” वाटच बघतेत, मी कुठं गुततो ते, लई गैरवापर चालु हे सत्तेचा….” निलेश लंके यांचे राहुरीत हटके भाषण

” वाटच बघतेत, मी कुठं गुततो ते, लई गैरवापर चालु हे सत्तेचा….” निलेश लंके यांचे राहुरीत हटके भाषण


अहमदनगर (अहिल्यानगर), ः ” ते सांगायचं नाही, यंत्रणा-बिंत्रणा, तुमच्याकडे यंत्रणा आसन डब्याडुब्यावाली, कडू साहेबांच्या भाषेत, पण आमच्याकडे जिवाभावाची लोक निलेश लंके बरोबर आहेत. तेरा तारखेपर्यत पाच वाजेपर्यत एक फोन आला तरी यंत्रणा टाईट पाहिजे. महाराष्ट्राचा, भारताचा इतिहास आहे ज्या-ज्या वेळी क्रांतीकारण घराबाहेर पडले, त्यावेळी इंग्रजाला काढून दिले आणि भारत स्वतंत्र झाला, हे त लई सोप्पय, इंथ जनतेने निवडणूक हाती घेतली आहे. लई कंबरेच्या खाली टिका टिप्पनी करु नका, व्यक्तीगत जीवनावर घसरायचं नाही, निवडणूक निवडनुकीच्या पद्धतीने घ्यावी, आमचा काही तुम्हाला विरोध नाही. काचेच्या घरात राहतात हे विसरायचे नाही…” नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेंश लंके यांचे राहुरी येथे झालेले हटके, ग्रामीण बोलीभाषेतील भाषण चांगलेच चर्चेत आहे. हजारो लोक सोशल मिडीयावर हे भाषण एकत आहेत.  


Make comments below the waist, don’t want to get down on personal life, don’t forget that you live in a glass house… Mahavikas Aghadi’s candidate for Nagar Dakshin Lok Sabha constituency Nilensh Lanka’s speech in Rahuri in rural dialect is well discussed. Thousands of people have joined this speech on social media.

अहमदनगर (अहिल्यानगर) दक्षिण लोकसभा मतदार संघातील उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी राहुरी येथे शरद पवार यांची जाहीर सभा झाली. या सभेत झालेले निलेश लंके यांचे हटके भाषण उपस्थित लोकांना खुप भावले. खरं तर या सभेत सर्वाधिक चर्चा होत आहे ती निलेश लंके यांच्या भाषणाची. कार्यक्रम सुरु झाल्यानंतर साधारण अर्ध्या तासाने निलेश लंके यांचे व्यासपीठावर आगमन झाले. लंके आल्यावर माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांना भाषण थांबवावे लागले, लोकांनी लंके यांना पाहून मोठा जल्लोष केला.

लंके यांनी भाषणात ग्रामीण बोलीभाषेतील वाक्ये अनेकांना भावली, लंके म्हणाले, लोक म्हणतात, आपल्याला काय करायचे, देशाचे निवडणूकाचे, पण आपल्या भविष्याच्या विकासासाठी ही निवडणूक आहे. शेतकरी हिताचे कायदे करायचे असतील तर ही निवडणूक महत्वाची आहे. केंद्रीय सत्तेमुळे काही कायदे होत असतात. कृषीप्रधान भारत देशात सध्या कोण कृषीमंत्री आहे हे विचारले तर सांगता येत नाही. शरद पवार साहेबांनी कृषीमंत्री असताना अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले. शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम केले. सध्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या अधिक होत आहेत. आत्महत्या थांबण्यासाठी शेतीमालाला बाजारभाव मिळाला पाहिजे. पण सोयाबीन, कांदा, कापुसाची काय परिस्थिती आहे.


If you ask who is currently the agriculture minister in the country of agrarian India, it is impossible to say. Sharad Pawar saheb took many decisions in the interest of farmers when he was the agriculture minister. Worked to support farmers. At present, suicides of farmers are increasing. Agricultural produce should get market price to stop suicide. But what about soybean, onion, cotton?

