विकासासाठी लढणारे नेतृत्व: बाळासाहेब थोरात साहेब

विकासासाठी लढणारे नेतृत्व: बाळासाहेब थोरात साहेब

अहमदनगर : कदाचित आजच्या तरुण पिढीला पूर्वीचे संगमनेर आठवत नसेल. मात्र आज दिसतो तसा हा तालुका पूर्वी विकसित नव्हता. दुष्काळी भाग असल्याने शेतकरी हलाखीचे जीवन जगत होते, औद्योगिक विकास नव्हता, कामासाठी तालुक्याबाहेर मोठ्या शहरात जावं लागायचं. पाठोपाठ रोजीरोटीची, मुलाबाळांच्या शिक्षणाची, आरोग्याची आणि शेतीचीही चिंता सर्वांना भेडसावत असे! Perhaps today’s young generation does not remember the Sangamner of yesteryear. But this taluka was not developed as seen today. Being a drought-stricken area, the farmers were living a miserable life, there was no industrial development, they had to go outside the taluk to big cities for work. After that everyone was faced with worries about livelihood, children’s education, health and agriculture

अशा अवस्थेतील संगमनेरला घडविण्याचा निर्धार बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat यांनी केला आणि संगमनेरचा सर्वांगीण विकास आपल्या आयुष्याचं ध्येय बनवून त्याच्या पूर्तीसाठी ते अविरत झटले. या त्यांच्या संघर्षाचे सर्व संगमनेरकर विशेषतः ज्येष्ठ लोक साक्षीदार राहिले आहेत. हा प्रवास सोपा नव्हता मात्र त्यांनी सर्वांना सोबत घेऊन सकारात्मक राजकारणाचा अवलंब करून आज जो विकास दिसतो तो घडविण्यात त्यांना यश आले. हे करताना त्यांनी जनसामान्यांच्या अडीअडचणी जाणून, त्यांच्याशी हितगुज करत प्रश्न सोडवण्यावर भर दिला. आपल्या मनमिळावू सहजस्वभावाने त्यांनी लोकांच्या मनात घर केले. लोक त्यांना आपल्या घरचा सदस्यच मानून त्यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन येतात. आणि साहेबदेखील त्यांना कधी नाराज करत नाही. त्यामुळेच आज संगमनेरकरांचं आणि साहेबांचं एक आगळंवेगळं जिव्हाळाचं नातं निर्माण झालं आहे. कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी सर्वांच्या हृदयात स्थान मिळविले.

बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat नीतिमत्तेला धरून राजकारण केलं, त्यांनी कधीच तात्कालिक सत्तेसाठी निष्ठा सोडली नाही, त्यांनी कधीच जनतेवर निर्णय लादले नाही, कधीच विरोधकांचा बंदोबस्त केला नाही, व्यापाऱ्यांना वेठीस धरले नाही, कायम जनतेच्या सोबत जनतेच्या हिताच्या भूमिका त्यांनी घेतल्या. कोणाचे काम अडवून धरले नाही, कोणाच्या व्यापार उद्योगाला त्रास दिला नाही. सर्वांना सोबत घेऊन अत्यंत सकारात्मक राजकारण करण्यावर त्यांचा भर राहिला. त्यामुळेच तालुक्यातील सहकार चळवळ आज राज्याला दिशा दाखवते आहे. सहकार कसा चालवायचा, तर आमदार बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat यांच्यासारखा, हे राज्यात आज अभिमानाने सांगितले जाते. राज्यातल्या अनेक मान्यवर संस्थांचे पदाधिकारी, अनेक मान्यवर मंडळी संगमनेरमध्ये येऊन सहकाराचा अभ्यास करतात. हे साहेबांच्या नेतृत्वाचं यश आहे.

सर्वात प्रथम संगमनेरचा सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना Maharishi Bhausaheb Thorat Sugar Factory of Sangamner आपला भाव नक्की करतो, भूमिका घेतो आणि त्यानंतर राज्यातले अन्य सहकारी साखर कारखाने आपले भाव जाहीर करायला सुरुवात करतात, आपल्या भूमिका घेतात! प्रत्येक वर्षी राज्य स्तरावरचा आणि राष्ट्रीय स्तरावरचा गुणवत्तेच्या बाबतीतील एक तरी पुरस्कार थोरात कारखान्याला मिळतो, हे देखील याच नेतृत्वाचं यश आहे. शेतकरी आणि दूध संस्था या दोघांच्याही हिताचा आणि विकासाचा विचार करणारा संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ राज्यात आदर्श ठरला आहे, राजहंस उत्पादन म्हणजे गुणवत्तेची हमी, हे आहे साहेबांचे नेतृत्व, राज्यातले सर्व शेतकी सहकारी संघ एकतर बंद पडलेत किंवा मोडकळीस आले आहेत, अशा वेळी संगमनेर तालुका शेतकी सहकारी संघ आदर्शरीत्या सुरु आहे, हे आहे इथल्या मातीतल्या नेतृत्वाचे यश! Sangamner taluka milk producer union has become a model in the state, swan production means quality assurance, this is the leadership of sir, all farmers cooperative unions in the state are either closed or broken, Sangamner taluka farmer cooperative union is running ideally, this is the leadership from the soil here. Success!

संगमनेर तालुक्यातील सर्व शासकीय इमारती बघा, प्रत्येक इमारत सुसज्ज, नीटनेटकी व देखणी, यामागे आहेत साहेबांचे परिश्रम! आर्थिक मंदीने सगळे मेटाकुटीला आले अशा वेळी संगमनेरचा व्यापार जोमाने उभा आहे, प्रत्येक वर्षी दिवाळीत संगमनेरच्या बाजारपेठेत चारशे ते पाचशे कोटी रुपयांची उलाढाल होते, हे आहे या मातीला मिळालेल्या सक्षम नेतृत्वाचे यश! छोट्या-मोठ्या मिळून संगमनेरमध्ये शेकडोहून अधिक पतसंस्था कार्यरत आहे आणि त्या सर्वांमध्ये मिळून हजारों कोटी रुपयांच्या ठेवी आहेत, संगमनेर करांचा विश्वासाला पात्र ठरलेले हे आहे साहेबांच्या आदर्श व्यवस्थापनाचे यश.

आपल्या राजकीय वाटचालीत साहेबांनी केलेल्या विकास कामांचा पसारा भव्यदिव्य डोंगराएवढा आहे. तालुक्यातील अनेक कामे त्यांच्या सक्षम नेतृत्वाची साक्ष देतात. सहज म्हणून आजूबाजूच्या तालुक्यांवर एक नजर मारा, संगमनेरची आणि त्या तालुक्यांची तुलना करा! जनजीवन बघा, तिथली माणसं बघा, शेतीवाडी बघा, व्यापार समजून घ्या, सामाजिक समरसता बघा. यातून नक्कीच आपल्या आजच्या समृद्ध आणि विकसित संगमनेरच्या विकासाची पाने उलगडत जातील. हा बदल सहज आणि एका दिवसात घडलेल्या नाही यामागे आहेत साहेबांचे निरंतर श्रम आणि नेतृत्व आणि सोबतीला संगमनेरकरांचा विश्वास.

आदरणीय साहेबांना वाढदिवसाच्या ग्रामसत्ता परिवारातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा..

Related posts

Leave a Comment