अहिल्यानगर शहरात शशिकांत गाडें सरांच्या पाठिंब्याने अभिषेक कळमकरांचा मार्ग सुकर

अहिल्यानगर शहरात शशिकांत गाडें सरांच्या पाठिंब्याने अभिषेक कळमकरांचा मार्ग सुकर

अहिल्यानगर, (प्रतिनिधी) ः आहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करणारे शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर यांनी अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांना पाठिंबा दिल्याचे मंगळावारी जाहीर केले. त्यामुळे अभिषेक कळमकर यांना आता शिवसेनेच्या मदतीने चांगलेच बळ मिळाले असून त्यांचा मार्ग सुकर झाला आहे. शांत पद्धतीने कळमकर यांनी प्रचारातही पेरणी जोरात सुरु केली आहे. अहिल्यानगर शहरात आमदार संग्राम जगताप आणि अभिषेक कळमकर यांच्यात विधानसभेची लढत होत आहे.

Shiv Sena (Ubatha) District Chief Shashikant Gade Sir, who is an independent candidate from Ahilyanagar city assembly constituency, announced on Tuesday that he has finally supported Mahavikas Aghadi candidate Abhishek Kalamkar. Therefore, Abhishek Kalamkar has now got good strength with the help of Shiv Sena and his path has become easy.

अहिल्यानगर विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीत राष्ट्वादी काॅग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे आली आहे. येथून अहिल्यानगर शहराचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांना उमेदवारी मिळाली आहे. ही जागा शिवसेनेला सोडून शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर, प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे आदींनी उमेदवारीची मागणी केली होती. काॅग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनीही जागा सोडण्याची मागणी केली होती व या सर्वांनी अपक्ष उमेदवारी अर्जही भरले होते. मात्र जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मिळवून माजी आमदार दादाभाऊ कळमकर व राष्ट्रवादीचे नेते यशस्वी झाले आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांना उमेदवारी मिळाली.

Shiv Sena (Ubatha) District Chief Shashikant Gade Sir, First Mayor Bhagwan Phulsounder, Balasaheb Borate etc. demanded the candidature. Congress city district president Kiran Kale had also demanded to vacate the seat and all of them had also filed independent candidature forms.

अर्ज मागे घेण्याच्या दिवशी आघाडीतील सर्वांनी अर्ज मागे घेतले असले तरी शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर यांचा अर्ज काही सेंकंद उशिर झाल्याने राहिला होता. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली असे सांगत अनेक शंका-कुशंका उपस्थित केल्या जात होत्या. मंगळवारी त्यावर पुर्ण पडदा पडला. शशिकांत गाडे यांनी उशिरा झाल्याने अर्ज राहून गेला असेस्पष्ट करत महाविकास आघाडीचे अभिषेक कळमकर यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला.

खासदार निलेश लंके, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख संभाजी कदम, माजीमंत्री स्व. अनिल राठोड यांचे चिरंजीव व युवक नेते विक्रम राठोड, कॉग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे उपस्थीत होते. गाडेसर यांनी अभिषेक कळमकर यांना जाहीर पाठिंबा दिल्याने त्यांची बाजु आता भक्कम झाली आहे. शांत पद्धतीने कळमकर यांनी प्रचारातही पेरणी जोरात करत असल्याचे दिसून येत आहे. मोठ्या कार्यक्रमापेक्षा थेट मतदार भेटीवर कळमकर यांनी भर दिल्याचे पहायला मिळत आहे.

MP Nilesh Lanka, Ex-MLA Dadabhau Kalamkar, Ex-Mayor Bhagwan Phulsounder, City Chief Sambhaji Kadam, Ex-Minister Sh. Anil Rathod’s lifelong and youth leader Vikram Rathod, Congress city district president Kiran Kale were present. Gadesar’s side has now become stronger as he has publicly supported Abhishek Kalamkar.

Related posts

Leave a Comment