अहमदनगर : लोकसभा निवडणूकीतही नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात विखे यांनी नीलेश साहेबराव लंके या डमी उमेदवाराला निवडणूकीच्या रिंगणात उतरवून रडीचा डाव खेळला आहे. पायाखालची वाळु सरकल्यानेच त्यांनी डमी उमेदवार उभा केला आहे असा आरोप महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला.
Even in the Lok Sabha elections, Vikhe has played a dirty trick by fielding a dummy candidate, Nilesh Sahebrao Lanka, in the Nagar South Lok Sabha constituency. The officials of Mahavikas Aghadi alleged in the press conference that they have fielded a dummy candidate only because the sand has shifted under their feet.
नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात निलेश साहेबराव लंके यांचा उमेदवारी अर्ज भरला आहे. या उमेदवाराला विखे कुटूंबाकडून उभे केल्याचा आरोप करत काल (शुक्रवारी) महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन विखे कुटूंबावर निशाना साधला. राष्ट्रवादी काॅग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शिवसेना उद््धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, काँग्रेसचे नगर तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, आपचे संघटक सुभाष केकाण उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या वतीने बोलताना राजेंंद्र फाळके यांनी सांगितले की, विखे हे डमीचा वापर अनेक ठिकाणी करतात. डॉ. सुजय विखे यांच्या डिग्रीबाबात त्यांच्या सख्ख्या चुलत्यानेच उल्लेख केला आहे. महसूल विभागाच्या तलाठी भरतीमध्येही अनेक डमी उमेदवार पास झाले. अशाच प्रकारे डमी उमेदवार उभा करून डॉ. सुजय विखे यांनी आपल्या कुटूंबाची परंपरा पुढे चालविली आहे. निवडणूक लढविण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. नावातील साधर्म्य पाहून दिशाभुल करण्यासाठी डमी अर्ज दाखल करण्यात आल्याचा आरोप फाळके यांनी केला. निघोजच्या जानेवारी महिन्यात प्रसिध्द झालेल्या मतदार यादीत भाग क्र. ३११ मध्ये अनुक्रमांक १०३५ वर सतीश बळवंत लंके यांचे नाव आहे. त्यानंतर प्रसिध्द झालेल्या सुधारीत मतदार यादीत भाग क्र. ३११ मध्ये अनुक्रमांक १०३५ वर नीलेश साहेबराव लंके यांचे नाव आहे. नीलेश साहेबराव लंके यांचे नाव निघोजच्या मतदार यादीत टाकण्यासाठी अशी कोणतील शासकीय यंत्रणा पळाली. निवडणूक अर्जासोबत सादर करण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रासाठी डॉ. सुजय विखे यांच्यासाठी ज्या डी.पी. अकोलकर यांनी स्टॅम्प खरेदी केला, त्याच अकोलकर यांनी नीलेश साहेबराव लंके यांच्या प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प खरेदी केला आहे. तर एकाच वकीलाने दोघांचीही नोटरी केल्याचा दावाही फाळके यांनी कागदपत्रांसह केला.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान बातम्या चालवून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न विखेंकडून होईल अशी शंका व्यक्त करतानाच गांधी मैदानावर झालेल्या सभेत शरद पवार यांनी नगरचा उमेदवार बदलण्यासाठी उद्योगपतीला पाठविल्या गंभीर आरोप केला होता. त्यामुळे विखेे कुटूंब महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश ज्ञानदेव लंके यांच्या उमेदवारीला घाबलेले दिसते असे फाळके म्हणाले.
लंके यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यताही फाळके यांनी व्यक्त करतानाच ते नीलेश ज्ञानदेव लंके यांच्या उमेदवारीला घाबरले असतील तर त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना, पक्षाला तसे कळवायला हवे होते. डमी राजकारण होणार असेल तर जिल्हा ते खपवून घेणार नाही असे फाळके म्हणाले.
———–
आमच्याकडेही डमी उमेदवार होते
राजेंद्र फाळके म्हणाले, आमच्याकडेही सुजय रमाकांत विखे व सुजय दिगंबर विखे हे दोन जण आले होते. आमचेही डमी अर्ज दाखल करा असे त्यांचे म्हणणे होते. मात्र आम्ही स्वारस्य नसल्याचे सांगत नकार दिला. आम्हाला कोणतीही भिती नाही. मात्र डमी नावाने गैरवापर नको म्हणून ही बाब आम्ही माध्यमांपुढे मांडली. निवडणूक निवडणूकीच्या पध्दतीने लढवून आचारसंहितेचे काटेकोर पालन महाविकास आघाडीकडून केले जाईल. ंWe have no fear. But to avoid misuse of dummy name, we presented this matter before the media. The Mahavikas Aghadi will strictly adhere to the code of conduct by contesting the election in an electoral manner.