काॅग्रेसचा जाहीरनामा जनतेच्या डोळ्यात धुळफेक करणारा ः सुजय विखे पाटील

काॅग्रेसचा जाहीरनामा जनतेच्या डोळ्यात धुळफेक करणारा ः सुजय विखे पाटील

अहमदनगर : ‘‘ अबकी बार ४०० पार होऊन या देशात नवा इतिहास घडणार आहे. नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील. देशात मोदींची गॅरेंटी आहे. काँग्रेसचा जाहीरनामा हा केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलीली धुळफेक आहे. जनतेची दिशाभूल करण्यासाठी हा जाहीरनामा प्रकाशित केला आहे, अशी टिका महायुतीचे उमेदवार खासदार डाॅ.सुजय विखे पाटील यांनी केली.

Abaki bar 400 will be crossed and a new history will be made in this country. Narendra Modi will be the Prime Minister again. Modi has a guarantee in the country. The Congress manifesto is just a hoax made with the election in mind. This manifesto has been published to mislead the public, criticized Mahayuti candidate MP Dr. Sujay Vikhe Patil.

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. खासदार सुजय विखे पाटील यांनी
शेवगाव तालुक्यातील शिंगोरी येथे बूथ सक्षमीकरण संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार मोनिका राजळे यांच्यासह शेवगाव तालुक्यातील सर्व भाजप पदाधिकारी, बूथ कमिटी मेंबर, गणप्रमुख आणि सुपर वॉरियर उपस्थित होते.


डॉ. विखे पाटील यांनी कॉंग्रेसच्या जाहीरनाम्याचा समाचार घेत कॉंग्रेसवर हल्ला चढविला. कॉंग्रेसने जाहीरनाम्याला न्यायपत्र दिले आहे, जर कॉंग्रेसला आता न्याय द्यायचा आहे, तर ५५ वर्षांच्या काळात केवळ अन्याय का केला? असा सवालही त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश महासत्तेकडे वाटचाल करत आहे. आर्थिक सुधारणांना गती मिळत आहेत. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून उद्योजक, व्यावसायिक तयार होत आहेत. त्याचबरोबर उज्ज्वला योजना, वयोश्री योजना, पीएम किसान सन्मान योजना, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री आवास योजनांमार्फत सरकार शेतकरी, गोरगरीब, महिला आणि तरुणाच्या मागे खंबीर उभे आहे, असेही डॉ. विखे पाटील म्हणाले.

Related posts

Leave a Comment