अहिल्यानगर, ः चार-पाच महिने कष्ट करुन पिकवलेला कांदा बाजारात विक्रीसाठी नेला. प्रती क्विंटल शंभर रुपयांचा म्हणजे एक रुपया किलो दर मिळाला. सहाशे रुपये मिळाले. मात्र कांदा नेण्यासाठीच्या वाहतुकीसह अन्य खर्चही सहाशे रुपये झाले. आलेली रक्कम खर्चात वजा झाल्यानंतर सबंधित शेतकरी शुन्य रुपये शिल्लक राहिलेल्या पट्टीचा कागद घेऊन घरी परतला. संगमनेर (जि. अहिल्यानगर) येथील बाजार समितीमधील एका व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्याला दिलेली कांदापट्टी व्हायरल झाल्याने कांदा दराचे वास्तव समोर आले आहे.
After toiling for four to five months to cultivate onions, a farmer took his produce to the market for sale. He received a price of one hundred rupees per quintal, earning a total of six hundred rupees. However, the transportation and other expenses for bringing the onions to the market also amounted to six hundred rupees. After deducting the expenses from the earnings, the farmer returned home with a receipt showing a balance of zero rupees. The reality of onion prices has come to light after the onion receipt given to the farmer by a trader at the market committee in Sangamner (Ahilyanagar district) went viral.
अहिल्यानगर, पुणे, सातारा, नाशिक, सोलापुरसह मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात कांदा पीक प्रमुख झाले आहे. खरिप, लेट खरिप, रब्बी आणि उन्हाळी अशा हंगामात कांदा घेणारे अनेक शेतकरी आहेत. बाजारात गेल्या अनेक दिवसापासून दोन हजार रुपयांपर्यत कांद्याला दर मिळत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात हा दर मोजक्याच गोण्यांना मिळत असून सरसकट कांद्याला अत्यंत कमी, अल्प दर मिळत असल्याचे वास्तव संगमनेरमधील कांदा पट्ट्यातून समोर आले आहे. निमगाव जाळी (ता. संगमनेर) येथील सचीन शेटे यांनी यंदा दिड एकरावर लाल कांद्याचे उत्पादन घेतले. ४१ गोण्या कांदा निघाला. आधी २९ गोण्या विकल्या, त्यातून चौदा हजार रुपये आले तर राहिलेल्या १२ गोण्या संगमनेरमध्ये दोन दिवसापुर्वी विकल्या. अवघा एक रुपया प्रती किलोला दर मिळाला. त्यात वाहतुक, हमाली आणि नको तो खर्चही सहाशे रुपये झाला. आलेले पैसे वजा करुन खरेदीदार व्यापाऱ्याने शुन्य रुपयांची कांदा पट्टी सचीन यांच्या हाती टेकवली. कांदा विकून हाती काहीच राहिले नाही, पण तेथून कांदा परत आणायचा म्हटले तरी पुन्हा खर्च, त्यामुळे तसाच देईन मोकळ्या हाती परत यावे लागले. असाच अनुभव संगमनेरमधील अनेक शेतकऱ्यांचा आहे. अल्प रक्कम मिळालेल्या कांदापट्ट्या संगमनेरमधील अनेक शेतकऱ्यांकडे आहेत.
—————-
कांदा फेकून तरी कसा देणार कांदा
चार-पाच महिने शेतात राबून कांदा पिकवलेला असतो. बाजारात दर नाही, मागणी नाही, निर्यात बंदी असल्याचे सांगून खरेदीदार कांद्याची पुरती माती करुन टाकतात. घरापासून बाजार समितीत न्यायला प्रती दहा रुपये खर्च येतो. मुळात कांदा दरातबाबत सतत दिशाभूल केली जाते. चार-दोन गोण्यांना मिळणारा दरच सगळीकडे सांगितला जातो. प्रत्यक्षात अल्प दराने कांदा खरेदी केला जात असल्याचे बाजारातील वास्तव आहे. मोठ्या मेहनतीने पिकवलेला कांदा फेकून तरी कसा देणार.
—————-
कोट..
खरिपात दिड एकरावर लाल कांद्याचे उत्पादन घेतले. पन्नास हजारापेक्षा अधिक रक्कम खर्च केली. ४१ गोण्या उत्पादन निघाले आणि त्यातून चौदा हजार रुपये आले. कांदा काढणी, गोण्या, भरण्यासाठी लागणारा खर्च आठरा हजार रुपये झाला. १२ गोण्याला एक रुपया दर मिळाला. त्यातून आले पैसे खर्चात वजा करुन शुन्य रुपयाची पट्टी हातात घेऊन परतलो. मी शेतकरी, कांदा उत्पादक अपराधी असल्याची भावना वाटली. नको त्या गोष्टीवर सरकार कोट्यावधीचा खर्च करत असताना शेतकऱ्यांना तारणार की मारणार असा प्रश्न पडल्याव्यतिरिक्त शेतकरी काहीच करु शकत नाही.

