सामान्य जनतेचा हक्काचा सेवक ः आमदार निलेश लंके

सामान्य जनतेचा हक्काचा सेवक ः आमदार निलेश लंके

पारनेर ः नगर तालुक्यातील सामाजिक, राजकीय,धार्मिक , शैक्षणिक , आध्यात्मिक पटलावर आजवर देशाच्या इतिहासात तालुक्याचे नाव सुवर्ण अक्षराने अजरामर करणारे अनेक कोहिनूर हिरे या तालुक्याच्या मातीने देशाला दिले आहे . त्या पुष्प मालेतील एक पुष्प म्हणजे आमदार निलेश ज्ञानदेव लंके ज्यांनी अल्पावधीतच महाराष्ट्राच्या इतिहासात आपल्या अभ्यासु कर्तुत्व व नेतृत्वाच्या बळावर जनसामान्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले व त्याचा प्रत्येय विधानसभा निवडणूक 2020 रोजी निकालाच्या दिवशी सुवर्ण पहाट घेऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत जनसामान्यांच्या मदतीने आमदार म्हणून पोहोचले व गोरगरीब जनतेच्या आशा-आकांक्षाला नवीन सोनेरी पालवी फुटली. हाच सर्वसामान्यांचा जननायक विक्रमादित्य आमदार लोकनेते निलेशजी लंके Nileshji Lanka यांनी मतदार संघाच्या इतिहासात प्रथमच 61 हजार मताचे माताधिक्य घेत धनशक्ती विरोधात जनशक्तीचा विजय काय असतो हे दाखवून दिले.

He reached the Legislative Assembly of Maharashtra as an MLA with the help of the masses and a new golden dawn broke out for the hopes and aspirations of the poor people. This is the common people’s leader Vikramaditya MLA People’s leader Nileshji Lanka for the first time in the history of the constituency by taking the majority of 61 thousand votes and showed what is the victory of people’s power against money power.

सामान्य जनता व प्रशासकीय अधिकारी वर्ग यांचा समन्वय साधत विधायक मार्गाने समाजकारण कसे करायचे व सामान्य मायबाप जनतेच्या विविध समस्या कशा सोडवायच्या याचे जिवंत उदाहरण जनता दरबाराच्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखवून दिले. युवा सहकारी यांच्या साथीने व वृद्ध मातापित्यांच्या मार्गदर्शना खाली जुन्या नव्याची सांगड घालून अभ्यासू व शिस्त पद्धती पद्धतीने वैचारिक देवाण-घेवाण करत समाजकारण करणारा अवलिया म्हणून जन मनातील युवा हृदय सम्राट म्हणून एक वेगळे स्थान निर्माण केले.

जे का रांजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले , तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा !!*

 या उक्तीप्रमाणे रंजल्या गांजल्या मध्ये देव पाहून सेवा कशी करायची ते आमदार लंके साहेबांकडूनच शिकावे . जनसेवेचे व परोपकारी मानवताधर्म काय असतो हे कुठल्या ग्रंथात किंवा अभ्यासात अनुभवयास मिळत नाही. तर या लोकनेत्याकडे पाहता त्याचा साक्षात्कार होतो . व आपणही समाजाचे काही देणे लागतो या जाणिवेतून दीनदुबळ्यांची सेवा करण्यासाठी आबालवृद्ध प्रेरित होतात हे फक्त या कार्यकुशल सम्राटाच्या कार्याकडे पाहता व ते आचरण अनेकांनी कृतीतही आणले आहे.

देशाचे भूषण पद्मभूषण अण्णासाहेब हजारे व देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विकासशील विचारांवर प्रेम करत असताना तालुक्यातील पुरोगामी विचारसरणीत बदल घडविण्याचे महान कार्य कोरोना काळात त्यांच्या हातून घडले आहे . तालुक्यातील घराणेशाहीचा मी माझा परिवार माझे नातेवाईक  हा स्वार्थी विचार घेऊन तालुक्याचे राजकारण न करता निस्वार्थी विचारधारा ठेवली व तीच त्यांना पोषक ठरली . व त्यातूनच या सर्वसामान्य नेतृत्वाचा जन्म झाला.  राजकारणा कडे तरुणांचा पाहण्याचा दृष्टिकोन हा गढूळ झाला होता. परंतु आमदार निलेश लंके यांच्या कार्यप्रणाली मुळे अनेक तरुण हे राजकारणाकडे आकर्षिले गेले व लोकनेत्याच्या संविधानिक लोकशाही मार्गाने राजकारण करत,.