शेतीला जोड व्यवसाय आहे त्या दुध व्यवसायाची परिस्थिती गंभीर आहे. पाण्याची बाटली वीस रुपयाला आणि दुधाला दर पंचवीस रुपये. कसा शेतकरी सुखी होईल. ज्यांना पाच वर्षात दिल्लीत पाठवलं त्यांनी एकही प्रश्न उपस्थित केला नाही. त्यांना एक सवय आहे. खोटं बोल पण रेटुन बोल, कांदा निर्यात बंदीबाबत त्यांचे एक उदाहरण लोकांन अनुभवले आहे. राहुरी भागात निळवंडे, नगर भागात साकळाई, शेवगाव भागात ताजनापुर हेच मुद्दे सांगून खोंट बोलतात. पन्नास साठ वर्षात एकही प्रकल्प आणला नाही. पंचवीस वर्ष नाव घेतल जाईल असे एकही प्रकल्प नाही. नगर- मनमाड रस्ता सुद्दा करता आला नाही. काय विकासाच्या गप्पा मारता.

मला म्हणता निलेश लंकेची गुंडगिरी मोडून काढू. अरे एक गुन्हा आहे. तो शेतकऱ्यांच्या कांद्यासाठी अंदोलन  केले होते. संदर्भ देता सुपा एमआयडीसीचा. उद्योग, स्थानिक कामगारांना संरक्षण दिलं. आज सुपा एमआयडीसी रांजणगाव, चाकणपेक्षा मोठी आहे. नुसते आरोप करता, चुकीचे सांगता. आशिया खंडातील पहिला साखर कारखाना प्रवरा कारखान्यावर किती कर्ज आहे. चांगल्या संस्था चालल्यातेथे बोटं घालतात. गणेश, राहुरीत लक्ष घातलं, तिथे काय केले. संस्था उभ्या करण्यापेक्षा त्या बंद पाडण्यावर भर दिला. आता अभि नही तो कभी नही. तुम्हाला इंग्रजी बोलणारा खासदार पाहिजे का काम करणारा. तुम्ही एकदा संधी द्या…जर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसद बंद पाडली नाही तर नाव बदलून ठेवील. निलेश लंके जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो. दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपुर कऱण्याची सवय आपली नाही.  


Do you want an English speaking MP who works? You give one chance…if the Parliament is not shut down on the issue of farmers, then the name will be changed. Nilesh Lanka does what he says and says what he does. We are not in the habit of pandering to someone else’s flag.

कोरना काळात काम केलं. घर ना घर वाचलं पाहिजे या भूमिकेतून काम केल. मी माझ्या लोकांसाठी शेवटच्या श्वासापर्यत काम करत राहणार असं ठरवलंय. त्याची चौकशी लावता. विकासाच्या मुद्यावर बोला. पाच वर्षात काय बदल घडवला हे सांगितलं पाहिजे. प्राजक्त तनपुरे आणि माझी शोलेची
तेरा तारखेपर्यत माझे हात गुतलेले आहेत. वाटच बघतेत, मी कुठ गुततो ते, लई गैरवापर चालु आहे सत्तेचा, मला तर तेरा तारखेपर्यत जेलमध्येच टाकतील.

पण सगळा हिशाब-किताब चुकता होईल….हे गुंडगिरी-बिंडगिरी हे सगळं उकळून पेलोय भाऊ. २०१० ला ग्रामपंचायत सदस्य, त्यानंतर सरपंच, २०१४ ला पंचायत समिती सदस्य, उपसभापती, २०१७ जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा नियोजन समितीचा सदस्य आणि २०१९ आमदार आणि २०२४ ला थेट खासदार  झालो. हे सगंळ काय फुकट आहे का, ….लई कंबरेच्या खाली टिका टिप्पनी करू नका. , व्यक्तीगत जीवनावर घसरायचं नाही, काचेच्या घरात राहतात हे विसरायचे नाही…संयमाने राजकारण घ्यायचे, आमचा तुम्हाला काही विरोध नाही. मी सयंमी आणि पवार साहेबांचा मावळा आहे. मी चुकलो तर पवार साहेब गाडीत घालूनच नेतील. हेडमास्तर कसा आहे. पावर इज द पवार. आता केंद्रात थेट महाविकास आघाडीचे सरकार.

Related posts

Leave a Comment