शेतकऱ्यांची पोरं दारात आली, तांब्याभर तरी पाणी द्या ः मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईकरांना अवाहन

मुंबई ः शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांची पोरं आरक्षणासाठी मुंबईत आली आहेत. ज्यांचा बाप शेतात सतत राबतो, (Father works continuously in the field) त्यांची ही पोरं आहे. हक्क मागत आहेत. आपल्या ताट अन्नाने भरण्यासाठी घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांची पोरं आपल्या दारातून चालली तर त्यांना साथ द्या, तांब्याबर पाणी द्या असे भावनिक अवाहन मराठा maratha आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांनी केले.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक दिवसापासून लढा देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) आता मुंबईत उपोषण करणार आहेत. आज गुरुवारी रात्री नवी मुंबईतील बाजार समितीत मुक्काम केला. सोबतीला लाखो मराठा समाजाचे लोक आहेत. त्यात तरुण, वयस्क माणसे, महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. रात्री वृतवाहिन्याशी चर्चा करताना मनोज जरांगे पाटील भावूक झाले. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आदी भागातून मोठया प्रमाणात जरांगे jarange यांनी लोकांनी पाठिंबा दिला आहे.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) म्हणाले, शेतकरी शेतात सतत राबतोय, त्यांच्या कष्टातूनच प्रत्येकांच्या समोरचे ताट, आणि पोट भरत आहे. मात्र शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोरांची आता उपासमार होत आहे. आरक्षण नसल्याने शिकता येत नाही, नोकरी नाही, त्यामुळे पोरं हतबल होत आहेत. कुणबी नोंदी सापडूनही सरकार आरक्षण देत नाही. त्यासाठीच आम्ही मुंबईला आलो आहोत. ज्यांचा बाप शेतात सतत राबतो Father works continuously in the field), त्यांची ही पोरं आहे. हक्क मागत आहेत. आपल्या ताट अन्नाने भरण्यासाठी घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांची पोरं आपल्या दारातून चालली तर त्यांना साथ द्या, तांब्याबर पाणी द्या. शेतकरी सुखी तर सारा समाज सुखी राहिली. आरक्षणाचा आमचा लढा प्रश्न सुटेपर्यत सुरुच राहणार.

Related posts

Leave a Comment