अहिल्यानगर, : अहिल्यानगरसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आज बाधित गावांची पाहणी केली. शेतकऱ्यांचे दुःख जवळून अनुभवल्यानंतर माजी कृषिमंत्री व माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात (Former Agriculture Minister and Former Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी पाथर्डी तालुक्यातील श्री मोहटादेवीचे चरणी प्रार्थना केली की संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना ताकद दे आणि संकटात शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याची केंद्र आणि राज्य सरकारला सद्बुद्धी दे. शेतकऱ्यांची ह्या वेदना सरकारच्या काळजापर्यंत पोहोचवण्याची आर्त प्रार्थना आई मोहटादेवीच्या चरणी त्यांनी यावेळी केली. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार हेमंत ओगले, जिल्हा परिषदेच्या…
Read More