पारनेर नगर मतदार संघात या राजकारणाच्या माध्यमातून जनसेवा करत आहे.माझ्या मतदारसंघात विकासात्मक बदल कसा घडविता येईल माझ्या माता-भगीणीच्या डोक्यावरील हंडा कसा उतरविता येईल? माझ्या बेरोजगार तरुणांना रोजगार कसा मिळविता येईल ? माझ्या माता-भगिनींना धार्मिक स्थळांची यात्रा मोफत कशी करता येईल ? निराधारांना आधार कसा देता येईल? शैक्षणिक क्रीडा साहित्य क्षेत्रात माझ्या तरुण बांधवांना व्यासपीठ कसे निर्माण करून देता येईल ? अधिकारी व सामान्य जनता यांचा समन्वय कसा साधता येईल? माझ्या मतदार संघातील दुष्काळी गावे कसे पाणीदार करता येतील या व या सारखी अनेक प्रश्नांवर तज्ज्ञ मार्गदर्शक व अधिकारी वर्गाचा सल्ला घेऊन, मंत्रालय पातळीवर पायाला भिगरी बांधून दिवसाची 18 तास जनसेवा करणारा जनसम्राट निलेशजी लंके यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहावयास मिळाला.

आमदार लोकनेते निलेश लंके यांच्या अंगी असणाऱ्या या सुप्त गुणामुळे हिऱ्याची पारख करणारे देशाचे जवाहिर आदरणीय शरद पवार साहेब यांनी त्यांना विक्रमादित्य, महाराष्ट्राला मिळालेला आर. आर. आबा अशा उपाधी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. हे पारनेर-नगर मतदार संघाला भूषणीय आहे.

Due to this latent quality of MLA People’s Leader Nilesh Lanka, the country’s jeweler Sharad Pawar Saheb, who is a diamond connoisseur, awarded him the R. Vikramaditya, Maharashtra. R. He glorified his work by giving him the title of Aba. It belongs to Parner-Nagar Constituency.

राजकीय वारसा व आर्थिक पाठबळ नसतानाही जनतेच्या आशीर्वादाने लोकवर्गणी जमा करत राज्याच्या विधानसभेत पोहोचणारे हे सर्वसामान्य नेतृत्व तरुणांची ऊर्जा बनवून त्यांच्या साथीने परिवर्तन नक्कीच घडविणार यात शंका नाही . अनेक वर्ष सख्या भावासारखे प्रेम देणारे आमदार लंके साहेबांनी श्रीकांत चौरे या छोटया कार्यकर्त्याला निलेश लंके प्रतिष्ठानचा जिल्हाध्यक्ष प्रसार माध्यम प्रमुख म्हणून कार्यरत असताना त्यांच्या गेले 30 वर्षा पासुनच्या सुख दुखा :च्या प्रत्येक पाहीरीवरील साक्षीदार होण्याची संधी मला मिळाली .

I got the opportunity to be a witness to every stage of happiness and misery since the last 30 years when MLA Lanka Saheb, who has given love like a brother for many years to Srikant Chaure, a young activist, was working as the District President of Nilesh Lanka Foundation and Head of Media.

त्यांच्या या सार्वभौम विचाराने मतदार संघात सकारात्मक परिवर्तन घडून माझा गरीब कार्यकर्ता हा ग्रामपंचायत सेवा सोसायट्या, पंचायत समिती, जिल्हा परिषद यासह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रत्येक ठिकाणी असावा व त्याला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी मी कायम त्यांच्या पाठीशी नव्हे तर बरोबर राहून साथ देणार अशी विचार सरणी असणाऱ्या या लोकनेत्याचा जन्मदिन संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होत असताना माझ्या लाडक्या लोकनेत्यास त्यांच्या भावी राजकीय सामाजिक कार्यास सूर्याच्या वेगाने तेज व गती मिळो व चमकता तारा म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात त्याची नोंद होऊन त्यांना सामान्यांची सेवा करण्यासाठी उदंड आयुष्य, आरोग्य जनसंपदा व महाराष्ट्राच्या जडणघडणीत भविष्यात त्यांना मानाचे स्थान मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.           


ः लेखक ः


  • अॅड राहुल झावरे, सचिव ः आमदार निलेश लंके, प्रतिष्ठान, सोशल मिडीया
  • शरद झावरे, पत्रकार, पारनेर

Related posts

Leave a Comment