भाजपने राज्यसभेसाठी उमेदवारी दिलेले अजित गोपछडे कोण आहेत ?

भाजपने राज्यसभेसाठी उमेदवारी दिलेले अजित गोपछडे कोण आहेत ?

अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णीही राज्यसभेच्या उमेदवार

मुंबई, ; राज्यसभेच्या जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने नुकताच काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पुण्यातील माजी आमदार मेधा कुलकर्णी, यांच्यासह डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे.
In the elections for Rajya Sabha seats, Bharatiya Janata Party has recently joined BJP from Congress, former Chief Minister Ashok Chavan, former Pune MLA Medha Kulkarni, along with Dr. Ajit Gopchde has been nominated.

माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची नावेही या निवडणुकीसाठी चर्चेत होती. मात्र पक्षाने पंकजा मुंडे यांना या ही वेळी टाळले तर नारायण राणे यांचा पत्ता कट केल्याचे दिसून येत आहे.

If Pankaja Munde is avoided this time, it is seen that Narayan Rane’s address has been cut.

देशातील राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक होत आहे त्यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील तीन व गुजरात मधील चार अशा सात राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. गुजरात मधून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, गोविंदभाई ढोकलिया, मयंकभाई भानायक व डाॅ. जशवंतसिंह सलामसिंह परमार यांना उमेदवारी दिली आहे.
From Gujarat BJP National President JP Nadda, Govindbhai Dhokalia, Mayankbhai Bhanayak and Dr. Jashwantsinh Salamsinh Parmar has been nominated

मध्य प्रदेश, गुजरात, ओडिसा यांसह महाराष्ट्रातूनही राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मध्य प्रदेशमधून डॉ. एल. मुरुगन, उमेशनाथ महाराज, माया नरोलिया आणि बंसीलाल गुर्जर यांना राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातून नुकतेच दोन दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पुण्यातील कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ कार्यकर्ते डॉक्टर अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे बेरजेचे राजकारण करत माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा होती मात्र यावेळी पक्षाकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले आहेत तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पत्ता कट केला आहे त्यामुळे नारायण राणे यांना आता लोकसभा निवडणूक लढवूनच निवडून यावे लागणार आहे.
Narayan Rane will now have to contest the Lok Sabha elections and get elected.

कोण आहेत डाॅ. अजित गोपछडे

डॉ. अजित गोपछडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत घडलेले कार्यकर्ते आहेत. आरएसएसचे ते कट्टर स्वयंसेवक आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र भाजपच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. नांदेड लोकसभा, नांदेड आणि नायगाव विधानसभेसाठी त्यांचं नाव कायम चर्चेत असायचं. सामाजिक, शैक्षणिक कार्यात ते अग्रेसर असतात असं सांगितलं जातं. महाविद्यालयात असताना मार्डच्या चळवळीचे गोपछडेंकडून नेतृत्व करण्यात आले होते.
Dr. Ajit Gopchde is an activist of Rashtriya Swayamsevak Sangh. He is a staunch volunteer of RSS. He has been given the responsibility of the vice president of Maharashtra BJP

भाजप नेते प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे, नितीन गडकरींच्या संपर्कातून त्यांनी एबीव्हीपी परिषदेत काम केले आहे. आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रात देखील त्यांचे काम महत्वाचं आहे. अजित गोपछडे हे बाल रोगमध्ये एसबीबीएस, एमडी आहेत. १९९२ मध्ये त्यांनी कारसेवा केली होती. बाबरी मशीद पडली त्यावेळी त्याच्या ढिगाऱ्यावर उभे राहून गोपछडे यांनी फोटो काढला होता.
He did Karseva in 1992. When the Babri Masjid fell, Gopchhade took a photograph standing on its ruins.

Related posts

Leave a Comment