नवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाने उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेत १९५ लोकसभा उमेदवारांची पहिली जम्बो यादी जाहीर केली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचा पारंपरिक बालेकिल्ला असणाऱ्या वाराणसीतून तिसऱ्यांदा मैदानात उतरले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना कोटा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान ३४ मंत्र्यांना लोकसभेच्या रणांगणात उतरविण्यात आले आहे. महाराष्ट्रातून अजून एकही उमेदवार जाहीर केला नाही.
Taking the lead in announcing candidates, the Bharatiya Janata Party announced the first jumbo list of 195 Lok Sabha candidates. In this, Prime Minister Narendra Modi has entered the fray for the third time from his traditional stronghold of Varanasi. Lok Sabha Speaker Om Birla has been nominated from Kota constituency. The existing 34 ministers in the Union Cabinet have been fielded in the battlefield of the Lok Sabha. No candidate has been announced from Maharashtra yet.
भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या लोकसभा उमेदवारांत अनेक ठिकाणची उमेदवार बदलले आहेत. भाकरी फिरविली. दिल्लीतील सातपैकी चार खासदारांच्या उमेदवारी कापण्यात आली आहे. भोपाळच्या वादग्रस्त खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली आहे. केंद्रीय परराष्ट्रव्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी, वाद्ग्रस्त खासदार रमेश बिधुडी यांना तिकीट देण्यात आलेले नाही. गेल्या २९ फेब्रुवारीला भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या बैठकीत १६ राज्ये व २ केंद्रशासित प्रदेशातील १९५ उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. नव्या उमेदवारांमध्ये तरुणाईचा समावेश केला असून आज जाहीर झालेल्या उमेदवारांमध्ये ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेले ४७ उमेदवार आहेत. आज जाहीर झालेल्या जागांमध्ये सर्वाधिक ५१ जागा एकट्या उत्तरप्रदेशातील आहेत. त्यापाठोपाठ मध्यप्रदेशातून २४ जागांची घोषणा करण्यात आली. आज जाहीर झालेल्या यादीत अपेक्षेप्रमाणे मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, माजी मुख्यमंत्री विप्लव देव, खासदार सरोज पांडे यांचा प्रामुख्याने समावेश आहे
भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवाराच्या पहिल्या यादीत राजनाथसिंह – लखनौ (उत्तरप्रदेश), २. अमित शहा – गांधीनगर (गुजरात), ३. किरण रिजिजू – अरुणाचल पश्चिम (अरुणाचल प्रदेश), ४.सर्वानंद सोनोवाल – दिब्रुगड (आसाम), ५. श्रीपाद नाईक – उत्तर गोवा (गोवा), ६. पुरुषोत्तम रुपाला – राजकोट, ७. मनसुखभाई मंडाविया – पोरबंदर, ८. देवुसिंह चौहान – खेडा (सर्व गुजरात), ९. जितेंद्र सिंह – उधमपूर (जम्मू व काश्मीर), १०. श्रीमती अन्नपूर्णा देवी – कोडरम, ११ अर्जुन मुंडा – खुंटी (दोन्ही झारखंड), १२. व्ही मुरलीधर – अट्टिंगल, १३. राजीव चंद्रशेखर – तिरुअनंतपुरम (दोन्ही केरळ), १४. ज्योतिरादित्य शिंदे – गुना, १५. फग्गनसिंग कुलस्ते – मंडला (दोन्ही मध्यप्रदेश), १६. अर्जुनराम मेघवाल – बिकानेर, १७. भूपेंद्र यादव – अलवर, १८. गजेंद्रसिंह शेखावत – जोधपूर, १९. कैलाश चौधरी – बाडमेर (सर्व राजस्थान), २०. जी. किशन रेड्डी – सिकंदराबाद (तेलंगण), २१. अजय भट्ट – नैनीताल (उत्तराखंड), २२. अजय मिश्रा टेनी – खेरी, २३. कौशल किशोर- मोहनलाल गंज, २४. स्मृती इराणी – अमेठी, २५. साध्वी निरंजन ज्योती – फतेहपूर, २६. पंकज चौधरी – महाराजगंज, २७. महेंद्रनाथ पांडे – चंदौली (सर्व उत्तरप्रदेश), २८. निशिथ प्रामाणिक – कूचबिहार २९. शांतनु ठाकूर – बनगाव, ३०. सुभाष सरकार – बांकुडा (सर्व पश्चिम बंगाल), ३१. संजय बालियान – मुझफ्फरनगर ( उत्तरप्रदेश) यांचा समावेश आहे
In the first list of candidates announced by the Bharatiya Janata Party, Rajnath Singh – Lucknow (Uttar Pradesh), 2. Amit Shah – Gandhinagar (Gujarat), 3. Kiran Rijiju – Arunachal West (Arunachal Pradesh), 4. Sarbananda Sonowal – Dibrugarh (Assam), 5. Sripad Naik – North Goa (Goa), 6. Purushottam Rupala – Rajkot, 7 Mansukhbhai Mandaviya – Porbandar, 8. Devusinh Chauhan – Kheda (All Gujarat), 9. Jitendra Singh – Udhampur (Jammu and Kashmir), 10. Mrs. Annapurna Devi – Kodaram,
मीनाक्षी लेखी – (नवी दिल्ली), साध्वी प्रज्ञा ठाकूर (भोपाळ), रमेश बिधुडी (दक्षिण दिल्ली), डॉ. हर्षवर्धन (चांदणी चौक), प्रवेश वर्मा (पश्चिम दिल्ली), कृष्णपाल सिंह यादव (गुना), ज्योत्स्ना महंत (कोरबा), रमाकांत भार्गव (विदिशा) यांना उमेदवारी मिळाली नाही.