‘कर्जमाफी, उत्पादन खर्चावर आधारित हमीभावासाठी खडकीच्या शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांची भेट घेतली

‘कर्जमाफी, उत्पादन खर्चावर आधारित हमीभावासाठी खडकीच्या  शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांची भेट घेतली

अहिल्यानगर ः शेतीमालाला मिळत नसलेला योग्य बाजारभाव, वाढता उत्पादन खर्च आणि नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने त्यांना सरसकट कर्जमाफी व उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा, अशी मागणी खडकी (ता. अहिल्यानगर) येथील शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे नुकतीच निवेदनाद्वारे केली.

The farmers of Khadki (Ahilyanagar) recently submitted a statement to the Agriculture Minister Dattatray Bharne that the farmers of Khadki (Ahilyanagar) should be given a loan waiver and a guarantee based on the production cost as the financial condition of the farmers has worsened due to the lack of proper market price for the agricultural produce, rising production cost and natural calamities.

खडकी (ता. अहिल्यानगर) येथील सरपंच भाऊसाहेब बहिरट, नंदू रोकडे, कैलास कोठुळे, अशोक रोकडे, बापू कोठुळे यांच्यासह शेतकऱ्यांनी भरणे यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी दूध व्यवसाय, फळबाग आणि जिरायती शेतीसमोरील अडचणींवर देखील चर्चा झाली. उत्पादन खर्च प्रचंड वाढला असताना बाजारभाव मात्र कमी मिळतो. शेतकरी धान्य विक्रीस आणतो तेव्हा भाव पडलेले असतात; मात्र व्यापाऱ्यांकडे त्याचा साठा असल्याने वाढीव दरांचा फायदा त्यांनाच होतो, अशी खंत शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली.
दुधाला सध्या प्रति लिटर सुमारे ३४ रुपये दर मिळत असून, तो किमान ४० रुपये करावा, बनावट दूध निर्मात्यांवर कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. कांद्याला १० ते १२ रुपये प्रति किलो दर मिळत असल्याने तोटा होत असून, किलोमागे १५ रुपये अनुदान द्यावे, अशी मागणीही करण्यात आली. एम. एस. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे हमीभाव लागू करावा, तसेच बिबट्यांच्या भीतीमुळे शेतीसाठी दिवसा आठ तास वीजपुरवठा द्यावा, अशीही मागणी करण्यात आली.
…..

Related posts

Leave a Comment