—————————
Read MoreCategory: शेती
12 जानेवारी प्रेरणा दिनानिमित्त सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन
अहिल्यानगर, ः थोर स्वातंत्र्यसेनानी व अमृत उद्योग समूहाचे संस्थापक, सहकारातील संत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती निमित्त दरवर्षी 12 जानेवारी हा प्रेरणा दिन म्हणून साजरा होत असतो. यावर्षीही गावोगावी मोठ्या उत्साहात प्रेरणा दिन होणार आहे. तसेच अमृत उद्योग समूहाच्या वतीने सोमवार दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वा. अमृतेश्वर मंदिराजवळील प्रेरणास्थळ येथे महाराष्ट्राचे मा.महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे व डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीमध्ये अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना पांडुरंग पाटील घुले म्हणाले…
Read Moreपंजाबसह राज्यातून आलेल्या 250 संकरित गाई कृषी प्रदर्शनातील मुख्य आकर्षण
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात कळस कृषी व डेअरी प्रदर्शनामध्ये ही भव्य सौंदर्य व दुग्ध स्पर्धा पार पडली यावेळी ते बोलत होते यावेळी समवेत सौ शरयूताई देशमुख,प्रकल्प प्रमुख सागर वाकचौरे, व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर, संतोष मांडेकर गोरख नवले विलासराव वर्पे विष्णू ढोले, कार्यकारी संचालक डॉ.सुजित खिल्लारी , मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे,प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघ, प्रा. जी.बी. बाचकर आदी उपस्थित होते. या डेअरी प्रदर्शनामध्ये दुग्ध व सौंदर्य स्पर्धा झाली असून यामध्ये पंजाब राज्यासह राज्यभरातील 250 गाईंनी सहभाग नोंदवला आहे . अत्यंत सुंदर असलेल्या कालवडी गाई पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी…
Read Moreसहा क्विटंल एकवीस किलो कांदा विकून आलेले पैसे खर्चातच जिरले
अहिल्यानगर, ः चार-पाच महिने कष्ट करुन पिकवलेला कांदा बाजारात विक्रीसाठी नेला. प्रती क्विंटल शंभर रुपयांचा म्हणजे एक रुपया किलो दर मिळाला. सहाशे रुपये मिळाले. मात्र कांदा नेण्यासाठीच्या वाहतुकीसह अन्य खर्चही सहाशे रुपये झाले. आलेली रक्कम खर्चात वजा झाल्यानंतर सबंधित शेतकरी शुन्य रुपये शिल्लक राहिलेल्या पट्टीचा कागद घेऊन घरी परतला. संगमनेर (जि. अहिल्यानगर) येथील बाजार समितीमधील एका व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्याला दिलेली कांदापट्टी व्हायरल झाल्याने कांदा दराचे वास्तव समोर आले आहे. After toiling for four to five months to cultivate onions, a farmer took his produce to the market for sale. He received…
Read Moreसहकारी संस्थांमुळे संगमनेर तालुक्याची अर्थव्यवस्था मजबूत – रणजितसिंह देशमुख
संगमनेर ः संगमनेर दुध उत्पादकांच्या जीवनात दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक स्थिरता निर्माण झाल्यामुळे सहकाराच्या माध्यमातून ग्रामिण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. ग्रामिण भागात दुग्धव्यवसाय हा मुख्य व्यवसाय बनला आहे. संगमनेर तीलुका दूध संघाच्या माध्यमातून दिपावलीनिमित्त दूध दर फरक, दुधाचे पेमेंट, अनामत, कामगारांना बोनस व मेहनताना, व्यापारी देणे, चढ उतार निधी असे एकूण दूध उत्पादकांना ४१ कोटी रूपये त्याचबरोबर दूध संघाशी सलग्न असणाऱ्या सहकारी दूध संस्थांनी सुध्दा ४१ कोटी रूपये असे एकूण ८२ कोटी रूपये दूध उत्पादकांना अदा करण्यात आले असल्याची माहिती दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी दिली. The rural economy…
Read More