लोकसभेला अपक्ष उमेदवार ऊभे करायचेय….30 तारखेला उमेदवाराची होणार अधिकृत निर्णय

जालना : लोकसभा निवडणुकीला उमेदवार उभे करायचे की नाही, याचा निर्णय ३० मार्चला होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी याबाबत माहिती दिली. मराठा समाज इतर समाजाबरोबर गावागावात चर्चा करूण त्यांना विश्वासात घेऊन लोकसभा निवडणुकीत जिल्हात अपक्ष उमेदवार ऊभे करणार असल्याची चर्चा समाज बांधवांनी मनोज जरागे पाटील यांच्या सोबत केली. अंतरवाली सराटी येथे रविवारी झालेल्या बैठकीला राज्यातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. या वेळी समाज बांधवांनी आपले विचार येथे व्यक्त केले.
The members of the community discussed with Manoj Jarage that the Maratha community will discuss with other communities in the village and take them into confidence and field independent candidates in the district in the Lok Sabha elections.

आंतरवली सराटी येथे बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, मराठा समाज गाफील राहीला पाहीजे हि सरकारची भूमिका आहे. शासनाला अनेकवेळा संधी दिली, वेळ दिला उपयोग झाला नाही. सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी झाली नाही. समाजाचे आंदोलन झाले, राज्यात 57 लाख नोंदी मिळाल्या. आज प्रमाणपत्र देण्यासाठी अर्ज लोक करतात मात्र त्याला विलंब लावला जातो. समीती काय करते कळत नाही.
दाखल गुन्हे मागे घेतले नाही, खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. सत्तेचा गैरवापर सुरू केला, त्यामुळे नाराजी उसळली. दडपशाही सहन केली जाणार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यावर जरांगे यांनी जोरदार टिका केली.जेसीबी व वाहन चालकावर गुन्हे दाखल केले आहे. यवतमाळ जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी महीलांना बैठकीत येऊ नये करीता अडवले ,बसुन ठेवले होते हे योग्य नाही.
Jarange strongly criticized Devendra Fadnavis. A case has been registered against JCB and the driver. It is not correct that the Yavatmal District Superintendent of Police stopped the women from coming to the meeting and kept them sitting.

मुख्यमंत्री, गृहमंत्री हे समाजाला वेड्यात काढत आहेत. ज्यांना सावलीत बसवले त्यांना समाज उन्हात बसवणार आहे, 10 टक्के आरक्षण समाजाला मान्य नसल्याचे या वेळी हात उंच करूण समाजाने सांगीतले. आमच्या व्याख्यप्रमाणे सगे सोयरेची अंमलबजावणी करावी. तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे. राजकरण माझा मार्ग नाही. जन आंदोलनावर माझा विश्वास आहे. लोकसभा पेक्षा विधानसभामध्ये आपला आरक्षण विषय आहे.

अनेक उमेदवार उभे केले तर मताची विभागणी होईल. त्यापेक्षा अपक्ष म्हणून एकच उमेदवार द्यायचा, याबाबत गावगावांत बैठका घेऊन निर्णय घ्या, ३० तारखेला त्याबाबत अंतीम ठरवू असे जरांगे पाटील म्हणाले. यावेळी राज्यात मराठा समाज सर्व धर्मातील नागरीकांना विश्वासात घेऊन एकच अपक्ष उमेदवार देणार, मराठा समाज बांधवांनी गावा गावात बैठक घेऊन उमेदवारी कोणाला द्यायची यावर चर्चा करावी व ठरवावे, आरक्षणासाठी ज्यांनी विरोध केला त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या प्रचाराला, सभेला न जाण्याचे आवाहन करण्यात आले. गावागावात चर्चा करूण कोणाला उमेदवारी द्यायची याची घोषणा अंतरवाली सराटी येथे 30 तारखेला जाहीर करण्यात येणार, ठरलेला उमेदवार व समाजाचे मत हे 30 तारखेपर्यंत कळवण्यात यावे असे सांगून कसभामध्ये अपक्ष उमेदवार उभे करणार हा निर्णय समाजाचा, मी निवडणूक लढणार नसल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले.
Manoj Jarange said that the decision to field an independent candidate in the Kasabha is the decision of the community and that I will not contest the election.

Related posts

Leave a Comment