अहमदनगर, ः राज्यात तीसपेक्षा अधिक लोकसभा मतदार संघात धनगर समाजाची ताकद आहे. मात्र सध्या लोकसभेच्या जागावाटपाचा विचार करता धनगर समाजाला एकाही लोकसभा मतदार संघात स्थान दिल्याचे दिसत नाही. सरकारने धनगर समाजाच्या तोंडाला आरक्षणाबाबत पानेच पुसली आहेत. आता लोकप्रतिनिधी म्हणूनही संधी देण्याएवजी डावलले जात आहे. त्यामुळे धनगर समाजाचा अधिक प्रभाव असलेल्या राज्यातील पंधरा लोकसभा मतदार संघात यशवंत सेना उमेदवार उभे करणार असून उमेदवाराच्या नावाची लवकर घोषणा करणार असल्याचे यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी सांगितले.
Yashwant Sena president Balasaheb Dodtale said that the Yashwant Sena will field candidates in fifteen Lok Sabha constituencies of the state where the Dhangar community has more influence and will announce the name of the candidate soon. Due to this stance of Yashwant Sena, all the political parties including BJP in the state will face a big problem
राज्यात लोकसभा निवडणूकीची धूमधाम सुुरु झाली आहे. राज्यात तीसपेक्षा अधिक लोकसभा मतदार संघात धनगर समाजाचा प्रभाव असताना व राज्यात आडीच कोटीपेक्षा अधिक मतदार असताना कोणत्याही पक्षाने धनगर समाजाला प्राधान्य दिले नाही. एकाही उमेदवारा उमेदवारी मिळालेली नाही. त्यामुळे नगर येथे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांच्या सह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. धनगर समाजाच्या आरक्षणासह अन्य प्रश्नावर राज्यभर लढा देणाऱ्या आणि समाजात अधिक प्रभाव असलेल्या यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या पाश्वभूमीवर माहिती दिली.
बाळासाहेब दोडतले म्हणाले, धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा यासाठी आम्ही राजमाता आहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी पहिल्यांदा २१ दिवस उपोषण केले. अश्वासन दिल्यावर उपोषण मागे घेतले. सरकारने दिलेली मुदत संपल्यावर पुन्हा उपोषण केले. मात्र आरक्षण देण्याबाबत दोन वेळा सरकारकडून शब्द देऊनही शेवटी फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एकतर सरकारने धनगर समाजाला दिलेला शब्द पाळला नाही, आरक्षण दिले नाही. शिवाय लोकसभा निवडणूकीत राज्यातील ४८ मतदार संघात कोणत्याही पक्षाने धनगर समजाला प्रतिनिधीत्व अजून दिलेले नाही. आता देतील याचीही शश्वती दिसत नाही. राज्यातील दोन्ही राजघराण्यातील व्यक्तीला संधी दिली जात असताना धनगर समाजही राजे होते.
Balasaheb Dodtale said, We first fasted for 21 days at the birthplace of Rajmata Ahilya Devi Holkar to include the Dhangar community in the Scheduled Tribes. After the assurance, the fast was called off. After the deadline given by the government, the fast was resumed. However, it has become clear that even though the government promised to give reservation twice, it was a fraud.
तीसपेक्षा अधिक लोकसभा मतदार संघात प्रभाव असतानाही धनगर समाजाला जाणीवपुर्वक डावलले जात असल्याचे स्पष्ट झाले असल्याने आता धनगर समाजाचा अधिर प्रभाव असलेल्या नगर, शिर्डी, नाशिक, माढा, सोलापुर, सांगली, बारामती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, यवतमाळ, सातारा, व जालना या पंधरा मतदार संघात धनगरसेना आपले उमेदवार उभे करणार आहे. दोडतले यांच्या या भूमिकेने राज्यात अनेक राजकीय पक्षांची मोठी अडचण होणार आहे. पमाणिक दांगडे पाटील, अण्णासाहेब रुपनवर, दादासाहेब केसकर, गोविंद नरवटे, नितीन धायगुडे, गंगाधर कोळेकर, लक्ष्मण कोकरे, दत्ता काळे, गुजर, बाळासाहेब कोरके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
बाळासाहेब दोडतले म्हणाले, राम शिंदे हे माजी पालकमंत्री, विद्यमान आमदार आहेत. त्यांचा प्रभावी कामांमुळे नगर जिल्ह्यात प्रभाव आहे. ते जिंकणारे उमेदवार असल्याने गेल्या अनेक दिवसापासून त्यांना नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून भाजपने उमेदवार द्यावी अशी मागणी आहे. मात्र त्याबाबत गांभिर्याने विचार केला नाही. त्यांना उमेदवारी द्यायला हवी होती.ॉ
As it has become clear that the Dhangar community is being left out deliberately even though it has influence in more than thirty Lok Sabha constituencies, now the cities where the Dhangar community has the most influence are Shirdi, Nashik, Madha, Solapur, Sangli, Baramati, Hingoli, Nanded, Parbhani, Beed, Dharashiv, Yavatmal, Satara, And Dhangarsena is going to field its candidate in 15 constituencies of Jalna.