सर्वेच्या नावाखाली नागरिकांना फोनवरून विचारले जातेय… आपली पसंती कोणाला?

सर्वेच्या नावाखाली नागरिकांना फोनवरून विचारले जातेय… आपली पसंती कोणाला?

अहमदनगर ः मतदान हे गुप्त दान असते. ज्याने-त्याने आपापल्या पद्धतीने मतदान द्यायचे, त्याबाबत गुप्तता ठेवली जाते. मात्र सध्या लोकसभा निवडणूकीच्या पाश्वभूमीवर नागरिकांना फोन येऊ लागले आहेत. फोनवर तुमची पसंती कोणाला असेल, खासदार सुजय विखे यांना असेल तर एक दाबा व निलेश लंके यांना असेल तर दोन दाबा अशी फोनवरुन विचार होऊ लागली आहे. त्यामुळे सर्वेक्षणाच्या नावाखाली कोण कोणाला मत देणार याचा डाटा तर गोळा केला जात नाही ना, अशा पद्धतीने लोकांना विचारता येते का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. 


Voting is a secret charity. It is kept secret about who-he/she wants to vote in his/her own way. But at present citizens have started getting calls in the background of Lok Sabha elections. On the phone, who is your favorite, press one if it is MP Sujay Vikhe and two if it is Nilesh Lanka. Therefore, in the name of survey, the data of who will vote for whom is not collected, the question has started to arise whether people can be asked in such a way.

नगर जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. नगर जश्मरिण लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून पारनेरचे आमदार निलेश लंके यांना उमेदवारी दिली असून भाजपमहायुतीेचे विद्यमान खासदार डाॅ. सुजय विखे पाटील उमेदवार आहेत.

नगर दक्षिणेतील जागेकडे राज्याचे लक्ष आहे. काटे की टक्कर होणार असे एकंदर चित्र आहे. दोन दिवसापासून मतदारांना फोन येत आहेत. पलिकडून विचारले जाते. आपली पसंती कोणाला आहे, डाॅ. सुजय विखे पाटील यांना असेल तर एक दाबा व निलेश लंके य़ांना असेल तर दोन दाबा. 

ज्या अर्थी मतदारांना फोन येतात त्या अर्थी जो कोण हा सर्वे करतोय त्यांच्याकडे लोकांचे नाव, गावांसह सगळी माहिती आहे. फोन केलेल्या व्यक्तीच्या महण्यानुसार ज्याला फोन केला त्याने आपली पसंती नोंदवली म्हणजे ती व्यक्ती कोणाला मतदान करणार हे आपसूकच फोन करणाऱ्याला कळणार हे उघड आहे. 

याचा अर्थ असा की कोण कोणाला मतदान करणार हे काढून घेतले जात आहे. हे नेमके कोण करतेय याबाबत कळत नसले तरी ,सर्वेक्षणाच्या नावाखाली असे करता येते का, ही माहिती नेमकी कोण गोळा करतेय, अशी माहिती विचारली तर मतदान गुप्त राहील का असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. काही लोक मात्र आलेल्या फोनला प्रतिसाद देताना दिसत नाहीत. 

Related posts

Leave a Comment