पारनेर :प्रतिनिधी
जिवा भावाचे सहकारी असतील तर पैसे कशाला लागतात असा सवाल करतानाच बिगर पैशावाल्यामुळे पैशावाल्याला घाम फुटलाय. पैशावाले फार आहेत.पैशावाले पैशावाल्यांना घाबरत नाहीत,बिगर पैशावाल्यामुळे त्यांना झोपही लागत नाही असे सांगत आमदार नीलेश लंके यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त कामोठे येथे आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमेळाव्यात आ. नीलेश लंके यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी पारनेर-नगर मतदारसंघातील विविध नागरीकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. वाळवणे येथील रहिवासी पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांना पोलीस विभागातील सेवेबद्दल, वैद्यकीय क्षेत्रातील सेवेबद्दल डिकसळ येथील डॉ. बाळकृष्ण अडसूळ तसेच रेनवडी येथील डॉ.राजेंद्र डेरे, शिक्षण क्षेत्रातील कामगिरीबद्दल रूईछत्रपती येथील गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे, उद्योग क्षेत्रातील कार्याबद्दल म्हस्केवाडी येथील गोविंद साबळे, प्रशासकीय सेवेतील कार्याबद्दल दरोडीचे किसन पावडे यांना आ. लंके यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना आ. लंके म्हणाले, चार साडेचार वर्षापूर्वी तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने मला आमदारकीची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. माझ्या विजयामध्ये मुंबईकरांचा सिंहाचा वाटा आहे, हे मी कधी विसरणार नाही. माझ्या प्रत्येक अडचणीच्या काळात माझा मुंबईतील सहकारी गावाकडे आला. गावाकडे थांबून दोन रूपये खर्चही केले. मी साठ हजार मतांच्या फरकाने विजयी झालो त्याचे श्रेय मुंबईकरांना जात असल्याचे आ. लंके यांनी कृतज्ञतापुर्वक नमुद केले.
लंके पुढे म्हणाले, मुुंबईमधील सहकाऱ्यांमध्ये नेहमीच तत्परता पहावयास मिळते. कोरोना संकटात जीवा भावाच्या सहकाऱ्यांनी मोठे काम केले. मी भाग्यवान आहे मला जीवा भावाचे सवंगडी मिळाले. माझ्या आई वडिलांप्रमाणेच जीवापाड प्रेम करणारे सहकारी मला मिळाले.
राजकारण, समाजकारण होत असते. मात्र समाजाची बांधीलकी महत्वाची असते असे लंके यांनी सांगितले.
यावेळी राणीताई लंके,सुदाम पवार,बाबासाहेब तरटे,बाळासाहेब खिलारी, बापू शिर्के कारभारी पोटघन ,राहुल झावरे, दिपक आण्णा लंके , दादा शिंदे , जितेश सरडे , श्रीकांत चौरे , पारनेर नगरपंचायतचे सर्व नगरसेवक, सुभाष कावरे ,पुनम मुंगसे, राजेश्वरी कोठावळे,सुवर्णा धाडगे,उमाताई बोरूडे, अशोक घुले,नाना करंजुले, अभयसिंह नांगरे,कैलासशेठ धाडगे,अर्जुन भालेकर,
संभाजी रोहोकले,नितीन अडसुळ, नंदकुमार देशमुख डॉ.कावरे,सुनील काळभोर,बाळा पुंडे, अर्जुन डांगे,चंद्रकांत नवले, स्वप्नील चौधरी, भाऊ पावडे,नितीन चिकणे, गोपीनाथ पठारे, कैलास पावडे, आहेर सर, प्रसाद नवले, दिनेश घोलप निलेश शिंदे स्वप्निल चौधरी, संदीप चौधरी , आर आर राजदेव निवृत्ती गाडगे,यांच्यासह हजारो नगरकर यावेळी उपस्थित होते.
