नवी दिल्ली ः भारतात लोकसभेची निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. देशात १९ एप्रिल ते १ जून अशा ७ टप्प्यात मतदान होणार आहे. ४ जूनला मतमोजनी होईल. आज (शनिवारी) नवी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर लगेच देशभर अचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे रोजी राज्यात मतदान होणार आहे.
Voting will be held in 7 phases from April 19 to June 1 in the country. Counting of votes will take place on June 4. Today (Saturday) the code of conduct has been implemented across the country immediately after the press conference of the Central Election Commission in New Delhi. Voting will be held in five phases in Maharashtra. Voting will be held in the state on 19 April, 26 April, 7 May, 13 May, 20 May
केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी नव्वी दिल्लीतील विज्ञान भवनात पत्रकार परिषद घेऊन १८ व्या लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. भारतात जम्मू काश्मीर, १७ लोकसभेचा कार्यकाल १६ जून २०२४ ला संपतो आहे. त्यामुळे १७ जून नंतर नंतर देशात सरकार सत्तेवर येईल. Central Election Commissioner Rajeev Kumar has announced the program of the 18th Lok Sabha elections by holding a press conference at Vigyan Bhavan in New Delhi. In India, Jammu and Kashmir, the term of the 17th Lok Sabha ends on June 16, 2024. So after June 17, the government will come to power in the country.
जगात अनेक महत्वाच्या देशात निवडणूका होत आहेत, त्यात जगातील सर्वात मोठी व जिवंत लोकशाहीतील निवडणूक भारतात होत असून जास्तीत जास्त लोकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे अवाहन निवडणूक आयुक्तांनी केले आहे. देशात साडेदहा लाखाहून अधिक मतदाकेद्रें आहेत. शहरी आणि ग्रामीण मतदारापर्यत पोचण्याचा निवडणूक आयोगाने प्रयत्न केला आहे.
सव्वा वर्षात ११ वेगवेगळ्या राज्यात निवडणूका झाल्या. एकून ९७ कोटी नोंदणीकृत मतदार असून यंदा १.८२ कोटी नवमतदार आहेत. १८ ते २१ वयोगटात २१ कोटी ५० लाख मतदार आहेत. १०० वर्षावरील २ लाख मतदार आहेत. ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांच्या घरी जाऊन मतदान घेतले जाणार आहे. त्यासाठी फार्म १२ डी असेल, मतदान केंद्राच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, व्हिलचेअरसहग सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. महिलांचे मतदारांचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे.
काही राज्यात बळाचा व पैशाचा वापर होतो. तो रोखण्यासाठी शक्य त्या यंत्रणा वापरल्या जातील. मागील काळात असे गैरप्रकार रोखण्याला निवडणूक आयोगाला यश आलेले आहे. फुकट वाटल्या जाणाऱ्या गोष्टी, पैसे व अन्य बाबी रोखण्यासाठी यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. संशयीत व्यवहाराची माहिती बॅंके दररोज आम्हाला कळवतील. आतापर्यत दोन वर्षात ३ हजार ४०० कोटीची रक्कम अशा पद्धतीने जप्त केली आहे. Possible mechanisms will be used to prevent use of force, use of money. The Election Commission has been successful in preventing such malpractices in the past. The agencies have been ordered to be vigilant to prevent free things, money and other items. The Election Commission will also work to stop rumours, wrong posts being spread on social media.
सोशल मिडीयावर पसरवल्या जाणाऱ्या अफवा, चुकीच्या पोस्ट रोकण्यासाठीही निवडणूक आयोग काम करेल. अशा पोष्टची गंभीर दखल घेत त्या काढून टाकण्यासाठी यंत्रणा काम करेल. त्यासाठी राज्य पातळीवर अधिकारी असतील. आरोपाचा, भाषेचा घसरता स्थर पाहता त्याची तीव्रपणे दखल घेतली जाणार. आक्षेपार्ह वक्तव्य, द्वेष पसरवणारी भाषा प्रचारात नको असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहीराती रोखल्या जाणार आहेत.