डोईठाणचे राम सातपुते यांना सोलापुरातून उमेदवारी

डोईठाणचे राम सातपुते यांना सोलापुरातून उमेदवारी

नवी दिल्लीभारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणूकीसाठीच्या उमेदवारीची पाचवी यादी जाहीर केली. त्यात डोईठाण (ता. आष्टी, जि. बीड) येथील राहिवीसी, माळसिरस येथील आमदार राम सातपुते यांनी सोलापुर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली आहे. अभिनेत्री कंगणा रानावत, रामायण मालिकेतील प्रभू श्रीरामाची भूमिका करणारे अरुण गोयल यांनाही भाजपने लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. राम सातपुते यांची लढत माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या व सोलापुरच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत होणार आहे.
Bharatiya Janata Party announced the fifth list of candidates for the Lok Sabha elections. Ram Satpute, MLA from Malsiras, Rahivisi from Doithan (T. Ashti, Dist. Beed) has announced his candidacy from Solapur Lok Sabha Constituency. Ram Satpute will fight with former Chief Minister and former Union Home Minister Sushilkumar Shinde’s daughter and Solapur MLA Praniti Shinde.

भाजपने आपली पाचवी उमेदवार यादी जाहीर केली असून हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत हिला तिकीट देण्यात आले आहे. दरम्यान नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रसिद्ध उद्योगपती नवीन जिंदाल यांना हरियाणामधील कुरुक्षेत्रमधून तर ज्येष्ठ नेते जगदीश शेट्टर यांना कर्नाटकमधील बेळगावमधून तिकीट देण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील तीन जागांची निश्चिती करण्यात आली असून सोलापूरमध्ये राम सातपुते यांना, गडचिरोलीत अशोक नेते तर भंडारा गोंदियामध्ये सुनील मेंढे यांना तिकीट देण्यात आले आहे. भाजपकडून एकूण 111 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे सर्वाधिक लक्ष असलेल्या सोलापुरात आता आमदार प्रणिती शिंदे व आमदार राम सातपुते यांच्यात लढत होणार आहे.
Three constituencies in Maharashtra have been decided and tickets have been given to Ram Satpute in Solapur, Ashok Nete in Gadchiroli and Sunil Mendhe in Bhandara Gondia. A total of 111 names of candidates have been announced by BJP. So now MLA Praniti Shinde and MLA Ram Satpute will fight in Solapur, which is the most watched.

प्रसिध्द रामायण मालिकेत श्रीरामाची भूमिका केलेल्या अरुण गोविल यांना भाजपने उत्तर प्रदेशातील मेरठ मतदार संघातून निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. मागील काही काळापासून भाजपविरोधात वक्तव्ये करीत असलेल्या वरुण गांधी यांचेही तिकीट कापत त्याठिकाणी काँग्रेसममधून आलेल्या जितीन प्रसाद यांना संधी देण्यात आली आहे.

BJP has fielded Arun Govil, who played the role of Sri Rama in the famous Ramayana series, from the Meerut constituency in Uttar Pradesh. Varun Gandhi, who has been making statements against the BJP for some time now, has also been given a chance to Jitin Prasad, who came from the Congress.

याचवेळी वरुण यांच्या मातोश्री मेनका यांचे तिकीट मात्र कायम ठेवण्यात आले आहे. ओडिशा राज्यात भाजप आणि बिजू जनता दल यांची आघाडी होणार नाही, हे स्पष्ट झाले होते, या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यातील सर्व 21 जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत.

Related posts

Leave a Comment