ण झाली. त्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीन प्रस्तावीकात पत्रकार सूर्यकांत नेटके यांनी या बंधाऱ्याचा शेतीला किती आणि कसा फायदा होत असल्याचे सांगत आभार मानले. सुरेश धस म्हणाले, ‘‘बंधाऱ्याला होण्याला खरं तर उशिर झाला. पण उशिराने झालेले काम चांगले आणि गोड आहे. आता बंधारा संभाळण्याची जबाबदारी गावकऱ्यांची आहे. यापुढे कायम पाणी साठवण टिकायचे असेल तर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तातडीने पाणी वापर संस्था स्थापन करुन बंधाऱ्याचा ताबा घ्या. कोळवाडीच्या गावकऱ्यांनी केलेला आदर्श मला इतर गावांत सांगता आला पाहिजे. त्यासाठी आपल्या गावांतून आदर्श दाखवून द्या.’’

Related posts

Leave a Comment