सत्ताधाऱ्यांकडून दहा वर्षापुर्वी दिलेले अश्वासन पाळले नाही ः शरद पवार

सत्ताधाऱ्यांकडून दहा वर्षापुर्वी दिलेले अश्वासन पाळले नाही ः  शरद पवार

अहमदनगर (अहिल्यानगर) : दहा वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान यांच्यावर टीका करत आणि महागाई ५० टक्के कमी करण्याचे आश्‍वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आले. मात्र त्यानंतर अजूनही महागाई तर कमी झालेली नाहीत, परंतु इडी, सीबीआयसारख्या यंत्रणांचा आणि सत्तेचा वापर करत अनेकांचे संसार उघडे पाडण्याचे काम केले जात आहे, असा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला.
अनेक वर्षे नगर जिल्ह्यात ‘हे’ सत्तेवर आहेत, मात्र त्यांनी काय केले, असा प्रश्‍न पडतो आहे. निळवंडे धरणाच्या कामालाही यांनीच विरोध केला होता, असे सांगत विखे कुटुंबावर नाव न घेता पवारांनी जोरदार टीका केली.

Senior leader Sharad Pawar alleged that by using systems and power like ED, CBI, the lives of many people are being exposed. They have been in power in the city district for many years, but what have they done? Pawar strongly criticized the Vikhe family saying that it was Kamalahi who had opposed the Nilwande Dam, without naming them.

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी गुरुवारी (ता.२५) राहुरी येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सभा झाली. माजी खासदार प्रसाद तनपुरे, आमदार प्राजक्त तनपुरे, लहू कानडे, नीलेश लंके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू पाटील, माजी आमदार दादा कळमकर, संदीप वर्पे, महिला आघाडीच्या योगीता राजळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, ‘‘दहा वर्षांपूर्वी तेव्हाचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावर वेळोवेळी आरोप करत ५० दिवसांत महागाई ५० टक्क्यांनी कमी करण्याचे आश्‍वासन देत नरेंद्र मोदी सत्तेवर आले. ५० दिवस सोडा, आता तीन हजार सहाशे पन्नास दिवस झाले, पण महागाई कमी झाली नाही. उलट सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर दुपटीने वाढले आहेत. तरुणांना रोजगार देणार होते, मात्र झालेल्या सर्वेक्षणात १०० पैकी ८७ तरुण बेरोजगार आहेत हे उघड झाले आहे.

सरकारचा विरोधात बोलणाऱ्या लोकांवर ‘ईडी’ ‘सीबीआय’सारख्या संस्थेच्या माध्यमातून खोट्या केसेस केल्या जात आहेत. माझ्यावरही राज्य सहकारी बँकेत संदर्भात ईडीने केस केली होती, मात्र नंतर ते घाबरले आणि काढून घेतली. सरकार विचाराच्या विरोधात जो वागेल त्याला जेलमध्ये टाकले जात आहे. अरविंद केजरीवालसारख्या माणसाने दिल्लीत सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी खूप मोठे काम केले. असे असतानाही त्यांच्यावर कारवाई केवळ सरकारच्या विरोधात बोलले म्हणून केली. सत्तेचा वापर करत अनेक चांगले काम करणाऱ्या लोकांचे संसार उघडे पाडण्याचे काम हे सरकार सत्तेच्या वापरातून करत आहे. या सरकारची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. त्यांना हुकूमशाहीकडे जाण्यापासून रोखायचे असेल तर आपण काम केले पाहिजे.’’

नगर जिल्ह्यामध्ये अण्णासाहेब शिंदे, धनंजय गाडगीळ आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी साखर कारखाना काढला, पण त्यानंतर सत्तेत असूनही पुढच्या पिढीने काय केले, हा प्रश्‍न आहे. एकेकाळी नगर जिल्ह्यात नावाजलेला राहुरी साखर कारखाना, प्रवरा संस्था यांची आज काय अवस्था आहे, असा प्रश्‍न उपस्थित करत कापूस, सोयाबीन, कांदा आधी बाबींकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे पवार म्हणाले. ‘‘इंग्रजी भाषेची संसदेत बोलण्याची गरज नाही, त्यासाठी १८ भाषेत संसदेत बोलता येते,’’ असे स्पष्ट करत पवारांनी ‘‘इंग्रजी बोलता येते म्हणजे फार शहाणा झालो असे समजू नये,’’ अशा शब्दांत नाव न घेता सुजय विखे यांच्यावर टीका केली.
राजेंद्र फाळके यांनी प्रस्तावित केले, तर उद्धव काळापहाड यांनी सूत्रसंचालन केले.

Annasaheb Shinde, Dhananjay Gadgil and Padmashri Vitthalrao Vikhe Patil set up a sugar factory in Nagar district, but the question is what did the next generation do despite being in power. Raising the question of what is the status of Pravara Sanstha, the once famous Rahuri Sugar Factory in Nagar district, Pawar said that cotton, soybeans and onions are being ignored first.

शरद पवार म्हणाले, की संगमनेर, अकोले, राहता, राहुरी, सिन्नर आदींसह दुष्काळी पट्ट्यातील तालुक्याच्या शेतीच्या पाण्यासाठी निळवंडे धरण करण्याची भूमिका आम्ही लोकांनी घेतली. त्यासाठी ज्येष्ठ नेते दत्ता देशमुख यांच्या उपस्थितीत परिषद झाली या परिषदेत या लोकांनी निळवंडे धरणाला विरोध केला, असे सांगत शरद पवार यांनी नाव न घेता विखे यांच्यावर निशाणा साधला.

Sharad Pawar said that we the people have taken the role of constructing Nilvande dam for the agricultural water of the talukas in the drought belt including Sangamner, Akole, Rahta, Rahuri, Sinnar etc. For this, a conference was held in the presence of senior leader Datta Deshmukh. Sharad Pawar targeted Vikhe without naming him saying that these people opposed the Nilavande dam.

Related posts

Leave a Comment