अहिल्यानगर, (प्रतिनिधी) ः सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातून पुढे येऊन राजकारणात आपली वेगळा ठसा उटवत लोकनेतेपद मिळवलेले लोकनेते आमदार शिवाजीराव कर्डीले आज (शुक्रवारी ता. १७) आनंतात विलीन झाले. त्यांच्यावर बुऱ्हानगर येथील त्यांच्यावर शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आपल्या लाडक्या नेत्यांना निरोप देण्यासाठी तालुक्यासह जिल्हाभरातील लोक, राजकीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाडक्या लोकनेत्यांना निरोप देताना अनेकांना अश्रु अनावर झाले.अहिल्यानगर शहरानजीक असलेल्या बुऱ्हानगर येथील दुध उत्पादक शेतकरी कुटूंबातील शिवाजीराव कर्डीले यांचा राजकीय प्रवास प्रेरणादायी आणि संघर्षमय आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव भानुदास कर्डिले (वय ६७)…
Read More