मुंबई ः महाराष्ट्र शासनाक़डून देण्यात येणारा महाराष्ट्र भुषण पुरस्कार यंदा ज्येष्ट अभिनेते अशोक सराफ Ashok Saraf
यांना जाहीर करण्यात आला आहे. The Maharashtra Bhushan Award has been announced for veteran actor Ashok Saraf this year. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पुरस्काराची घोषणा करुन अशोक सराफ यांचे अभिनंदन केले आहे. २५ लाख रुपये आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अशोक सराफ यांनी आतापर्यंत ३०० हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
‘पांडू हवालदार’ सिनेमातील ‘सखाराम हवालदार’ आणि ‘अशी ही बनवाबनवी या चित्रपटातील ‘धनंजय माने’ यांसह त्यांच्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या मनात ठसल्या आहेत. अनेक वर्षे उलटूनही या भूमिकांची आणि चित्रपटांची जादू आजही कायम आहे. अशोक सराफ यांनी दादा कोंडके यांच्यासह सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे यांच्यासह मराठी आणि हिंदी मधील अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले आहे. Ashok Saraf has worked with many legendary actors in Marathi and Hindi including Dada Kondke, Sachin Pilgaonkar, Laxmikant Berde, Mahesh Kothare.
अशोक सराफ Ashok Saraf यांनी ब्लॅक अँड व्हाइट सिनेमा ते डिजिटल सिनेमा असा मोठा प्रवास केला आहे. चित्रपटातील विनोदांना वेगळी ओळख त्यांनी दिली. जवळपास ३००हून अधिक चित्रपटात त्यांनी काम केले. केवळ विनोदीच नाही तर गंभीर भूमिका देखील त्यांनी अत्यंत कुशलतेने साकारल्या. ‘छोटी सी बात’, ‘चिचोर’, आणि ‘बातों बातों में’ या सारख्या हिंदी चित्रपटांमध्ये संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. महाराष्ट्र भुषण हा पुरस्कार आतापर्यंत मोठमोठ्या दिग्गज कलाकारांना मिळाला आहे आणि आता त्या यादीत माझे नाव समाविष्ट झाले आहे. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. The Maharashtra Bhushan award has been given to big veteran artists so far and now my name is included in that list. This is a big deal for me. हा पुरस्कार मी माझ्या सर्व चाहत्यांना समर्पित करत आहे कारण त्यांच्या प्रेमामुळेच मला हा पुरस्कार मिळाला आहे असे सांगत अशोक सराफ यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.