शिवसेना नसती तर आयोध्येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली नसती ः संजय राऊत

शिवसेना नसती तर आयोध्येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली नसती ः संजय राऊत

नाशिक ः देशात सर्वत्र राममय वातावरण आहे. मात्र शिवसेनेमुळेच राम मंदिर होत आहे. शिवसेना नसती तर राममंदिर झाले नसते. शिवसेनेच्या वाघामुळे काल पंतप्रधानाना पुजा करता आली. शिवसेना नसती काल अयोध्येत प्रभूरामाची प्राणप्रतिष्ठा झाली नासती. प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष पंचवटीत नाशिकमध्ये झालाय. श्रीरामाचे आणि शिवेसनेचे जुने नाते आहे असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
नाशिक येथे शिवसेनेचे पक्षप्रुमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अधिवेशन होत आहे. त्यात संजय राऊत यांचे भाषण झाले. रामाचा जो संयम आहे, तोच श्रीरामाचा संयम आहे. रामाचे धैर्य म्हणजे शिवसेनेचे धैर्य. रामाचे शौर्य ते शिवसेनेचे शौर्य. जो रामाचा संयम तो उद्धव ठाकरे यांचा संयम. दशरथ मांझी यांचे उदाहरण देत संजय राऊत म्हणाले, पहाड फोडून पर्वतावर रस्ता काढला. पर्वताला झुकावे लागले. यावा म्हणतात शौर्य. उध्दव ठाकरे यांच्या लढणाची ताकद आहे. शुर्पनखेचे नाक याच पंचवटीत कापले गेले आहे. कणाकणात राम मनामनात राम आहे आणि फक्त शिवसेनेत रामाचा प्राण आहे. श्रीराम आता शिवसेनेसाठी मशाल हाती घेईल आता सगळीकडे रावण दिसत आहेत. पण सध्याचा रावण अजिंक्य आहे हे डोक्यातून काढून टाका असे सांगत रामायणातील अनेक दाखवे राऊत यांनी आपल्या भााषात दिले.

Related posts

Leave a Comment