मराठा गरिब असल्याचे खोटे दाखवले जात आहेत ः छगन भुजबळ

मराठा गरिब असल्याचे खोटे दाखवले जात आहेत ः छगन भुजबळ

मुंबई ः मराठा समाज श्रीमंत आहे. मात्र तो गरिब असल्याचे सर्वेक्षणात खोटे दाखवले जात आहे. एकीकडे ओबीसीतून आरक्षण देणार नाही असे सांगायचे आणि दुसऱ्या बाजूला बाजूने कुणबी प्रमाणपत्रे द्यायची. हे चालू देणार नाही मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, पण ओबीसीतून आरक्षण देऊ देणार नाही असे मंत्री छगन भुजबळ Minister Chhagan Bhujbal म्हणाले.
मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न Maratha Reservation चव्हाट्यावर आहे. मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil मुंबईत अंदोलन करण्यासाठी जात असल्याचे पाहून सरकारने त्यांच्यासह अंदोलकांना मुंबईच्या वेशीवर रोखण्यात यश मिळवले. सरकारने कुणबी नोंदी असलेल्यांच्या सग्या सोयऱ्यांना प्रमाणपत्रे देण्याबाबतचा अध्यादेश काढून तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांग पाटील Manoj Jarange Patil यांना देऊन अंदोलन थांबवले. आता त्यावरुनच ओबीसी समाजाचे नेते अक्रमक झाले आहेत. मंत्री छगन भुजबळ, आमदार राम शिंदे, गोपीचंद पडळकर Minister Chhagan Bhujbal, MLA Ram Shinde, Gopichand Padalkar यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक घेतली. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ओबीसी एल्गार मेळावे होत असून राज्यभर जनजागृती मोहिम उभारली जात आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले, Minister Chhagan Bhujbal मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याला विरोध केलेला नाही. मात्र ओबीसीतून आरक्षण घेऊच देणार नाही. मी आमदारकी, खासदारकी, मंत्रीपदाचा कधी विचार केला नाही. मराठा समाजाचे जे सर्वेक्षण चालू आहे त्यातून मराठा समाज गरिब असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न आहे. खोटी माहिती भरली जात असल्याचा आरोप करत आम्ही शांत बसणार नाही असे सांगितले.

Related posts

Leave a Comment