“जोगेश्वरी ” चा पुरग्रस्तांना मायेचा ओलावा…!

“जोगेश्वरी ” चा पुरग्रस्तांना मायेचा ओलावा…!
  • शिरूर कासार तालुक्यातील चारशे आपत्तीग्रस्तांना मदत

शिरूर कासार (जि. बीड ) ः अतिवृष्टी आणि पुराने दिवाळीच्या तोंडावर प्रचंड नुकसान झाल्याने हातबल झालेल्या शिरूर कासार तालुक्यातील शेतकरी कुटुंबांना पुण्यातील जोगेश्वरी मिसळ उद्योग समूहाने मायेचा ओलावा दिला आहे. “जोगेश्वरी ” चा पुरग्रस्तांना मायेचा ओलावाशिरूर कासार (जि. बीड ) ः अतिवृष्टी आणि पुराने दिवाळीच्या तोंडावर प्रचंड नुकसान झाल्याने हातबल झालेल्या बीड जिल्ह्यातील शिरुर कासार तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी कुटुंबांना पुण्यातील “जोगेश्वरी” मिसळ उद्योग समूहाने मायेचा ओलावा दिला आहे. “जोगेश्वरी” मिसळ उद्योग समूहाचे अध्यक्ष सचिन हरगुडे व नितीन हरगुडे यांच्या पुढाकारातून दिवाळीनिमित्त शिरूर कासार (जि. बीड) तालुक्यातील पुरग्रस्त ४०० शेतकरी कुटुंबांना  प्रत्येकी तीन हजार रुपये किंमतीचे किराणा साहित्य वाटप केले आहे. राज्यभरात जोगेश्वरी मिसळ (Jogeshwari Misal) कडून सुमारे दीड हजार कुटुंबांना साहित्य भेट दिले आहे.  

(On the initiative of Sachin Hargude and Nitin Hargude, presidents of “Jogeshwari” Misal Udyog Group, 400 flood-affected farmer families of Shirur Kasar (District Beed) taluk have been distributed groceries worth Rs. 3,000 each. Around one and a half thousand families have been gifted materials from Jogeshwari Misal across the state.)

बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यासह अनेक भागात अतिवृष्टी पुराने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. सिंदफना नदीसह सर्व नद्यांना पूर आल्याने नदीकाठची शेती पिके वाहून गेलीच, परंतु नदीकाठी असलेल्या शेकडो कुटुंबाच्या घरात पाणी शिरून संसार उपयोगी साहित्याची झाली हानी झाली. ऐन दिवाळीच्या अनेक शेतकऱ्यांच्या तोंडचा खास हिरावला आहे. शेतकरी तसेच पुराने नुकसान झालेले अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली. दिवाळीच्या तोंडावर आपत्ती आल्याने दिवाळीवर सावट आहे. अशा काळामध्ये पुण्यातील “जोगेश्वरी” मिसळ उद्योग समूहाने शेतकऱ्यांना मायेचा ओलावा दिला आहे. जोगेश्वरी उद्योग समूहातर्फे राज्यातील दीड हजार पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी तीन हजार रुपयाचे किराणा साहित्य भेट देण्यात आले. बुधवारी शिरूर कासार जिल्हा बीड येथील कानिफनाथ संस्थान येथे बुधवारी (ता. १५) मठाधिपती श्रीरंग स्वामी तळेकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला जोगेश्वरी उद्योग समूहाचे (Jogeshwari Misal) अध्यक्ष सचिन लहु हरगुडे व नितीन लहु हरगुडे, निरंजन सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयेश कासट, भीमाबाई कासट, मोहन नाना हरगुडे, आर्यन हिरामण हरगुडे नवनाथ कांचन, अनिल किसन हरगुडे सुयोग पवार, आयुष लोखंडे, अनिकेत शेळखंडे, श्रीकांत वडगावकर, अविनाश गायकवाड, प्रणव गायकवाड, राहुल चव्हाण अविनाश मोरे, आकाश मिस्कीन, संतोष आवारे, आकाश तरवडे आदी उपस्थित होते. (Sachin Lahu Hargude and Nitin Lahu Hargude, Founder President of Niranjan Sevabhavi Sansthan Jayesh Kast, Bhimabai Kast, Mohan Nana Hargude, Aryan Hiraman Hargude Navnath Kanchan, Anil Kisan Hargude Suyog Pawar, Ayush Lokhande, Aniket Shelkhande, Srikanth Vadgaonkar, Avinash Gaikwad, Pranav Gaikwad, Rahul Chavan Avinash More, Akash Miskin, Santosh Aware, Akash Tarvade etc. were present.)

यावेळी बोलताना सचिन हरगुडे म्हणाले मी शेतकरी कुटुंबातील आहे शेतकऱ्यांना मदत करणे हे आमचे काम आहे सामाजिक भावना जोपासून आम्ही जेव्हा जेव्हा शेतकऱ्यावर संकटे येतील तेव्हा उभे राहू. शेतकऱ्यांच्या झालेल्या व्यथा  पाहून आमच्या बंधूंचा वाढदिवस साजरा न करता सामाजिक जबाबदारीतून शेतकऱ्यांना मदत केल्याचे आम्हाला समाधान आहे असे नितीन हरगुडे यांनी सांगितले. दिवाळीच्या तोंडावर मदतीचा हात मिळाल्याने पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.  

——

” आम्ही शेतकरी कुटुंबातील आहोत. पूर नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्या शेतकरी कष्टकऱ्यांना आधार देणे ही आमची जबाबदारी समजतो.  या भावनेतून व सामाजिक जबाबदारी समजून “जोगेश्वरी” मिसळ परिवारातर्फे महाराष्ट्रातील दीड हजार कुटुंबाला दिवाळीनिमित्त आवश्यक साहित्याची भेट दिली आहे. संकट ओढावलेल्या कुटुंबाच्या मदतीसाठी आम्ही नेहमी पुढाकार घेतो. 

  • सचीन हरगुडे, संस्थापक अध्यक्ष, जोगेश्वरी मिसळ उद्योग समूह, पुणे

—— 

शेतकरी कष्टकरी कुटुंबावर निसर्गाच्या संकटाने आपत्ती कोसळली अशा काळात शेतकरयांची दिवाळी गोड होण्यासाठी जोगेश्वरी मिसळ उद्योग समूहाचे सचिन हरगुडे व नितीन हरगुडे या बंधूंनी सामाजिक भावनेतून पूरग्रस्तांना दिवाळीनिमित्त साहित्य वाटप केले ही प्रत्येकांसाठी अभिमानाची बाब आहे.  निरंजन सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून पूरग्रस्तांना आधार देण्याचे काम करत असल्याचा आनंद आहे. 

  • जयेश कासट, संस्थापक अध्यक्ष, पुणे. 

—–

Related posts

Leave a Comment