प्रचार सभांचा ‘धुराळा’ शांत, आता एकमेकांवर लक्ष, कार्यकर्त्यांचा राहणार जागता पहारा

प्रचार सभांचा ‘धुराळा’ शांत, आता एकमेकांवर लक्ष, कार्यकर्त्यांचा राहणार जागता पहारा

अहमदनगर, ः अहमदनगर, शिर्डी लोकसभा मतदार संघात सोमवारी (दिय १३) मतदान होत असल्याने आज (शनिवारी) सायंकाळी प्रचारसभांचा धुराळा थंडावला आहे. आता दोन दिवस आपले वातावरण टिकवून ठेवण्यासाठी उमेदवार टेन्शनमध्ये आहेत. जाहीर प्रचार संपला असला तरी छुप्या प्रचारातून ‘गडबड’ होऊ नये यासाठी उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते एकमेकांवर करडी नजर ठेवून राहणार असल्याचे दिसत आहे. लोकांचे मुलभूत प्रश्न, मराठा आरक्षणाबाबत निवडणूक प्रचारात बोलणे टाळल्याचा परिणाम मतदानातून दिसून येईल असे राजकीय जाणकारांना वाटत आहे.

Since voting is going on in Ahmednagar, Shirdi Lok Sabha constituency on Monday (13th), campaigning meetings have cooled down today (Saturday) evening. Now the candidates are in tension to maintain their atmosphere for two days. Although the public campaign is over, it seems that the candidates and their activists will keep a watchful eye on each other to avoid any ‘disturbance’ from covert campaigning. . Political pundits feel that the polls will show the result of avoiding talking about the basic issue of the people, Maratha reservation in the election campaign.


अहमदनगर लोकसभा मतदार संघात २५ तर शिर्डी लोकसभा मतदार संघात २१ उमेदवार रिंगणात आहेत. राजकीय जाणकारांच्या मतानुसार नगरमध्ये महाविकास आघाडीचे निलेश लंके आणि महायुतीचे सुजय विखे यांच्यात तर शिर्डीत महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे व महायुतीचे सदाशीव लोखंडे आणि वंचितच्या उत्कर्षा रुपवते यांच्यात प्रामुख्याने लढत होत आहे. दोन्ही मतदार संघात आपापल्या परिने अन्य उमेदवारही स्पर्धेत येण्याचा प्रयत्न करत आहेत.

गेल्या पंधरा दिवसाच्या प्रचाराच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते आंबादास दानवे, महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते संजय राऊत, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे पाटील, केंद्रीय रामदास आठवले, माजीमंत्री आदित्य ठाकरे, माजीमंत्री पंकजा मुंडे, भाजपप्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे, खासदा सुप्रिया सुळे व अमोल कोल्हे, भाजप नेत्या चित्रा वाघ, माजीमंत्री राम शिंदे, कृषीभुषण प्रभावती घोगरे, आमदार रोहित पवार, माजीमंत्री प्राजक्त तनपुरे, माजीमंत्री शंकरराव गडाख, विवेक कोल्हे यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या सभांनी मागील पंधरा दिवसात जिल्हा ढवळून निघाला.

Prime Minister Narendra Modi, Senior Leader Sharad Pawar, Chief Minister Eknath Shinde, Former Chief Minister Uddhav Thackeray, Deputy Chief Minister Ajit Pawar, Devendra Fadnavis, Leader of Opposition in the Legislative Council Ambadas Danve, Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil, Former Revenue Minister Balasaheb Thorat, Shiv Sena leader Sanjay Raut, State President of Sharad Chandra Pawar Nationalist Congress Jayant Patil, Sambhaji Dahatonde Patil of Maratha Federation, Central Ramdas Athavale, Former Minister Aditya Thackeray, Former Minister Pankaja Munde, BJP State President Chandrashekhar Bawankule, Khasada Supriya Sule and Amol Kolhe, BJP leader Chitra Wagh, Former Minister Ram Shinde, Krishibhushan Prabhavati Ghogere, MLA Rohit Pawar, Former Minister Prajakt Tanpure, Former Minister Shankarao Gadakh, Vivek Kolhe in meetings of prominent leaders. In the last fifteen days, the district has been in turmoil.

आज (शनिवारी) सायंकाळी जाहीर प्रचार संपला आहे. मात्र आता पुढील दोन दिवस आपले ‘वातावरण’ टिकून ठेवण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या नेत्यांना कसरत करावी लागणार असून त्यामुळे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते टेन्शनमध्ये असले तरी ‘जागता पहारा’ राहणार आहे. ‘मतासाठी अमिषे दाखवली जाऊ शकतात, त्यामुळे आमचे कार्यकर्ते गावगावांत दक्ष आहेत. नवीन हालचाल दिसली की त्यासर्व बारीक बाबीवर लक्ष ठेवून राहणार’’ असे एका कार्यकर्त्यांने सांगितले. छुप्या प्रचारातून ‘गडबड’ होऊ नये यासाठी उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते एकमेकांवर करडी नजर ठेवून राहणार असल्याचे दिसत आहे

—————–
दुष्काळ, मुलभूत प्रश्न दुर्लक्षितच
लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी राज्य आणि देश पातळीवर नेत्यांच्या सभा झाल्या. प्रचाराचा धुराळा उडाला. मात्र एखादा अपवाद वगळता मुलभूत प्रश्नाकडे दुर्लक्षच राहिले. सध्या नगर जिल्ह्यात दुष्काळाची होरपळ सुरु आहे. दुध, कांद्याला दर नाही, महागाई कमालीची वाढली आहे. शेतमालाला दर नसताना त्याबाबत त्यावर बोलणे टाळत नेत्यांनी वैयक्तिक एकमेकांवरच टिका केली. नगर, बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिक तेवत आहे. त्यावरही बोलणे टाळले गेले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबतचा संताप मतातून बाहेर येण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.

Related posts

Leave a Comment