सौंदाळा गावाला जात नकोच आहे…..

सौंदाळा गावाला जात नकोच आहे…..

  • ग्रामसभेत ठराव घेऊन केली घोषणा
  • राज्यात पहिल्यांदाच असा निर्णय घेतलाय गावाने

अहिल्यानगर, ः जाती-पातीमुळे गावांत होणारे दुष्परिणाम समाजासाठी घातक आहेत. त्यामुळे सौदाळा (ता. नेवासा) गावांने जातमुक्तीची घोषणा केली आहे. गावांतील विविध जाती-धर्माच्या बारा लोकांनी एकत्र येऊन रक्तदान करत ग्रामसभेत विविध ठराव करुन सौदाळ्याने अजून एक आदर्श पाऊल टाकले आहे. असा निर्णय घेणारे हे पहिले गाव असल्याने सौंदाळा हे राज्यातील पहिले जातमुक्त गाव होणार आहे.

Ahilyanagar: The negative consequences of caste divisions in villages are detrimental to society. Therefore, the village of Saudala (Nevasa taluka) has declared itself free from caste discrimination. Twelve people from various castes and religions in the village came together to donate blood and passed several resolutions in the village assembly, thus taking another exemplary step. As this is the first village to take such a decision, Saudala will become the first caste-free village in the state.

समाजात सध्या जात-धर्मावरुन सतत वादंग होत आहेत. त्याचा परिणाम समाजावर, गावांवर होत आहे. त्यामुळे आपल्या गावांपासून जातमुक्तीची सुरवात करण्यासााठी सौंदाळा (ता. नेवासा) गावातील नागरिकांनी जाती – भेदभाव या गोष्टीला मुठमाती देऊन स्वातंत्र्य समता बंधुता अंगीकारण्यासाठी जातमुक्ती करण्याच निर्णय घेतला आहे. गावांतील वेगवेगळ्या पंधरा लोकांनी रक्तदान करुन एकोपा दाखवत सरपंच शरद आरगडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या ग्रामसभेत “जातमुक्त गाव” करत असल्याबाबत ठराव घेऊन घोषणा केली. या उपक्रमासाठी प्रमोद झिंजाड यांनी केलेल्या अवाहनाला गावाने प्रतिसाद दिला. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1958 अंतर्गत ग्रामसभेला गावाच्या सामाजिक, शैक्षणिक व नैतिक विकासासंबंधी तसेच सार्वजनिक हिताच्या विषयांवर ठराव करण्याचा अधिकार आहे. त्या अधिकाराचा वापर करून ग्रामपातळीवर सामाजिक एकात्मता व समता प्रस्थापित करण्यासाठी आपले गाव “जातमुक्त गाव” म्हणून घोषित करणे अत्यंत आवश्यक आहे असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केल्यावर सरपंच शरद आरगडे यांनी गाव जातमुक्तीचा ठराव मांडला. बाबासाहेब बोधक यांनी अनुमोदन दिल्यानंतर ठराव मंजुर केले. ग्रामपंचायत अधिकारी प्रतिभा पिसोटे, उपसरपंच भिवसेन गरड, गणेश आरगडे, हरिभाऊ आरगडे, बाळासाहेब बोधक, बाबासाहेब बोधक, अमीनभाई सय्यद, छगन सय्यद, सचिन अरगडे, कृष्णा चामुटे, गणेश महाराज आरगडे, हरीश बोधक, बाबासाहेब आरगडे, भारत तारकस, सोमनाथ आरगडे, बाळासाहेब आरगडे, श्रद्धा आरगडे, राणी आरगडे, मनीषा गरड, नंदा आढागळे, कावेरी आढागळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते

————————.
सौंदाळा गावांने कायम समाजीक सलोखा विविध उपक्रम राबवत आहेत. गावांत कोणी शिवी दिली तर दंड आकारणी, विद्यार्थ्यांच्या हितासाठी सायंकाळी दोन तास मोबाईल वापरास बंदी, अल्पसंख्याक, गरिब कुटू्बातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत असे वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. आता आम्ही गाव जातमुक्त कऱण्याची घोषणा केली आहे.

शरद आरगडे, सरपंच, सौंदाळा ता. नेवासा

The village of Saundala has consistently promoted social harmony by implementing various initiatives. These include imposing fines for using abusive language, banning mobile phone use for two hours in the evening for the benefit of students, and providing financial assistance for the education of students from minority and poor families. Now, we have declared our village to be caste-free.

  • Sharad Argade, Sarpanch, Saundala, Nevasa Taluka

———————-
ग्रामसभेतील ठराव

  • आंतरजातीय विवाह होतील, त्यासाठी सर्व मदत केली जाईल.
  • गावांत जात, पंथ, धर्म, वंश याबाबत भेदभाव केला जाणार नाही.
  • सर्व नागरिक समान आहेत. “माझी जात – मानव” ही भावना स्वीकारली.
  • सार्वजनिक ठिकाणे, शासकीय योजना, ग्रामपंचायत सेवा, सामाजिक-धार्मिक कार्यक्रम, विवाह, सण-उत्सवात जातीभेद पूर्णपणे बंद.
  • कोणतीही जातनिहाय प्रथा, भेदभाव, बहिष्कार, अस्पृश्यता, सामाजिक अन्याय आढळल्यास ग्रामसभा/ग्रामपंचायत त्यावर तत्काळ कारवाई करेल.
  • सौंदळा गाव “जातमुक्त गाव” म्हणून घोषित करण्यात येत आहे. तसे फलक लावण्यात येतील.
  • हा ठराव शासनाकडे व संबंधित विभागांकडे नोंदवहीसाठी पाठविण्यात यावा.
  • पाणीपुरवठा, मंदिरे, स्मशानभूमी, शाळा, ग्रामपंचायत कार्यालय इतर सर्वासाठी हक्काने खुली असतील.
  • जातीय सलोखा, समता व बंधुता याबाबत जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतील
  • गाव “जातमुक्त गाव” म्हणून अधिकृतपणे घोषित करून त्यासंदर्भातील फलक लावण्यात येईल
  • सोशल मिडियावर जाती भेदभावबाबत संदेश करणार नाही. कुणाला करुही देणार नाही
  • शासनाच्या समता व सामाजिक न्याय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल

Leave a Comment