अहिल्यानगर, ः घरासमोर अंगणात शेकोटी करुन शेकत असलेल्या लोकांतून सहा वर्षाच्या चिमुरडीला बिबट्याने आई व इतर कुटूंबातील लोकांसमोरुन उचलून नेल्याची घटना बुधवारी (ता. १२) सायंकाळी खारेकर्जुने (ता. अहिल्यानगर) येथे घडली. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत चिमुरडीचा शोध घेतला परंतु चिमुरडी सापडू शकली नाही. रियंका सुनील पवार (वय ६) असे त्या चिमुरडीचे नांव आहे.
A leopard snatched a six-year-old girl from the courtyard of her house in front of her mother and other family members on Wednesday (12) evening at Kharekarjune (Ahilyanagar). After the incident, the local people searched for the girl till late at night but could not find her. The girl’s name is Riyanka Sunil Pawar (age 6).
अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्याचा धुमाकुळ सुरुच आहे. मंगळवारी (ता. ११) पहाटे अज्ञात वाहनाच्या धडकेने अहिल्यानगर-पुणे रस्त्यावर चास-कामरगाव (ता. अहिल्यानगर) शिवारात एका बिबट्याचा मृत्यु झाला, कोपरगाव तालुक्यातही आठ दिवसात दोन बळी बिबट्याने घेतले आहे. आता अहिल्यानगर तालुक्यातील खारेकर्जुने येथे सहा महिन्याच्या मुलीचा बिबट्याने बळी घेतला आहे. स्थानिक नागरिकांकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी (ता. १२) सायंकाळी सातच्या सुमारास रियंका पवार ही आई व इतर सदस्यांसोबत घराच्या अंगणात शेकोटी करुन शेकत होते. बिबट्याने लोकांतून रियंकावर झडप घातली. तिची आर्त किंकाळी ऐकून आई व इतर सदस्यांनी आरडाओरड करत तिच्याकडे धाव घेतली. मात्र सर्वांदेखत वेगाने बिबट्या चिमुरड्या रियंकाला उचलून तुरीच्या शेतात पळाला. बिबट्याचा पाठलाग केला मात्र, काही क्षणांत तो रियंकाला घेऊन तुरीच्या शेतात गायब झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक जमा झाले.
रात्री उशिरापर्यत संपूर्ण तुरीचे शेत पिंजून काढले. मात्र, रियंकाचा शोध लागला नव्हता. खारेकर्जुने हे गाव अहिल्यानगर शहरापासून जवळ आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, पथकासह घटनास्थळी दाखल झाले तर. वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत ड्रोनच्या सह्याने वन विभागाचे कर्मचारी व पोलीस पथक चिमुरडीचा शोध घेत होते. परंतु तिचा शोध लागू शकला नाही. अनेक दिवसापासून अगोरदपासून कर्जुनेखारे परिसरात बिबट्याचा वावर सुरु आहे. शेतकऱ्यांनी बिबट्या पाहिल्याने वन विभागाकडे पिंजरा बसविण्याची माणगी केली जात होती. वन विभागाने गावात पिंजरा आणलाही होता. मात्र, त्याच्या गजांना वेल्डिंग करावयाची असल्याने गावात ठेवला आहे. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. रियंका खारेकर्जुने येथे पहिलीच्या वर्गात शिकत आहे.

