मनोज जरांगे मायभूमी मातोरीत भावूक

मोतारी (जि. बीड ः ‘‘मी अनेक वर्षापासून मराठा समाजासाठी काम करतोय. प्रत्येक मराठा कुटूंब हे माझे कुटूंब आहे. कोट्यावधी मराठ्यांनी पाठबळ दिलय, आता मी माघे हटत नाही. मी असेन, नसेन लढा सुरु ठेवा,’’ असे सांगत मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील मायभूमी ‘मातोरी’त भावूक झाले. आई-वडील, भाऊ यांच्यासह सगेसोयरे, मित्रांनी गावांत स्वागत केले. महिलांनी औक्षण केले. मातोरीहून नगरला निघताना आई-वडील, भावांसह गावकरी पाहून मनोज जरांगे पाटील यांचे हृदय भरुन आल्याचे पहायला मिळाले. Manoj Jarange Patil, Maratha reservation, welcome to Morcha Mumbai

मराठा समाजाच्या समाजाच्या आऱक्षणासाठी लढा सुरु असून लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil, लाखो मराठा समाजासोबत मुंबईत अमरण उपोषण करण्यासाठी जात आहेत. काल (शनिवारी ता. २०) आंतरवली सराटीहून (जि. जालना) रॅली गेवराई मार्गे कल्‍याण-विशाखापट्टम राष्‍ट्रीय महामार्गावरुन नगरकडे येत आहे. याच मार्गावर नगर जिल्ह्याला लागून जरांगे यांचे मुळ मातोरी (ता. शिरुर कासार) याच मार्गावर आहे. जरांगे समर्थ सहकारी साखऱ कारखाना परिसरात मोहितेनगर येथे कुटूंबासह वास्तव्‍याला असले तरी मोतोरीतच बालपण, समाजीक चळवळीला येथूनच सुरवात केली. रॅलीचा पहिला मुक्काम शनिवारी (ता. २०) मातोरी होता. जागोजागी स्वागत स्विकारून रात्री एक वाजता जरांगे मायभूमी मातोरीत आले. आष्टी, पाटोदा, शिरुर कासार तालुक्यातील मराठा समाजाकडून ३५० क्विंटल बुंदीसह, भाकरी, भाज्या अशा वेगवेगळ्या माध्यमातून पाच लाखापेक्षा अधिक लोकांच्या जेवनाची सोय केली. गावांत आल्यावर कुटूंबातील, गावांतील महिलांनी औक्षण केले. रात्री दिड वाजता गावकऱ्यांसमोर भाषण केले. आज (रविवारी) सकाळीही आई-वडील, भाऊ यांच्यासह सगेसोयरे, मित्र वाटे लावायला होते. गावच्या आठवणी, लोकांचे प्रेम पाहून जरांगे भावूक झाले. इथंच वाढलोय, येथूनच समाजकामाची सुरवात केली. कुटूंबाला बाजुला सारुन समाज म्हणून काम करतोय, सारा समाज, सारी गावे माझी आहेत. मराठा समाजाचा माझ्यावर विश्वास ठेवल्याने बळ मिळाल्याची भावना व्यक्त केली.

अजित पवारावर पुन्हा निशाना

मनोज जरांगे पाटील म्हणाले, शासकीय नोंदी साप़डल्या, त्यांना संविधानाप्रमाणे आरक्षण दिले पाहिजे. हे सरकारचे काम आहे. अजित पवार मात्र बोलून समाजात रोष निर्माण करत आहेत, त्यांना यात काय मोठेपण आहे तेच कळत नाही. त्याच तोडगा कसा काढता येईल, समाज्यस्यांने मार्ग काढण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे. सत्ता येते, जाते पण एककदा का लोकांच्या मनात एखादी व्यक्ती बसली तर ती कायम मानातून उतरते असे सांगत अजित पवारांवर निशाना साधला.

पुन्हा गावबंदीची शक्यता
मनोज जरांगे म्हणाले, आम्हाला सांगतात मुंबईत येऊ नका, मुंबईला येऊ नका म्हणजे काय, दादागिरी भाषा कशाला, तुम्ही पिढीन पार मुंबईत काय करता आम्ही कधी विचारले का, आम्हाला आरक्षण द्यायचे नसेल तर तुम्हीच आमच्या गावांत येऊ नका असा इशिरा दिला. म्हणजे पुन्हा पुढाऱ्यांना लोक गावबंदी करतात की काय अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.

Related posts

Leave a Comment