पुणे ः मराठा आरक्षणासाठी मुंबईला निघालेल्या मनोज जरांगे पाटील manoj jaranje patil यांच्या पदयात्रेचा मार्गात बदल करण्यात येणार आहे. पुणे पोलिसांनी लोकांना होणारा त्रास लक्षात घेऊन जरांगे पाटील यांना केलेली विनंती मान्य केली. आता शिवाजीनगर मधून जाणारी पदयात्रा आता पुण्यातून जास्तीत जास्त बाहेरुन जाणाऱ्या मार्गाने लोणावळ्याकडे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील manoj jaranje patil मुंबईत उपोषण करणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून लोक त्यांच्यासोबत पदयात्रेने मुंबईला जात आहे. तरुणांसह, महिला, ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. काल सोमवारी (ता. २२) पदयात्रा नगरहून सुपा, शिरुरमार्गे पुण्याकडे मार्गस्थ झाली. आज पुण्यात आल्यानंतर शिवाजीनगर कडे जाताना रुबी, जहांगीर, संचेती ही मोठी हाॅस्पीटल आहेत येथे येणाऱ्या रुग्णांना त्रास होणार नाही, म्हणून पोलिसांनी केलेली विनंती दुपारी मान्य केली असल्याचे वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. आम्हालाही आणि रुग्णांनानाही त्रास होणार नाही. पोलिसांची विनंती मान्य केलीच पाहिजे. रुबी रुग्णालय, जहागीर, संचेती रुग्णालयामार्ग जाणारी पदयात्रा शक्य तेवढ्या बाहेरच्या मार्गाने जाऊ. आम्हाला पुण्यात हिंडायचे नाही. आमचा हेतू मुंबईला जाणे आहे. कोणालाही आमच्यामुळे त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत असे मनोज जरांगे पाटील यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना सांगितले.