अपयश झाकण्यासाठी त्यांनी डाळ, साखर वाटली ः नीलेश लंके

अपयश झाकण्यासाठी त्यांनी डाळ, साखर वाटली ः नीलेश लंके

अहमदनगर ः (ग्रामसत्ता) : अपयश झाकण्यासाठी त्यांनी डाळ, साखर वाटली. आताची लढाई ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. ‘‘जनतेने माझी निवडणूक हाती घेतली आहे. सत्तेचा ताम्रपट कुणीही घेऊन आलेले नाही. त्यामुळे कोणी फार हवेत जायचे कारण नाही. कारण ही निवडणूक जनतेची असून भाजपच्या निष्क्रिय खासदाराच्या यादीत डॉ. सुजय विखे अग्रस्थानी आहेत. त्यामुळे त्यांना यावेळी त्यांना लोक घरी पाठवतील असा घाणाघात दक्षिण लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमदेवार माजी आमदार नीलेश लंके यांनी केला.
People have taken my election. No one has brought the copper plate of power. So there is no reason for anyone to go too far. Because this election belongs to the people and in the list of inactive MPs of BJP, Dr. Sujay Vikhe is in the lead. Therefore, former MLA Nilesh Lanka, candidate of Mahavikas Aghadi in South Lok Sabha Constituency, said that people will send him home this time.

राधाकृष्ण विखे पाटील हे दुग्धविकास मंत्री आहेत. परंतु, बाटलीबंद पाणी २० रुपये लिटर, तर दुधाचा भाव २३ रुपये लिटर आहे. माझ्याकडे मंत्रिपद असते आणि शेतकऱ्यांनी दुधाचा भाव ३५ रुपये मागितला असता, तर मी ४० रुपये भाव दिला असता असा दावा आमदार निलेश लंके यांनी केला.

राहुरी तालुक्यातील मोकळ ओहळ, ब्राह्मणी, उंबरे, पिंप्री, वळण, मानोरी येथे जनसंवाद यात्रेत निलेश लंके बोलत होते. आमदार प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, आपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आघाव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निलेश लंके यांनी दक्षिण लोकसभा मतदार संघात काढलेल्या जनसंवाद यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहेत.राहुरी तालुक्यात झालेल्या जनसंवाद यात्रेत निलेश लंके यांनी खासदार सुजय विखे पाटील यांच्या मागील पाच वर्षाच्या कार्यपद्धतीवर बोलत जोरजार टिका केली.

निलेश लंके म्हणाले, विखेंनी मागील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ताब्यात घेतलेले गणेश व राहुरी कारखाने बंद पाडले. कामगारांचे पगार थकविले. मुळा प्रवरा वीज संस्था, राहुरीचे अभियांत्रिकी महाविद्यालय बंद पाडले. नगर-मनमाड रस्ता करता आला नाही. खराब रस्त्यावरील अपघातात पाचशेहून अधिक निरपराध बळी पडले. त्यांनी राजकारणासाठी सत्तेचा गैरवापर केला. विरोधकांवर दबावतंत्र व त्रास देण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा वेठीस धरली, असा आरोपही लंके यांनी यावेळी केला.
आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले, “देशाची लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी ही निवडणूक आहे. देशात हुकूमशाही आणण्यासाठी विरोधी पक्ष संपविण्याचा घाट घातला जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांची मुस्कटदाबी सुरू आहे. भ्रष्टाचार, बेरोजगारी, महागाईचा आगडोंब उसळला आहे. त्याकडे दुर्लक्ष करून जाती-धर्मात द्वेष पसरवून मतांचे राजकारण केले जात आहे.’’
MLA Prajakta Tanpure said, “This is an election to save the country’s democracy and constitution. The opposition party is being put to death to bring dictatorship in the country. The opposition is using the central investigation agencies to harass them.

Related posts

Leave a Comment