श्रीरामपुरला विधानसभेला शिवसेनेच्या उमेदवारीच्या स्पर्धेत नितीन उदमलेची जोरदार एन्ट्री,

श्रीरामपुरला विधानसभेला शिवसेनेच्या उमेदवारीच्या स्पर्धेत नितीन उदमलेची जोरदार एन्ट्री,

अहमदनगर, (प्रतिनिधी) ः नगर जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांचे वर्चस्व असलेल्या श्रीरामपुर विधानसभा मतदार संघात काॅग्रेस आणि शिवसेना (शिंदे) यांच्यातच प्रामुख्याने लढत होणार असल्याची सध्याची तरी स्थिती आहे. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, प्रशांत लोखंडे शिंदे सेनेच्या उमेदवारीवर दावा करत असताना शेतकरी प्रश्नावर काम करणारे नितीन उदमले यांची उमेदवारीच्या स्पर्धेत एन्ट्री झाली आहे. त्यामुळे श्रीरामपुर मतदार संघात निवडणूकीआधीच विधानसभा जोरात असल्याचे दिसून येत आहे. The current situation is that the fight will be mainly between Congress and Shiv Sena (Shinde) in Srirampur Assembly Constituency. While former MLA Bhausaheb Kamble, Prashant Lokhande are claiming the Shinde Sena candidature, Nitin Udmale, who works on farmers’ issue, has entered the candidature contest.


महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार भानुदास मुरकुटे, जिल्हा बॅंकेचे संचालक करण ससाणे, राष्ट्रवादीच्या नेत्या अनुराधा आदीक यांचे वर्चस्व असलेला श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. महायुतीत शिवसेना (शिंदे) आणि महाविकास आघाडीत काॅग्रेस कडे हा मतदारसंघ असेल हे निश्चित असल्याने या दोन पक्षांतच लढत होईल हे स्पष्ट आहे.


मागील विधानसभा निवडणूकीत (२०१९) काॅग्रेसचे लहु कानडे निवडून आले. त्याआधी दहा वर्ष (२००९ व २०१४) शिवसेनचे भाऊसाहेब कांबळे आमदार होते. २०१९ मध्ये कांबळे काॅग्रेसमध्ये जाऊन शिर्डी लोकसभा मतदार संघात लढले आणि पराभूत झाले. त्यानंतर विधानसभेलाही त्यांचा पराभव झाला. आता भाऊसाहेब कांबळे विधानसभा डोळ्यासमोर ठेवून २०२४ च्या लोकसभेआधी शिंदे यांच्या शिवसेनेत आले असून उमेदवारीवर पक्का दावा आहे. दहा वर्ष खासदार असलेले सदाशीव लोखंडे यावेळी पराभूत झाले. मात्र श्रीरामपुर मतदार संघात लोखंडे यांना साधारण आकरा हजार मतांची आघाडी आहे. त्यामुळे शिंदे सेनेकडून उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. आपला पराभव झाला तरी मुलगा प्रशांत लोखंडे यांना उमेदवारी मिळावी यासाठी माजी खासदार सदाशीव लोखंडे जोर लावून आहेत.

माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, प्रशांत लोखंडे यांचे नाव चर्चेत असताना शेतकरी प्रश्नाचे अभ्यासक आणि किसान मोर्चोचे नेते नितीन उदमले यांचीही उमेदवारीच्या स्पर्धेत एन्ट्री झाली आहे. (While the name of former MLA Bhausaheb Kamble, Prashant Lokhande is in discussion, Nitin Udmale, an expert on farmer issues and leader of Kisan Morcho, has also entered the candidature contest.) मुळात श्रीरामपुर तालुक्यात गेल्या तीन चार वर्षापासून संपर्कात असलेले उदमले कृषी पदवीधर असून २०१४ मध्ये ते आम आदमी पक्षांकडून लोकसभा लढलेले आहेत.

अनेक दिवसापासून उमेदवारीच्या स्पर्धेत असताना त्याबाबत मात्र गुप्तता पाळली गेली. महायुतीमधील उमेदवार निवडून यावा याच निकषावर उमेदवारी दिली जाणार असल्याने उमेदवारीकडे लोकांचेही लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीकडून आमदार लहु कानडे असतील. कानडे प्रशासकीय अधिकारी होते. आता उदमले यांची शिंदे सेनेकडील उमेदवारीच्या स्पर्धेत उघड एन्ट्री झाली आहे. त्यांचाही प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. त्यामुळे कानडे व उदमले यांच्यात लढत होते की, अन्य कोणाला उमेवारी मिळते यावर श्रीरामपुरचे गणित ठऱणार असले तरी येथे निवडणूकीआधीच विधानसभा जोरात असल्याचे दिसून येत आहे.  

———-

वरिष्ठ नेत्यांचाही उमदलेसाठी आग्रह
भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चात अनेक वर्ष सक्रीय काम करत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नितीन उदमले
Nitin udmale काम करत आहेत. हिंदुवादी नेते म्हणून त्यांची ओळख आहे. श्रीरामपुर विधानसभा मतदार संघ शिवसेना (शिंदे) गटाकडे राहणार हे निश्चित आहे. प्रशासनात काम केलेले, तसेच शेती, सहकार प्रश्नावर अभ्यासू व्यक्ती म्हणून नितीन उदमले यांची नगर जिल्ह्यात ओळख आहे. त्यांना शिंदे सेनेकडून उमेदवारी मिळाली तर जिंकतील असा अंदाज असल्याने शिंदे सेनेतील नेत्यांसह भाजपमधील नेत्यांच्या मुंबईतील एका बैठकीत नितीन उदमले यांना उमेदवारी देण्याचा आग्रह धरल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता उमेदवारी कोणाला मिळते याकडे श्रीरामपुरकरांचे लक्ष लागले असले तरी उमेदवारीच्या रस्सीखेचामुळे श्रीरामपुर मतदार संघ चर्चेत आला आहे.
—————-

Related posts

Leave a Comment