गहिनीनाथगड चिंचोली (ता. पाटोदा) ः संतश्रेष्ठ वै. वामनभाऊ महाराज Vamanbhau Maharaj यांनी समाजाला समतेची शिकवन दिली., त्यांच्या शिकवणीतून समाजाला दिशा मिळत आहे. गहिनीनाथगड येथून पंढरपुरला जाण्यासाठी नवीन रस्ता करणार आहे. अजून गडाच्या विकासासाठी भरीव निधी देणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी सांगितले
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गड येथे श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या 48 व्या पुण्यतिथी महोत्सवासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.या पुण्यतिथी महोत्सवाच्या कार्यक्रमात मठाधिपती विठ्ठल महाराज, उत्तम स्वामी, राज्याचे कृषी तथा जिल्हयाचे पालकमंत्री धनंजय मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकर, सर्वश्री आमदार बाळासाहेब आजबे, सुरेश धस, लक्ष्मण पवार, मोनिका राजळे,माजी मंत्री राम शिंदे आणि जयदत्त क्षीरसागर माजी आमदार भिमराव धोंडे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Vitthal Maharaj, Uttam Swami, State Minister for Agriculture and District Guardian Dhananjay Munde, MP Pritam Munde, President of Vanchit Bahujan Aghadi and Prakash Ambedkar, Sarveshri MLA Balasaheb Ajbe, Suresh Dhas, Laxman Pawar, Monica Rajle, Former Minister Ram Shinde and Jaydutt Kshirsagar Former MLA Bhimrao Dhonde Collector Dipa Mudhol Munde Zilla Parishad Chief Executive Officer Avinash Pathak, Superintendent of Police Nand Kumar Thakur and a large number of devotees were present.
देवेंदेर फडणवीस म्हणाले मागच्यावर्षी मला ध्वज हातात देऊन सेवेकरी केले होते मी आपल्या मधलाच एक सेवेकरी आहे. इथल्या विकास कामांसाठी यापुर्वी 25 कोटीचा निधी दिलेला आहे. गरज पडल्यास पुन्हा 25 कोटींचा निधी देऊ असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.या ठिकाणी सुसज्ज स्वागत कमान, किर्तन मंडप, प्रसाद कक्ष बांधले जाईल. श्री संत वामनभाऊ महाराजांवर प्रेम करणारे गरीब सेवेकरी याठीकाणी एकत्रित येतात त्यांची गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली जाईल. या जिल्हयाला गडांचा समृध्द वारसा आहे. येथे नारायण गड, मच्छिंद्रगड, भगवान गड असे पवित्र तीर्थस्थळ आहेत. या सर्व मार्गावरून वारी जात असते. हा मार्ग चांगला होईल याची दक्षता घेतली जाईल. गहिनीनाथ गडावरुन पालखी जात असते. वारीच्या समयी वारकरांसाठी पंढरपूर येथे जागा मिळाली असून जागा दान देणारे आज आपल्या मध्ये आहेत हा सुवर्ण क्षण असल्याचे ते यावेळी म्हणाले. Narayan Gad, Machhindragad, Bhagwan Gad are holy places of pilgrimage. Vari passes through all these paths. Care will be taken to ensure that this route is good. A palanquin passes from Gahininath fort. He said that it is a golden moment that a place has been found for Warkars in Pandharpur during the Wari and the donors of the space are among us today. यावेळी येथील विविध विकास कामांचे भुमीपुजन करण्यात आहे. याप्रसंगी भाविकांवर टाळ मृदंगाच्या गजरात मंचावरून पुष्पवृष्टी करण्यात आली. पुण्यतिथी सोहळ्याला राज्याच्या वेगवेगळ्या भागातून लोक आले होते. भाविकांना महाप्रसाद दिला.