सहकारी संस्थांमुळे संगमनेर तालुक्याची अर्थव्यवस्था मजबूत – रणजितसिंह देशमुख

सहकारी संस्थांमुळे संगमनेर तालुक्याची अर्थव्यवस्था मजबूत – रणजितसिंह देशमुख

संगमनेर ः संगमनेर दुध उत्पादकांच्या जीवनात दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक स्थिरता निर्माण झाल्यामुळे सहकाराच्या माध्यमातून ग्रामिण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. ग्रामिण भागात दुग्धव्यवसाय हा मुख्य व्यवसाय बनला आहे. संगमनेर तीलुका दूध संघाच्या माध्यमातून दिपावलीनिमित्त दूध दर फरक, दुधाचे पेमेंट, अनामत, कामगारांना बोनस व मेहनताना, व्यापारी देणे, चढ उतार निधी असे एकूण दूध उत्पादकांना ४१ कोटी रूपये त्याचबरोबर दूध संघाशी सलग्न असणाऱ्या सहकारी दूध संस्थांनी सुध्दा ४१ कोटी रूपये असे एकूण ८२ कोटी रूपये दूध उत्पादकांना अदा करण्यात आले असल्याची माहिती दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी दिली.

The rural economy has been strengthened through cooperatives as the dairy industry has brought financial stability to the lives of Sangamner milk producers. Dairying has become the main business in rural areas. Through Sangamner Tiluka Milk Association, milk price difference, milk payment, deposit, bonus and remuneration to workers on the occasion of Diwali. Ranjitsinh Deshmukh, chairman of the Milk Association, informed that a total of Rs 82 crore has been paid to milk producers, including Rs 41 crore paid by the cooperative milk institutions affiliated with the Milk Association, including Rs 41 crore paid by the traders and fluctuation fund.

रणजितसिंह देशमुख म्हणाले , थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात The great freedom fighter, the late Sahakara Maharshi Bhausaheb Thorat यांनी सन १९७७ साली दूध संघाची स्थापना केली. त्यांच्या आदर्श विचारावर दूध संघाची यशस्वी वाटचाल चालू आहे. माजी मंत्री मा.श्री. बाळासाहेब थोरात Former Minister Hon. Shri. Balasaheb Thorat यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली दूध उत्पादकांच्या हिताची सातत्यपुर्ण काळजी घेतली जात असून दूध उत्पादकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम केले जात आहे. त्याचबरोबर नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून दुग्धव्यवसायाला फायदेशीर ठरतील असेच निर्णय घेतले जातात.

संगमनेर दूध संघाची वार्षिक उलाढाल ५५० कोटी असून दूध उत्पादकांना वर्षभरामध्ये ४७५ कोटी रूपये दूध उत्पादकांना उत्पादका दूध खरेदी पोटी दिले जातात. दुग्धव्यवसाच्या माध्यमातून नियमितपणे १५ दिवसाला पेमेंट होत असल्याने त्यातून दूध उत्पादकांचे व्यवस्थीतपणे अर्थकारण चालू असते. दिवाळीच्या निमित्ताने येणाऱ्या मोठ्या रक्कमेमुळे मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत असते. ग्रामिण भागातील होणाऱ्या या अर्थकारणावर शहराची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. दुध उत्पादकांकडील रक्कम ही शहरातील व्यापाऱ्यांकडे विविध प्रकारच्या खरेदीच्या माध्यमातून हस्तांतरीत होत असते. त्यामुळे संपुर्ण तालुक्याचीच अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. तालुक्यातील सहकारी संस्थांमुळे संगमनेरची बाजारपेठ ही जिल्ह्यात सर्वात मोठी बाजारपेठ बनलेली आहे.

सहकारी चळवळ अधिक मजबूत करावयाची असल्यास दूध उत्पादकांनी सहकारी संघाला ताजे, स्वच्छ व निर्भेळ दुधाचा पुरवठा करावा व ग्राहकांनी देखील सहकारी दूध संघांने निर्माण केलेले दर्जेदार व शुध्द राजहंस दुग्धजन्य पदार्थ खरेदी करावे असे अवाहन चेअरमन श्री. देशमुख यांनी केले.

या प्रसंगी दूध संघाचे व्हा. चेअरमन राजेंद्र पाटील चकोर, संचालक लक्ष्मणराव कुटे, विलासराव वर्षे, भास्करराव सिनारे, संतोष मांडेकर, विलास कवडे, बबनराव कुऱ्हाडे, बादशहा वाळुंज, संजय पोकळे, विक्रम थोरात, रमेश गुंजाळ, विष्णू ढोले, तुकाराम दातीर, रविंद्र रोहम, भारत मुंगसे, प्रमोद पावसे, सौ. प्रतिभाताई जोंधळे, सौ. मंदाताई नवले, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी आदी उपस्थित होते.

On this occasion, the Milk Association was present. Chairman Rajendra Patil Chakor, Directors Laxmanrao Kute, Vilasrao Sreera, Bhaskarrao Sinare, Santosh Mandekar, Vilas Kavade, Babanrao Kurhade, Badshaha Walunj, Sanjay Pokale, Vikram Thorat, Ramesh Gunjal, Vishnu Dhole, Tukaram Datir, Ravindra Roham, Bharat Mungse, Pramod Pawse, Mrs. Pratibhatai Jondhale, Mrs. Mandatai Navale, Executive Director Dr. Sujit Khilari etc. were present.

Related posts

Leave a Comment