अहिल्यानगर शहर मतदार संघात थेट नागरिकांशी संवाद साधण्यावर उमेदवारांचा भर, चुरस अधिक वाढली

अहिल्यानगर शहर मतदार संघात थेट नागरिकांशी संवाद साधण्यावर उमेदवारांचा भर, चुरस अधिक वाढली

अहिल्यानगर ः (प्रतिनिधी) ः अहिल्यानगर जिल्ह्यात अहिल्यानगर शहर हा महत्त्वाचा विधानसभा मतदार संघ आहे. क्षेत्रफळाच्या तुलनेत हा मतदार संघ लहान असल्याने थेट नागरिकांशी संवाद करणे सोपे आहे. त्यामुळे येथील उमेदवारांनी गाठीभेटी, प्रभात फेऱ्यांना प्राधान्य देत थेट नागरिकांशी संपर्क सुरू केला आहे.


अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर शहर हा विधानसभा मतदार संघ प्रामुख्याने महत्त्वाचा मानला जातो १९५१ सुरुवातीला अहमदनगर शहर आणि तालुक्याचा मिळून एक मतदार संघ होता. विठ्ठल कुटे हे या मतदार संघातील पहिले आमदार आहेत. १९५७ पासून अहमदनगर दक्षिण व अहमदनगर उत्तर असे दोन मतदार संघ झाले. दक्षिण मतदार संघात तालुका व नेवासा तालुक्यातील काही भाग तर उत्तरेत शहर व तालुक्यातील काही भाग समाविष्ट होता. २००९ पासून अहमदनगर शहर स्वतंत्र मतदार संघ झाला. तर नगर तालुका पारनेर, श्रीगोंदा व राहुरी या तीन मतदार संघात विभागला गेला.

अहिल्यानगर शहर स्वतंत्र मतदार संघ झाल्यावर चौथी निवडणूक होत असून या वेळी अभिषेक कळकमर (मविघा), उमाशंकर यादव (बसप), सचिन डफळ (मनसे), संग्राम जगताप (महायुती), शिवाजी डामळे (सैनिक समतापार्टी), हनीफ शेख (वंचित), उत्कर्ष गिते, गणेश कळमकर, किरण नामदेव-काळे, शशिकांत गाडे, प्रतीक बारसे, मंगल भुजबळ, सचीन राठोड, सुनील फुलसौंदर (अपक्ष) हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. महायुतीचे संग्राम जगताप हे अनेक महिन्यापासून निवडणुकीची तयारी केली आहे. महाविकास आघाडीचे अभिषेक कळमकर यांनीही थेट लोकांच्या भेटी घेत प्रचारात जोरदार मुसंडी मारली. अपक्ष उमेदवारी केलेल्या शशिकांत गाडे यांच्यासह शिवसेनेने कळमकर यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे. त्यांना लोकांचाही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. या वेळी अधिक गाजावाजा करण्यापेक्षा थेट लोकांशी संवाद साधण्यावर भर दिला जात असल्याने निवडणुकीत चुरस वाढत आहे. अभिषेक कळमकर यांनाही जनसंर्पकातून बऱ्यापैकी लोकांचा पाठिंबा मिळवला आहे. त्यामुळे जस जसे मतदान जवळ येत आहे तसतशी एकतर्फी वाटणारी निवडणूक चुरसीची होत असून महाविकास आघाडी व महायुतीत चुरस अधिक वाढत आहे.

After the Ahilyanagar city became a separate constituency, the fourth election is being held. This time Abhishek Kalkamar (Mavigha), Umashankar Yadav (BSP), Sachin Dafal (MNS), Sangram Jagtap (Mahayuti), Shivaji Damle (Sanik Samata Party), Hanif Sheikh (Vanchit), Utkarsh Gite, Ganesh Kalamkar, Kiran Namdev-Kale, Shashikant Gade, Prateek Barse, Mangal Bhujbal, Sachin Rathore, Sunil Phulsounder (Independent) are contesting the election. Mahayutti’s Sangram Jagtap has been preparing for the elections for several months. Abhishek Kalamkar of Mahavikas Aghadi also started campaigning by meeting people directly.

———–
आतापर्यंतचे आमदार
– अहमदनगर (उत्तर) ः प्रभाकर भापकर (१९५७ अपक्ष), बाळासाहेब नागवडे (१९६२, अपक्ष), के. बी. मस्के (काँग्रेस १९६७), किसानराव मस्के (काँग्रेस १९७२), मारुती शेळके (अपक्ष १९७८), मारुती शेळके (काँग्रेस १९८०), मारुती शेळके (काँग्रेस १९८५), मारुती शेळके (काँग्रेस १९९०), शिवाजी कर्डीले (अपक्ष १९९५), शिवाजी कर्डीले (अपक्ष १९९९), शिवाजी कर्डीले (राष्ट्रवादी काँग्रेस २००४)


अहमदनगर (दक्षिण) ः त्र्यंबक भारदे (१९५७ काँग्रेस), त्र्यंबक भारदे (काँग्रेस, १९६२), एस. व्ही. निसळ (काँग्रेस १९६७), नारायणदास बार्शिकर (अपक्ष, १९७२), कुमार सप्तर्षी (जनता पक्ष १९७८), असीर एस.एम.आय (काँग्रेस १९८०), दादासाहेब कळमकर (भारतीय काँग्रेस समाजवादी १९८५), अनिल राठोड (शिवसेना १९९०), अनिल राठोड (शिवसेना १९९५), अनिल राठोड (शिवसेना १९९९), अनिल राठोड (शिवसेना २००४)

अहमदनगर शहर ः अनिल राठोड (शिवसेना २००९), संग्राम जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस २०१४), संग्राम जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस २०१९)

—————————
आरक्षण चळवळीत मते कोणाला

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरू झालेल्या चळवळीत अहिल्यानगर शहरही सक्रिय सहभागी होते. येथील तरुणांसह ज्येष्ठ नागरिकही सातत्याने होणाऱ्या आरक्षण लढ्यात सहभागी होत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीत उमेदवार दिले नाहीत. मनोज जरांगे पाटील यांची सध्याची भूमिका पाहता मराठा समाज चळवळीतील कार्यकर्त्यांची मोठी मते कोणाच्या पारड्यात पडतात हेही अहिल्यानगरमधील विजयासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

Related posts

Leave a Comment