मस्साजोग (ता. केज, जि. बीड) ः अत्यंत निष्ठुर, थंड डोक्याने सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली. किरकोळ कारणावरुन एवढ्या नर्दयी पद्धतीने मारण्यापर्यत या लोकांची मजल जाते कशी, आऱोपीला तर सजा होईलच, पण त्यांना पाठबळ देणाऱे कोण आहेत याचा शोध लावा, त्यासाठी आरोपीला, पोलिसांना आलेल्या फोनचे डिटेल्स तपासा आणि आरोपीला पाठबळ देणाऱ्यालाही आरोपी केले पाहिजे. यात जाणीवपुर्वक दुर्लक्ष करणाऱ्या पोलिस व तेथील पोलिस अधिकाऱ्यांवर केवळ निलंबन नाही तर सेवेतून कायम मुक्त केले पाहिजे अशी मागणी भाजप नेते आमदार सुरेशअण्णा धस यांनी केली आहे. या प्रकरणातील आरोपींना सजा होईपर्यत पाठपुरावा करणार असल्याचे धस म्हणाले.
Sarpanch Santosh Deshmukh was killed in a very cruel and cold-hearted manner. How can these people go to such a level of cruelty to kill him for a minor reason? The accused will be punished, but find out who is supporting them. For this, the details of the phone calls made by the accused and the police should be checked and the person supporting the accused should also be made an accused. BJP leader MLA Suresh Anna Dhas has demanded that the police and the police officers who deliberately ignored this should not only be suspended but also be permanently relieved of their service. Dhas said that he will follow up until the accused in this case are punished
केज तालुक्यातील मस्साजोग येथील धडाडीचे सरपंच संतोश देशमुख यांची चार दिवसापुर्वी किरकोल कारणावरुन हत्या झाली. भाजप नेते आमदार सुरेशअण्णा धस यांनी गुरुवारी सकाळी मस्साजोग येथे भेट देऊन देशमुख कुटूंब आणि गावकऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. यवेळी गावकऱ्यांसमोर बोलताना आमदार सुरेश अण्णा धस म्हणाले, अजूनही या भागातील लोक दहशतीखाली आहे. पवनचक्की असलेल्या भागात दलालाचा सुळसुळाट झाला आहे. शेतकऱ्यांच्या जमीनी कमी पैशाने घेऊन त्या अधिक दराने कंपनीला विकायच्या हा धंदा हे लोक करतात. याआधी आष्टीतही या कंपन्या आलेल्या आहेत. तेथेही दलाल होते.
मात्र मी स्वतः पुढाकार घेऊन जिल्हाधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्याशी बैठका घेऊन शेतकऱ्यांना कमी दराने जाणार नाहीत. त्यासाठी पुढाकार घेतला आणि दलाली बंद केली. त्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या संपर्क. मी खंडणी मागणारे बंद केले. पाटोदा तालुक्यातह आता आलेय, पण मी काळजी घेतोय. नको तिथला हस्तक्षेप आमच्याही तालुक्यात झाला आहे. मस्साजोग गावाच्या शिवारात कोणी गुंड येत असतील, वाचमनला मारत असतील आणि सरपंच सांगत असेल तर त्याचा व्हिडीओ काढून व्हायरल करायचा. सरपंचाला उघड नागडं करु मारु अशी भाषा वापरायची, हे काय चाललय.
पोलिसांनी वाचमन, कंपनीच्या अधिकाऱयांच्या तक्रारीचा गुन्हा दाखल केला गेला नाही. खरं तर केज पोलिस स्टेशन नव्हे गुंडाचा अड्डा आहे. अशी शंका येतेय. आधीच कारवाई केली असती तर सरपंच संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता. आरोपी सागंतात ती पद्धत पाहिली तर अत्यंत क्रुर पदधतीने संतोश यांना मारले आहे. पोलिसांना सांगूनही त्यांनी दुर्लक्ष केले. पोलिसांनी फोनाफोनी कऱणारा त्यांचा मोरक्या धरला असता तर हा प्रकार घडला नसता. गावकऱ्यांची मागणी आहे की स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी जबाबदार आहे. पोलिसांच्या व त्यांच्या वरिष्ठांच्या फोन डिटेल्स तपासले पाहिजे. शिवाय कोन्या आका, बाका ने फोन करुन सांगितले का, हे पहावे लागणार आहे. कारण कोण्यातरी आका च्या सपोर्टशिवाय हे झालेलं नाही. धमक्याची सतत भाषा असते. स्वतःच्या बापाचं राज्य असल्यासारखं वागत आहेत. मुंगी मारायची कोणाला अधिकार नाही. तुम्ही माणसं या पद्धतीने मारतात.
लोकांच्या गळ्यातीलल ताईत असलेल्या माणसाला तुम्ही मारता असा संताप व्यकत करत तपास साआयडीकडे न देता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे द्यावा. त्यात अतिरिक्त पोलिस अधिक्षकांचा तपास यंत्रणेत समावेश करावा अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांची गुप्त यंत्रणा काय करतेय, त्यांनी माहिती दिली असती तर ही घटना टाळता आली असती. येथील पोलिस स्टेशनचे पोलिस नोकरी करण्याच्या लायकीचे राहिले नाहीत. त्यांना केवळ निलंबित करुन चालणार नाही तर रिमो सर्व्हिस (कायम सेवेतून बडतर्फे) केले पहिजे अशी आमची मागणी आहे असे आमदार सुरेश अण्णा धस म्हणाले.
Expressing anger that you are killing a person who is a talisman in the people’s neck, the investigation should be handed over to senior officers instead of to the S.I.D. He demanded that additional superintendents of police be included in the investigation system. If they had given information about what the secret police are doing, this incident could have been avoided. The police of this police station are no longer fit to do their job. We demand that they should not only be suspended but also be given remo service (removed from permanent service),” said MLA Suresh Anna Dhas.
बीड जिल्ह्यात बिंदनामावलीप्रमाणे कर्मचारी नियुक्त नाहीत. बिंदुनामावलीनुसार जास्ती जेथे जास्ती लोक आहेत. त्यांच्या इतर जिल्ह्यात बदल्या करा. तरच हे थांबेल. बिदुनामावलीप्रमाणे कोणाचा हक्क हिरावला गेला जाऊ नये. २०१४ पर्यत मी हे होऊ दिले नाही. त्यानंतर हे स्पिडप्रमाणे झाल्याचे धस अण्णा म्हणाले. संतोष देशमुख यांच्या खुनाबाबत मी मुख्यमंत्र्यांना बोलेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणालाही पाठीशी घालणार नाहीत. आरोपीचे कोणाकोणासोबत फोटो आहेत त्याबाबत आजितदादा पवार यांनाही फोटो दाखवल्याचे धस अण्णा म्हणाले. .