अहिल्यानगर ः (प्रतिनिधी) ः अहिल्यानगर जिल्ह्यात अहिल्यानगर शहर हा महत्त्वाचा विधानसभा मतदार संघ आहे. क्षेत्रफळाच्या तुलनेत हा मतदार संघ लहान असल्याने थेट नागरिकांशी संवाद करणे सोपे आहे. त्यामुळे येथील उमेदवारांनी गाठीभेटी, प्रभात फेऱ्यांना प्राधान्य देत थेट नागरिकांशी संपर्क सुरू केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर शहर हा विधानसभा मतदार संघ प्रामुख्याने महत्त्वाचा मानला जातो १९५१ सुरुवातीला अहमदनगर शहर आणि तालुक्याचा मिळून एक मतदार संघ होता. विठ्ठल कुटे हे या मतदार संघातील पहिले आमदार आहेत. १९५७ पासून अहमदनगर दक्षिण व अहमदनगर उत्तर असे दोन मतदार संघ झाले. दक्षिण मतदार संघात तालुका व…
Read More