मराठा काय असतो, ते दाखवून देऊ…..रॅलीतील सहभागी लोकांच्या कडवट प्रतिक्रिया

मराठा काय असतो, ते दाखवून देऊ…..रॅलीतील सहभागी लोकांच्या कडवट प्रतिक्रिया

रांजणगाव (जि. पुणे) ः मराठा समाजाचा केवळ राजकारणासाठी आतापर्यत पुढाऱ्यांनी वापर केला. ‘‘कुणबी म्हणून सरकारी दरबारी नोंद असेल तर कुणबी प्रमाणपत्र देण्याचा पन्नास-पंचावन्न वर्षांपासून नियम आहे. त्याबाबत सातत्याने आदेश निघाले, पण आता अधिक नोंदी सापडल्या म्हणून प्रमाणपत्रे द्यायला टाळाटाळ करत आहेत. मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांची मागणी कुणबी प्रमाणपत्रे देण्याची आहे, तर सरकार वेगळ्या पद्धतीने मराठा समाजावर अन्याय करत आहे. सरकारमधील अनेक मंत्री, नेते मराठा आरक्षणाला विरोध करत आहे. अशांना मराठा समाज विसरणार नाही,’’ मराठा काय आहे हे आम्ही दाखवून देऊ, हे वादळ आता थांबणार नाही We will show what Marathas are, this storm will not stop now
अशा कडवट प्रतिक्रिया मराठा आरक्षण रॅलीत सहभागी झालेल्यांनी दिल्या.


मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil मुंबईत उपोषण करणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून लोक त्यांच्यासोबत पदयात्रेने मुंबईला जात आहे. तरुणांसह, महिला, ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. सोमवारी दिनांक २२ रोजी रॅली अहमदनगरहून सुपा, शिरूरमार्गे पुण्याकडे मार्गस्थ झाली. रांजणगाव (जि. पुणे) येथे थांबलेल्या रॅलीतील तरुण, वयस्क माणसे, महिलांशी आम्ही गप्पा मारल्या तेव्हा लोकांची अत्यंत कडवट प्रतिक्रिया आल्या,नोंदेड जिल्ह्यातील मोहिजा परंडा (ता. कंधार) येथील धनाजी वसंत जाधव पाचशे किलोमीटरचा प्रवास करत दुचाकीवर जाताना दिसले. सोबत महिनाभर मुक्काम करता येईल एवढे साहित्य, संसोरपयोगी सर्व वस्तू होत्या. ते म्हणाले, मी शेतकरी माणूस, प्रतिकूल परिस्थितीतून पोराला शिकवत डॉक्टर करण्याचे स्वप्न पाहतो आहे. पण ५३० गुण मिळूनही एमबीबीएसला नंबर लागला नाही आणि आरक्षणातील पोरांचा कमी गुण असूनही संधी मिळाली. आमच्या समाजाच्या नोंदी सापडूनही हे सरकार आमच्या अन्याय करत आहे. त्याची किंमत त्यांना मोजावी लागणार आहे.

सत्तरी ओलांडलेले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हरिचंद्र कापसे, रेणापूर (जि. लातूर) तालुक्यातील व्यकंट सोनवणे म्हणाले, ‘‘मराठा समाजाचेच नेते मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत. नोंदी सापडून जर तुम्ही नियमाप्रमाणे, कायद्याप्रमाणे आरक्षण देत नसाल तर ठरवून अन्याय करत आहेत. नेते विरोध करतात आणि त्यांचे कार्यकर्ते समाजासोबत असल्याचे दाखतात. मात्र मराठा समाज विरोध करणाऱ्यांना, यापूर्वीही मराठा आरक्षणाला विरोध करत होते त्यांना विसरलेला नाही, विसरणारही नाही.

मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil या एका साध्या रस्त्यावरच्या तरुणाने समाजासाठी सर्वस्व वाहलेय. सरकार जर मराठ्यांना गृहीत धरत असतील तर ही आग थांबणार नाही.’’ वयाच्या विशीतील सुदर्शन नखाते म्हणाले, ‘‘शिकताच येत नाही तर काय करणार, आमच्यावरील अन्याय आम्ही आता सहन करू शकत नाही.’’ मराठा समाजाला तुम्ही ग्रहित धरत असाल, पण नेत्यांनी मराठा आरक्षणाला, ओबीसीतून आरक्षण देता येत नाही असे सांगत विरोध केलेला आहे. आता मनोज जरांगे पाटलाच्या भितीने कितीही कळवळा दाखवत असलात तरी महाराष्ट्रातील मराठे विरोध केलेला विसरले नाहीत. आमची डोकी फुटली, कोट्यावधी वंचित आणि गरजवंत लोक एकत्र आले तरी तुम्ही न्याय देण्याएवजी थांबायचं कसे यासाठी प्रयत्न करत असाल तर त्याची किंमत तुम्हाला मोजावीच लागणार. मराठा काय असतो ते दाखवून देऊ. Let us show you what a Maratha is.

पहिल्यांदाच निस्वार्थी नेता मिळाला
‘‘मराठा समाजाच्या नावावर राजकारण करणाऱ्या नेत्यांची संख्या कमी नाही. मात्र इतिहासात पहिल्यांदाच आमच्या समाजाला मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांच्या रूपाने निस्वार्थी नेता मिळाला आहे. समाजासाठी जीवन-मरणाची लढाई लढणाऱ्या नेत्यांचे शब्द आमच्यासाठी अंतिम आहे. रस्त्यावरच्या साध्या माणसाच्या मागे राज्यातील मराठा समाज उभा कसा राहतो, याचे खरं तर सध्याच्या राजकीय नेत्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे,’ अशी कडवट प्रतिक्रिया हसनाबाद (ता. धारुर) येथील प्रभाकर लांडगे यांनी दिली.

Related posts

Leave a Comment