चर्चेत तोडगा नाहीच, आदेश घेऊन या, तोपर्यत मुंबकडे चालत राहू ः मनोज जरांगे

लोणावळा (जि. पुणे ः मुख्यमंत्री कार्यालयाकडून आलेल्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. तोडगा निघाला नाही. बैठक निष्फळ झाली आहे. आम्हालाही मराठा आरक्षणावर Maratha Reservation काढायचाय, तोडगा काढायचाय, पण आम्हाला आरक्षणच मिळणार आहे. इथे प्रश्न मिटत असला तर तेथे जायची हौस नाही. आता परत शिष्टमंडळ येणार आहे. आले तर येऊ द्या, तोपर्यत मुंबईकडे चालत राहू असे सांगत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंदोलनावर ठाम असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis and Ajit Pawar यांनी स्वतः येऊन चर्चा करावी आणि तोडगा काढावा अशी अपेक्षा मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी व्यक्त केली. सरकार मु्ख्य विषयाएवजी इतर विषयावर चर्चा करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर आज दुपारी तीन वाजता लोणावळा येथे प्रसार माध्यमाशी संवाद साधला व तोडगा निघाला नाही असे स्पष्ट केले. दिड महिन्यापुर्वी तेच, आठ दिवसापुर्वीही तेच आणि आजही तेच सांगत आहेत. तोच विषय आहे. पुन्हा सरकारचे लोक पुन्हा आज भेटणार आहे. भेटणार तर भेटू, तोपर्यत मुंबकडे चालत राहू. Maratha Reservation

सरकार, प्रशासनाचे प्रतिनिधी भेटणार आहेत. कुठेही रस्त्यावर चर्चा करु, मुख्यमंत्र्याशी तरी किती बोलणार असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis and Ajit Pawar यांनी स्वतः येऊन चर्चा करावी. तोडगा काढावा आणि प्रश्न सोडवावा. आम्हाला आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा आहे असे सांगितले आहे. मुंबई येऊ नये असा कोणाचाही प्रयत्न नाही. आझाद मैदानावर व्यासपीठ उभारायचे काम सुरु आहे असे जरांगे म्हणाले.

यावेळी बंद खोलीत चर्चा का केली असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या पत्रकारांना मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी चांगलेच झापले. त्यांनी पैसे दिले का असा प्रश्न उपस्थित करत माझ्या समाजाला अडचण नाही. मराठा समाजाचा माझ्यावर विश्वास आहे असे सांगत पाटील म्हणाले, तुमचे प्रश्न वेगळेच आहेत मी पाहतोय. पत्रकार खरे आधार स्तंभ आहेत. तुम्ही आम्हाला मोठी साथ दिलीय. आज मी जेवता जेवता बोललो, चर्चा केली. चर्चा करणारे लोकांत यायला घाबरत आहेत. ५४ लाखाच्या नोंदी, सगेसोयरे, गुन्हे मागे घेणे यावर चर्चा झाली. कृपया उगाच काहीही चुकीचे मेसेज देऊ नका असेही जरांगे पाटील म्हणाले. मी बंद दाराआड चर्चा करणारा नाही असे त्यांनी ठासून सांगितले.

Related posts

Leave a Comment