मनोज जरांगे यांच्या आंतरवली सराटीत अमरण उपोषणाला सुरवात

मनोज जरांगे यांच्या आंतरवली सराटीत अमरण उपोषणाला सुरवात

आंतरवली (सराटी) (जि. जालना ः सरकारने परवानगी नाकारली असली तरी अमरण उपोषणावर ठाम आहे असे सांगत मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी (जि. जालना) येथे आजपासून (शनिवार) अमरण उपोषण सुरु केले आहे. सरकारला मराठा आरक्षण चळवळ मोडीत काढायची आहे. त्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप करत कायदा सुव्यवस्था बिघडू नये ही सरकारची जबाबदारी असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. जरांगे पाटील हे आंतरवली सराटीत चौथ्यांदा उपोषण करत आहेत. गृहमंत्र्यांनी जाणीवपुर्वक षढयंत्र करुन परवानगी नाकारल्याचा आरोप करत आमचा प्रश्न सोडवा, मराठे डोक्यावर घेऊन नाचतील असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Patil has started Amaran fast from today (Saturday) at Intervali Sarati (Jalna district). The government wants to crush the Maratha reservation movement. Alleging that efforts are being made for it, Manoj Jarange Patil said that it is the responsibility of the government not to spoil the law and order. Jarange Patil is on hunger strike for the fourth time in a row. Manoj Jarange Patil said, “Solve our problem, we will dance with the Marathas on our heads” alleging that the Home Minister has deliberately denied permission.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरु आहे. आंतरवली सराटी (जि. जालना) येथे सप्टेंबर २०२३ मध्ये सुरु असलेल्या अंदोलनावर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर अंदोलनाचा लढा अधिक तीव्र झाला. त्यानंतर मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडायला सुरवात झाली. मात्र ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत अशी मराठा समाजासाठी सग्या-सोयऱ्यांचा आदेश काढून सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देण्याचा कायदा करावा ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे.

मुंबईला गेल्या मोर्चाच्या वेळी सग्या सोयऱ्यांची अमलबजावणी करण्याचे अश्वासन दिले होते. मात्र त्याला पाच महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी सरकार शब्द पाळत नसल्याने मनोज जरांगे पाटील हे चौथ्यांदा आंतरवली सराटी येथे अमरण उपोषण करत असून आज (शनिवारी) अमरण उपोषणाला त्यांनी सुरवात केली आहे. या उपोषणाला परवानगी देऊ नये अशी आंतरवलीमधील काही लोकांनी मागणी केल्यानंतर ४ जून रोजीच्या उपोषणाची परवानगी नाकारली होती. त्यानंतर ८ जूनला उपोषण करण्याची घोषणा केली. मात्र या उपोषणालाही जालना जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली.
गृहमंत्र्यांनी षढयंत्र करुन परवानगी नाकारली आहे. देवेंद्र फडणवीस आमचे शत्रु आजाबीत नाहीत. आमच्या मागण्या सोडवा, मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील असे सांगत मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम राहत उपोषण सुरु केले असल्याचे जाहीर केले. काहीही झाले तरी मी मागे हटत नाही. मी बलीदान द्यायला निघालो आहे. सग्या सोयऱ्याच्या अमलबजावणीचा गुलाल घेतल्याशिवाय शांत बसणार नाही असे जरांगे पाटील म्हणाले.लोकसभा निवडणूकीत मराठा आरक्षणाचा सुमारे पंधरापेक्षा अधिक लोकसभा मतदार संघात सत्ताधाऱ्यांना फटका बसला. त्या पाश्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला महत्व प्राप्त झाले आहे.

———————————–

कामे सोडून इकडे येऊ नका

मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवलीत पत्रकारांशी बोलताना सांगितले, राज्यात कुठेही अंदोलन कऱण्याचा प्रोग्राम ठरवलेला नाही. सध्या पावसाळ्याचे आणि कामाचे दिवस आहेत. त्यामुळे कोणत्याही मराठ्यांनी काम सोडून इकडे येऊ नका. येथे येणाऱ्या राज्यातील मराठा समाजाला कोणाचा त्रास होणार नाही याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षकांनी लक्ष द्यावे. उपोषणाला राज्यातील जनतेचे पाठबळ आहे. आजही एका हाकेवर कोट्यावधी मराठे जमतील. लोकसभा निवडणूकीत मराठ्यांनी ताकद दाखवली आहे.

Manoj Jarange Patil while talking to reporters said that no program of agitation has been decided anywhere in the state. Currently there are rainy and working days. So don’t any Maratha leave work and come here. The Collector and the District Superintendent of Police should see to it that no one will cause any trouble to the Maratha community of the state coming here. The hunger strike has the support of the people of the state. Even today crores of Marathas will gather on one call. Marathas have shown their strength in the Lok Sabha elections.

Related posts

Leave a Comment