सांगली ः सांगली जिल्ह्यातील खानापुर-आटपाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन झाले आहे. Khanapur-Atpadi Assembly Constituency MLA Anil Babar has passed away. निमोनिया झाल्याने बाबर यांच्यावर उपचार सुरु होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक तसेच जलसंधारणाच्या कामाला प्राधान्य देणारा पाणीदार आमदार Panidar MLA म्हणून अनिल बाबर यांची ओळख होती. अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत. खानापुर- आटपाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार असलेले अनिल बाबर Anil Babar शेतकऱ्यांसाठी सातत्याने कामाला प्राधान्य द्यायचे.
7 जानेवारी 1950 रोजी अनिल बाबर Anil Babar यांचा जन्म झाला. त्यांची राजकीय कारकीर्द तितकीच मोठी आहे. त्यांनी 1972 साली वयाच्या 22 व्या वर्षापासून त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली. जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा त्यांचा प्रवास होता. सर्वातआधी ते 1990 साली आमदार म्हणून ते विधानसभेवर निवडून गेले. 1982 ते 1990 खानापूर पंचायत समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं. अनिल बाबर १९९०,१९९९९, २०१४ आणि २०१९ असे चार वेळा ते विधानसभेवर निवडून आले होते.
अनिल बाबर Anil Babar यांनी आपल्या खानापूर आटपाडी मतदारसंघांमध्ये त्यांनी शिवसेनेचे केलेले कार्य कधीही न विसरण्याजोगे आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी आणण्यासाठी सिंचनासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. कृष्णा खोऱ्यातील पाणी आणि टेंभू योजना Krishna Valley Water and Tembhu Scheme कार्यान्वित व्हावी म्हणून ते सतत झगडत होते. बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे किंवा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा तळागाळापर्यंत केलेला प्रसार असो, अनिल बाबर Anil Babarयांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. खानापूर आटपाडी भागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी अनिल बाबर हे कायम एका लढाऊ वृत्तीने लढले. त्यांनी या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने शिवसेनेचा एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, माझा जवळचा सहकारी आणि मार्गदर्शक आम्ही गमावला आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी सांगत आमदार अनिल बाबर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.