अहिल्या नगर, ः : सर्व सामान्यांना पडणारी स्वप्ने आणि धडपडया तरुणांची स्वप्न ही आपलीच स्वप्न आहेत. ती पूर्ण करणे ही आपली देखील जबाबदारी आहे अशा उदात्त भावनेतून टीम इंदिरा सतत तीस वर्षे झटते आहे. आतापर्यंत या संस्थेने हजारो विद्यार्थी घडविले. यापुढील काळातही विद्यार्थ्यांना केंद्र स्थानी ठेऊन इंदिरा विद्यापीठाची वाटचाल सुरु राहील. असे प्रतिपादन इंदिरा शिक्षण समुहाच्या अध्यक्षा व चीफ मेंटॉर डॉ. तरिता शंकर यांनी अहिल्यानगर येथे केले.
Ahilya Nagar, : The dreams of all the common people and the dreams of the struggling youth are our own dreams. Team Indira has been striving continuously for thirty years with the noble feeling that it is also our responsibility to fulfill it. So far this institute has produced thousands of students. In the future also, the progress of Indira University will continue by keeping the students at the center. This assertion was made by the President and Chief Mentor of Indira Education Group. Done by Tarita Shankar at Ahilyanagar.
पिंपरी-चिंचवड (पुणे) येथील नामांकित इंदिरा शिक्षण समूहाचे इंदिरा विद्यापीठात रूपांतर होतं आहे. त्याअनुषंगाने #अहिल्यानगर शहरातील विद्यार्थ्यांसाठी इंदिरा युथ यात्रा व सत्कार सोहळ्याचे आयोजन बुधवारी (दि. १५) करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी सिने अभिनेते मकरंद अनासपुरे, निर्मिती सावंत, इंदिराचे सीईओ डॉ. पंडित माळी उपस्थित होते. यावेळी अहिल्या नगर शहरातील विद्यार्थी, पालक, विविध शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रुष्टी मुनोत आणि समृद्धी ठुबे या माजी विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले
सीने अभिनेते मकरंद अनासपुरे आणि निर्मिती सावंत यांच्याशी विद्यार्थी आणि पालकांनी मनसोक्त संवाद साधला. त्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देताना दोघांनीही कोपरखळ्या घेत उपस्थितांना खळखळून हसविले, शूटिंग दरम्यानचे किस्से, गंमती-जमती सांगतानाच संघर्षाच्या काळातील खाच-खळगे आणि हळवे कोपरे हळुवारपणे मांडले. यशाने हुरळून न जाता, अपयशाने खचूनही न जाता त्यातून बोध घेत जीवन जगायला शिका असा संदेश त्यांनी दिला. इंदिराचे सीईओ पंडित माळी यांनी प्रास्ताविकातुन इंदिराच्या कार्याचा आढावा घेताना जगभरातील विवीध देशांशी करार करून तेथील अनेक कोर्सेस इथे आणणार असल्याचे सांगितले. राज्यात शिक्षणासाठी केवळ ६ टक्के शेअर असल्याबाबत मत विचारले असता डॉ. तरिता शंकर म्हणाल्या, सर्वच शिक्षण संस्थांनी सरकारकडून अपेक्षा करण थांबविलं पाहिजे. आपण स्वतः होऊन प्रयत्न केल्याशिवाय गत्यतंर नाही. इंजिनिअरिंगच्या मुलांना समाज मनाच्या जाणीवा, संघर्ष, अपमान, अपयश पचविण्याची हिंमत मिळण्यासाठी मराठी साहित्याची ओळख करून दिली पाहिजे, असा प्रश्न डॉ. सूर्यकांत वरकड यांनी विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना अनासपुरे म्हणाले, इंदिरा कॉलेजमध्ये दर महिन्याला विविध साहित्यिकांना एकत्र आणून त्यांचा साहित्य कट्टा हा उपक्रम आपण राबवूया. लेखक साहित्यिक उपलब्ध करून देण्याची जबाबदारी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी घेतली.प्राचार्या डॉ. अंजली काळकर, रेणू गर्ग यांनी सूत्रसंचालन केले.
————————–
मान्यवरांचा सत्कार
इंदिरा शिक्षण समूहातर्फे सकाळचे प्रिन्सीपल करन्स्पोडंट अशोक निंबाळकर, पुढारीचे उपसंपादक सूर्यकांत वरकड, लोकमतचे उपसंपादक चंद्रकांत शेळके, सार्वमतचे मुख्य बातमीदार ज्ञानेश दुधाडे, सकाळ- अॅग्रोवन चे जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत नेटके, दिव्यमराठीचे वरिष्ठ उपसंपादक अनिल हिवाळे, सार्वमतचे बातमीदार सचिन दसपुते, सामनाचे मुख्य बातमीदार मिलिंद देखने, लोकसत्ताचे मुख्य बातमीदार मोहनीराज लहाडे, संदिप जाधव, समाचारचे भाऊसाहेब होळकर, प्रभातचे आवृत्तीप्रमख कुलकर्णी, छायाचित्रकार वाजीद शेख, योगेश गुंड, वरिष्ठ पत्रकार शिरीष कुलकर्णी, आय लव्ह नगरचे संपादक अमित आवारी यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील डॉ. माहेश्वरी गावीत, प्रा.भागवत म्हस्के, डॉ. लक्ष्मणराव मतकर, भारत झंवर, डॉ. जयवंतराव टेमकतर, प्रा. गिरीष कुकरेजा, प्रा. महेश झरेकर, गावंडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.