मुंबई :माझी भूमिका ठरली आहे. सरकार हट्ट पुरवण्याचे काम करतोय. मराठे आता ओबीसीचे हक्कदार झालेत असे दिसतेय. मी मांडत असलेली भूमिका ही माझी भूमिका आहे. गेल्या अनेक दिवसापासून ओबीसीसाठी लढतोय ठरत राहणार असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. मी एका जातीसाठी काम करत नाही तर अनेक जातीसाठी काम असल्याचे भुजबळ म्हणाले.मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक होत आहे, Government works hard to provide Maratha Moracha – Chhagan Bhujbal
त्या पाश्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमाशी संवाद साधला. भुजबळ म्हणाले, मराठे आता ओबीसीचे वाटेकरी झाले आहेत. शिंदे कमिटीचे काम काय, कशाला चालू ठेवा. ओबीसीचे आरक्षण संपल्याची आता लोकांत भावना निर्माण झाली आहे. मराठा समाज मागास नाहीत, हे कोर्टाने सांगितले आहे.पण ते मागास असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न आहे.
ओबीसीची भावना चुकीची नाही. वेगळं आरक्षण देणार असाल तरच पाठिबा, ओबीसीतून आरक्षण देऊ देणार नाही. सरकार हट्ट पुरवण्याचे काम करतेय. सर्व एकतर्फी काम सुरु आहे. शपथपत्रावर प्रमाणपत्र देण्याची गरज काय. आमच्यातील सगळे लोक काम करत आहेत. ज्यांना जे जमतेय ते ते काम करत आहेत. सरकारने ओबीसी समाजाला स्पष्टता द्यावी.