▪️विक्रमी गर्दी
या मेळाव्यासाठी कामोठे येथील विद्यलयाच्या प्रांगणामध्ये विक्रमी गर्दी झाली होती. सर्व खुर्चा महिलांनी व्यापल्याने पुरूषांना उभे राहूनच मेळाव्यात सहभाग नोंदवावा लागला. सुप्याहून रॅलीने निघालेल्या आ. नीलेश लंके यांचे शिरूरपासूनच मोठया उत्साहाने स्वागत करण्यात येत होते. कामोठे येथे पोहचल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात तसेच फटक्यांच्या आतिषबाजीत आ. लंके यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली होती.
▪️चौकट
चित्रफित आणि पुस्तक
कोरोना काळात आम्ही केलेल्या कामाची चित्रफीत तालुक्यातीलच काही सहकाऱ्यांनी तयार केली असून लवकरच ती प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे सांगतानाच मी अनुभवलेला कोव्हिड या विषयावर आपण एक पुस्तकही लिहीले असल्याचे आ. लंके यांनी सांगितले.
▪️चौकट
निःस्वार्थ भावनेने माणसे कमविली
प्रतिष्ठाणच्या वर्धापनदिनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सहका-यांनी हजेरी लावली हे माझे भाग्य आहे. मी नांदेड, सिंधूदुर्गला गेलो तर फार लांब आलोय असे वाटत नाही, मतदारसंघातच फिरतो आहे असे वाटते. राज्यात कोठेही गेलो तरी शंभर दोनशे लोक जमा होतात. यापेक्षा वेगळे काय हवे ? निःस्वार्थी भावनेने काम केले तर माणसे जोडली जातात.
▪️चौकट
राजयोग असेल तर
राजकाणात काय व्हायचे ते होईल. बऱ्याच लोकांनी तर्क, वितर्क काढले. २०२४ चे रणशिंग मुंबईमधून फुंकणार. लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा करणार. राजकारण सुरू असते. समयसे पहिले और भाग्यसे अधिक किसीको कुछ नही मिलता. राजयोग असेल तर झोपेत असेल तरी मिळेल. काहींनी रात्रंदिवस आपटली तरी काहीच होत नाही. हे महत्वाचे आहे. काय व्हायचे ते होईल. एव्हडे मिळाले तेच बोनस मिळाले आहे. मी कधी स्वप्नातही पाहिले नव्हते की ग्रामपंचायत सदस्य होईल. आमदार झालो. साडेचार वर्षे झाले तरी आजही विश्वास बसत नाही आमदार आहे म्हणून. ही सगळी तुमची कृपा असल्याचे लंके म्हणाले.
▪️चौकट
एक रूपयाही घरी नेला नाही
आमदार झाल्यापासून आतापर्यंत शंभर टक्के समाजासाठी जगलो आहे. एक रूपयाही घरी घेउन गेलेलो नाही. हे सगळयांना माहीती आहे. कोणी आरोप करीत असेल की याची इकडे जमीन आहे, तिकडे जमीन आहे. त्यात काहीही तथ्य नाही. आमचा दादा दळवी स्वतः गाडी चालविण्याचे काम करतो अनेकदा स्वतःच डिझेलही टाकतो. तो काही गर्भश्रीमंत नाही. असेच लाखमोलाची माणसे आम्ही कमवली आहेत. मला चिंता नाही. काही कमविण्यापेक्षा लोकांसाठी काहीतरी केले पाहिजे, लोकांच्या हृदयावर राज्य केले पाहिजे हेच महत्वाचे असते असे लंके म्हणाले.
▪️चौकट
हे कुठे जाणार आहे ?
सध्या समाजा समाजात, जाती जातीमध्ये सध्या तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे. वेगळी भावना निर्माण झालेली आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. हे कुठे जाणार आहे ? शेतकरी, उद्योजक यांचीही नाराजी पहावयास मिळत असल्याबद्दल आ. लंके यांनी खंत व्यक्त केली.