मुंबई ः महाविकास आघाडीसोबत जाऊन माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची भाषा करणारे माजी मंत्री महादेव जानकर यांनी अचानक यू टर्न घेत महायुतीसोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची भेट घेऊन निर्णय़ जाहीर केल्याचे सांगितले जात आहे. माढा लोकसभा मतदार संघात लढण्यात जानकर इच्छुक आहेत. मात्र तेथे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केलेली असल्याने महादेव जाणकर परभणीत लढणार असल्याचे बोलले जात आहे. शरद गटातून लढण्यासाठी मोहितेंची वाट यातून मोकळी झाल्याचे बोलले जात आहे. जानकरांचा ‘यू टर्न’ माढ्यात मोहिते पाटील यांच्या पथ्यावर पडणार का, याची चर्चा आता सुरू झाली आहे.
Former minister Mahadev Jankar, who had been talking about joining the Mahavikas Aghadi and contesting the election from the Madha Lok Sabha constituency, has taken a sudden U-turn and decided to stay with the Mahayuti. It is said that he met Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis and Ajit Pawar and announced the decision.
माढा लोकसभा मतदारसंघ सध्या राज्यभरात चर्चेत आहे. भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी जाहीर करुन एक पाऊल पुढे टाकले आहे. मात्र, निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करताच मोहिते पाटलांनी विरोधाचे हत्यार उपसले. सध्या मोहिते पाटील कुटुंबातील अनेक सदस्य माढा लोकसभा मतदारसंघात पायाला भिंगरी लावून फिरत आहेत.
भाजपने मागील पाच वर्षातील विकास कामांचा चढता आलेख पाहूनच विद्यामान खासदार निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर निंबाळकरांनी मतदार संघात गाठीभेटी आणि दौरे सुरु केले आहेत. मतदार संघातील सहापैकी शहाजी पाटील, बबन शिंदे, संजय शिंदे, राम सातपुते, जयकुमार गोरे या पाच आमदारांनी निंबाळकरांच्या पारड्यात आपले राजकीय वजन टाकले आहे. मात्र, वास्तव परिस्थितीही दुर्लक्षित करून चालणार नाही.
महाविकास आघाडीकडून विशेषतः शरद पवार यांनी निंबाळकरांच्या विरोधात सक्षम उमेदवार देण्याची तयारी चालवली होती. माढा मतदारसंघातील सामाजिक समीकरणं लक्षात घेऊन पवारांनी रासपचे नेते महादेव जानकर यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडण्याची तयारी दर्शविली होती. जानकर यांनीही शनिवारी शरद पवार आणि रामराजे यांचीही भेट घेऊन मदतीची विनंती केली होती. मात्र, त्यांच्या नावाला माढ्यातील पवार गटाच्या काही नेत्यांचा विरोध असल्याची चर्चा आज रंगली होती.
From the Mahavikas Aghadi, especially Sharad Pawar had prepared to field a capable candidate against Nimbalkar. Keeping in mind the social equations in Madha constituency, Pawar had shown his readiness to leave this constituency for Rasap leader Mahadev Jankar. Jankar also met Sharad Pawar and Ram Raje on Saturday and requested for help. However, there was a discussion today that some leaders of the Pawar group in Madhya were against his name.
जानकर यांना माढा देऊन बारामती सेफ करण्याचा पवारांचा निर्णय महायुतीच्या नेत्यांनी आज उलटवून लावला. जानकर यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर आपण महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. त्यामुळे पवारांची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे माढ्यातून आता कोणाला उमेदवारी द्यायाची, याचा पेच आता पवारांपुढे असणार आहे.
माढा लोकसभेसाठी भाजपकडून इच्छूक असलेले धैर्यशील मोहिते पाटील हे जरी मतदारसंघात फिरत असले तरी त्यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे. त्यांनी राजकीय भूमिका स्पष्ट केली नाही. धैर्यशील मोहिते पाटील हे प्रत्येक विधानसभा मतदार संघातील गावांना भेटी देवून स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेत आहेत. परंतु राजकीय भूमिका काय घेतली जाणार, हे मात्र त्यांच्याकडून सांगितले जात नाही. मोहिते पाटलांची भूमिका ठरत नसल्याने महाविकास आघाडीची उमेदवारीचा निर्णय लांबवणीवर पडत आहे, त्यामुळेच मोहिते पाटील काय भूमिका घेणार याकडे सोलापूरचे लक्ष असणार आहे.