लोकसभा निवडणूक ः बीड, नगरला १३ मे रोजी मतदान

लोकसभा निवडणूक ः बीड, नगरला १३ मे रोजी मतदान

मुंबई ः लोकसभा निवडणूकीचा बिगुल वाजला असून पाच टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होणार आहे. १३ मे रोजी नगर, बीड, शिर्डी येथे चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यातील प्रत्येक टप्प्यातील लोकसभा मतदार संघात निश्चित केले आहे. १९ एप्रिल रोजी पहिला टप्पा असून विदर्भात मतदान होईल.
The trumpet of the Lok Sabha elections has sounded and voting will be held in five phases in Maharashtra. The fourth phase of voting will be held in Nagar, Beed, Shirdi on May 13. It is fixed in the Lok Sabha constituencies in each stage of the state. The first phase is on April 19 and voting will be held in Vidarbha.

महाराष्ट्रात नऊ कोटी १२ लाख ४४ हजार ६७९ मतदार मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र असून हा आकडा विक्रमी आहे. या वेळी महाराष्ट्रात प्रथमच तब्बल पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. महाराष्ट्रात तापलेले राजकीय वातावरण लक्षात घेता मतदानाचे टप्पे सत्ताधारी आणि विरोधक या दोघांसाठीही प्रचाराला संधी मिळवून देणारे ठरणारे आहेत. महाराष्ट्रात या वेळी ९७ हजार ३२५ मतदान केंद्रे असतील.

असे आहे टप्पा निहाय मतदान
पहिला टप्पा – १९ एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा २६ एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा ७ मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा १३ मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा २० मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

Related posts

Leave a Comment