आंतरवली सराटीत रात्रभर मराठा समाजाची गर्दी

आंतरवली सराटीत रात्रभर मराठा समाजाची गर्दी

आंतरवली सराटीतून…

”सहा दिवसापासून पोटात अन्नाचा कण नाही की पाणी नाही, निपचित पडलेले संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील. जिवाची कालवाकालव करणारे हे चित्र आंतरवली सराटीत पहायला मिळत आहे. दिवसासह रात्रीही येथे हजारो मराठा समाजाची गर्दी पहायला मिळत आहे. बुधवारी रात्री आकरा वाजून चाळीस मिनिटांनी डॉक्टरांचे पथक तपासणी साठी आले होते मात्र तपासणीला मनोज जरांगे पाटील यांनी नकार दिला. तब्बेत वरचेवर खालावत असल्याने मराठा समाजाच्या चिंता वाढत आहे.

A team of doctors came for an examination at forty minutes past eleven o’clock on Wednesday night, but Manoj Jarange Patil refused the examination. A Maratha society is growing in concern as Tabbet is on the rise

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा देणारे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे तिसऱ्यांदा उपोषण करत आहेत अगदी बरोबर वारीपासून त्यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा वाढदिवस उजाडला आहे. काल बुधवारी त्यांनी काही प्रमाणात औषध उपचार घेतल्यानंतर पुन्हा औषध उपचार बंद केले. त्यांची प्रकृती वरचेवर खालावत असल्यामुळे महाराष्ट्रातील लाखो मराठा समाजाच्या मनात चिंता निर्माण झाली आहे.

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असल्यामुळे महाराष्ट्रातील हजारो मराठा तरुण कार्यकर्ते महिला नागरिक शेतकरी अंतरवली सराटीकडे धाव घेत असून येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे दिवसभर या भागात वाहणे लावायला ही जागा मिळत नाही एवढी प्रचंड गर्दी होत आहे परंतु रात्रीही लोकांची येथे येणारयाची रीघ लागली आहे. हजारो मराठा बांधवांनी अंतरवाली सराटीत ठाण मांडले आहे संपूर्ण रात्रभर येथे हजारो मराठा बांधव बसून राहत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Thousands of Marathas have set up camp in Antarwali Sarati.Thousands of Marathas are seen sitting here throughout the night

मराठा समाजाला आरक्षण मिळेल तेव्हा मिळेल परंतु लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी औषध उपचार, पाणी घ्यावे अशी आग्रही मागणी येथे बसून असलेल्या लोकांकडून सातत्याने केली जात आहे. सहा दिवसापासून पोटात अन्नाचा कण नाही की पाणी नाही, निपचित पडलेले संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील. जिवाची कालवाकालव करणारे हे चित्र आंतरवली सराटीत पहायला मिळत आहे.
Manoj Jarange Patil, who has not had any food or water in his stomach for six days, is devastated. This heart-wrenching picture is being seen intermittently.

मी मेलो तर…
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आज बुधवारी भावनिक आवाहन केले. ”मी जर मेलो तर मला असंच सरकारच्या दारात नेऊन टाका. मी मेल्यावर या सरकारला धारेवर धरा. सरकारने आपल्याला येत्या १८ किंवा १९ फेब्रुवारीपर्यंत आरक्षण दिलं नाही तर आपण मुंबईला जाऊ.
“If I die, take me to the door of the government.” Hold this government in check after I die. If the government does not give us reservation by February 18 or 19, we will go to Mumbai

सरकार आपल्यासाठी इथे येत नाहीये, तर आपण तिथे जाऊ. मी मेलो तर या सरकारला सोडू नका. मला तिकडे नेऊन टाका. आपण १८ फेब्रुवारीपर्यंत वाट बघू. सरकार आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी कधी करणार हे त्यांनी आधी आम्हाला सांगावं, त्यानंतर मी उपचार घेण्यास तयार आहे.”

Related posts

Leave a Comment